नासाच्या केप्लर दुर्बिणीने के २ मोहिमेत एक पूर्ण विकसित बाहय़ग्रह शोधला असून, तो आतापर्यंत सापडलेला सर्वात तरुण बाहय़ग्रह आहे. त्याचे नामकरण के २-३३ बी असे केले असून, तो नेपच्यूनपेक्षा थोडा मोठा आहे. तो ताऱ्याभोवती पाच दिवसांत प्रदक्षिणा पूर्ण करतो. तो केवळ ५ ते १० दशलक्ष वर्षे जुना असून, आतापर्यंत फार कमी नवजात ग्रह सापडले आहेत. आपली पृथ्वी साडेचार अब्ज वर्षे वयाची आहे त्या तुलनेत
के २-३३ बी हा ग्रह तरुण आहे. तो बाल ग्रह आहे असे म्हणायला हरकत नाही, असे कॅलटेकचे ट्रेव्हर डेव्हिड यांनी सांगितले. वैज्ञानिकांनी आतापर्यंत तीन हजार बाहय़ग्रह निश्चित केले असून ते मध्यमवयीन ताऱ्यांभोवती फिरत आहेत. ग्रहांच्या निर्मितीवर या ग्रहाच्या शोधाने प्रकाश पडणार असून, त्यामुळे पृथ्वीची निर्मिती कशी झाली असावी हे समजू शकेल, असे कालटेकचे संशोधक एरिक पेटीग्युरा यांनी सांगितले. या ग्रहाचे पहिले संदेश के२ मोहिमेने टिपले. दुर्बिणीच्या कॅमेऱ्याला मातृताऱ्याचा प्रकाश हा ग्रह समोरून जाताना कमी होताना दिसला व त्यामुळे तो ग्रह असल्याचे स्पष्ट झाले. लाखो वर्षांपूर्वी धूळ पसरत गेली व त्यातून हे ग्रह तयार झाले असावेत असे नासाच्या अॅनी मारी यांनी सांगितले. नवीन शोधलेला ग्रह बुध सूर्याच्या जितका जवळ आहे त्यापेक्षा त्यांच्या मातृताऱ्याच्या १० पट जवळ आहे त्यामुळे तो तप्त आहे. अनेक जुने बाहय़ग्रह ताऱ्याभोवती जवळून फिरत आहेत. पण आता जो ग्रह सापडला आहे त्याच्या वस्तुमानाइतके किती ग्रह ताऱ्यांपासून जवळच्या कक्षेत फिरत असावेत असा प्रश्न आहे. डिस्क मायग्रेशनमुळे हा ग्रह ताऱ्याच्या इतका जवळ आला असावा, त्यासाठी हजारो वर्षे लागली असावीत असा एक अंदाज आहे. के२-३३बी या ग्रहामुळे वैज्ञानिकांना आता संशोधनासाठी नवी माहिती उपलब्ध झाली. नेचर या नियतकालिकात डेव्हिड यांनी म्हटले आहे, की असे काही ग्रह बऱ्याच काळानंतर ताऱ्याच्या निकट आले असावेत, की आधीपासून ते तेथे असावेत हा प्रश्न आहे. आताच्या प्रकरणात तरी नेमके काय झाले असावे हे सांगणे अवघड आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.
Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.
No comments:
Post a Comment