ब्रिटनने युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने ब्रिटनकरांनी कौल दिल्यानंतर ब्रिटनच्या सत्ताधारी हुजूर पक्षाचे नेते आणि पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. ब्रेक्झिटचा कौल जनतेने दिल्यानंतर कॅमेरुन यांनी ब्रिटनमधील ‘डाऊनिंग स्ट्रीट’वर पत्रकार परिषद घेऊन आपले भूमिका स्पष्ट केली. परिषदेत कॅमेरुन यांनी राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.ते म्हणाले की, ब्रिटनच्या
नागरिकांना आता नवा पर्याय निवडला आहे. यासाठी त्यांना आता नव्या नेतृत्त्वाची गरज आहे. युरोपियन महासंघातून बाहेर पडलेल्या ब्रिटनचे नेतृत्त्व मी आता करून शकेन, असे वाटत नाही. ब्रिटन सरकारची नौका स्थिर राहण्यासाठी मी आणखी काही आठवडे किंवा काही महिने शक्य तेवढे प्रयत्न करेन, पण या नव्या उद्देशाने प्रेरित झालेल्या ब्रिटनच्या नौकेचे नेतृत्त्व करण्यासाठी प्रयत्न करणे मला योग्य वाटत नाही.
दरम्यान, ब्रिटनने युरोपियन महासंघातून बाहेर पडावे या बाजूने ५१.९० टक्के लोकांनी मतदान केले, तर ४८.१० टक्के मतदारांनी युरोपिय महासंघात राहण्याच्या बाजूने मत टाकले. ब्रिटनने युरोपीय महासंघाचे सदस्य रहावे याबाजूनेच कॅमेरून यांच्या सरकारची भूमिका राहिली होती. पण नागरिकांनी कॅमेरून यांच्या आवाहनाला झुगारल्याने कॅमेरुन यांच्यावर नामुष्की ओढवली आहे.
No comments:
Post a Comment