वैज्ञानिकांनी जगातील सर्वात लहान मायक्रोचिप तयार केली असून त्यात १००० संस्कारक आहेत. त्याच्या मदतीने १.७८ महापद्म गणिती सूचनांवर अंमलबजावणी करता येते. किलोकोअर चिप असे या ऊर्जाकार्यक्षम चिपचे नाव असून त्यात ६२१ दशलक्ष टान्झिस्टर्स आहेत. आमच्या मते १००० संस्कारक असलेली ही जगातील पहिलीच मायक्रोचिप आहे. त्याचा गणनाचा वेगही अधिक आहे, असे कॅलिफोर्निया विद्यापीठाचे
बिव्हन बास यांनी सांगितले. त्यांनीच या मायक्रोचिपची रचना केली आहे. अनेक संस्कारक असलेल्या चिप सध्याही आहेत, पण त्यात तीनशेच्या संस्कारक (प्रोसेसर्स) नाहीत. त्यातील बरेचसे संशोधनासाठी आहेत विक्रीसाठी नाहीत. प्रत्येक संस्कारक त्याची एक स्वतंत्र आज्ञावली चालवतो. प्रत्येक संस्कारक स्वतंत्रपणे काम करू शकतो हा वेगळा दृष्टिकोन असून यात एक सूचना व बहुविध माहिती स्थाने असा प्रकार असतो. ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिटमध्ये त्याचा वापर करतात. एकच काम अनेक लहान तुकडय़ात रूपांतरित करून विविध संस्कारक समांतर चालवता येतात. त्यात कमी ऊर्जेत जास्त काम करता येते. प्रत्येक संस्कारक हा स्वतंत्रपणे कालबद्ध असतो त्यामुळे तो ऊर्जा साठवण्यासाठी गरज नसताना आपोआप बंद होऊ शकतो, असे विद्यापीठाचे डॉक्टरेटचे विद्यार्थी ब्रेन्सट बोहनेनस्थिल यांनी म्हटले आहे. यातील कोअर्स सरासरी १.७८ गिगॅहर्टझ कंप्रतेला काम करतात व एकमेकांकडे माहिती हस्तांतरित करतात. चिप अनेक ऊर्जासक्षम कोअर्स यात वापरले जातात. १००० संस्कारक ११५ अब्ज गणने एका सेकंदाला करतात व त्यात ०.७ व्ॉट ऊर्जा लागते. एका ‘एए’ बॅटरीपेक्षा कमी बॅटरी त्याला लागते. या चिपसाठी अनेक उपयोजने विकसित केली असून त्यात वायरलेस कोडिंग, एनक्रीप्शन व इतर वैज्ञानिक माहिती उपयोजनांचा तसेच डेटा सेंटर रेकॉर्ड प्रोसेसिंग यांचा समावेश आहेTuesday, 21 June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.
Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.
No comments:
Post a Comment