इंडियन प्रिमिअर लीगमधील(आयपीएल) आठ संघांना घेऊन अमेरिकेत तीन आठवड्यांची मिनी-आयपीएल स्पर्धा खेळविण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा(बीसीसीआय) मानस असल्याची माहिती ट्वेन्टी-२० लीग गर्व्हनिंग काऊन्सिलमधील एका अधिकाऱयाने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राशी बोलताना दिली. आयसीसीकडून ट्वेन्टी-२० चॅम्पियन्स लीग संपुष्टात आणण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याकडे ट्वेन्टी-२० ची
एक नवीन स्पर्धा आयोजित करण्यासाठीचा वेळ नक्कीच आहे. आठ संघांना घेऊन मिनी-आयपीएल सुरू करण्याचा आमचा विचार आहे, पण अद्याप ठिकाण निश्चित झालेले नसले तरी अमेरिका या पर्यायाचा विचार केला जात आहे, असे ट्वेन्टी-२० गर्व्हनिंग काऊन्सिलच्या अधिकाऱयाने सांगितले.
गुरूवारी धरमशाला येथे घेण्यात आलेल्या बैठकीवेळी ही कल्पना बीसीसीआय पदाधिकाऱयांना सुचल्याचेही अधिकाऱयाने सांगितले.
No comments:
Post a Comment