Wednesday, 22 June 2016

सॉफ्टबँक अध्यक्षपदावरून निकेश अरोरा पायउतार!


जगभर ई-कॉमर्स कंपन्यांसाठी अर्थबळ निर्माण करणाऱ्या जपानच्या बलाढय़ सॉफ्टबँक समूहाच्या अध्यक्षपदावरून भारतीय वंशाचे निकेश अरोरा यांना अखेर मंगळवारी पायउतार व्हावे लागले. सॉफ्टबँकचे संस्थापक मासायोशी सन यांचे वारसदार मानले गेलेले अरोरा यांच्याबद्दल गुंतवणूकदारांमधील नाराजीच त्यांना बाहेरचा रस्ता दाखविणारी ठरली. एकेकाळी गुगलमध्ये वरिष्ठ स्थानावर असलेले अरोरा हे दोनच
वर्षांपूर्वी सॉफ्टबँकमध्ये रुजू झाले होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर सॉफ्टबँकचे संस्थापक ५९ वर्षीय सन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारीपदासह अध्यक्षपदही स्वत:कडे घेतले आहे. अरोरा हे बुधवारपासून कंपनीचे सल्लागार या भूमिकेत असतील, असेही सन यांनी स्पष्ट केले. कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा एक दिवसावर येऊन ठेपली असताना सॉफ्टबँकेत हा वरिष्ठ पातळीवर नेतृत्वबदल घडून आला आहे. अरोरा यांना मिळणारे मोठय़ा रकमेतील मानधन तसेच त्यांची पात्रता याबाबत गुंतवणूकदार, भागधारक यांनी आक्षेप घेतला होता. गेल्या वर्षी ४८ वर्षीय अरोरा यांनी ७.३० कोटी डॉलर वेतन घेतले होते. गुंतवणूकदारांच्या गटाने उपस्थित केलेल्या कंपनीच्या एका व्यवहाराबाबत शंका उपस्थित केल्यानंतर कंपनीने केलेला दावा व्यवहार्य नसल्याचा ठपका सॉफ्टबँकेने फेब्रुवारीमध्ये नियुक्त केलेल्या विशेष तपास समितीने ठेवला होता. त्यात अरोरा दोषी असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. अरोरा यांनी सॉफ्टबँकेत आणलेल्या बेअर कॅपिटलचे भागीदार संस्थापक आलोक सामा यांना अरोरा यांच्या जागी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
जगभरातील ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये सॉफ्टबँकने अरोरा यांच्या कारकीर्दीत ४ अब्ज डॉलरचा निधी ओतला आहे. ८० अब्ज डॉलरचा कर्जभार असलेल्या सॉफ्टबँकचे अमेरिकेतील व्यवसायात चांगलेच हात पोळले आहेत. जूनच्या सुरुवातीला सॉफ्टबँकने आघाडीची चिनी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबामधील हिस्सा आधीच्या ३२ टक्क्यांवरून २७ टक्क्यांवर १० अब्ज डॉलर मोबदल्यात आणला. सॉफ्टबँकची भारतातील गुंतवणूक १ अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे. स्नॅपडिल, ओला कॅब्स, हाऊसिंग डॉट कॉम, ओयो रुम्ससारख्या कंपन्यांमध्ये तिची गुंतवणूक आहे. स्नॅपडीलसारख्या कंपनीत ६२ कोटी डॉलरची गुंतवणूक करणाऱ्या सॉफ्टबँकच्या इतिहासात अरोरा यांच्या रूपात प्रथमच समूहाबाहेरील व्यक्तीकडे अध्यक्षपद गेले होते.
सन यांनी १९८१ मध्ये सॉफ्टवेअर वितरण कंपनी म्हणून सॉफ्टबँकची स्थापना केली. तिचा जपानमधील व्यवसाय दूरसंचार क्षेत्रातील आघाडीच्या व्होडाफोनने २००६ मध्ये ताब्यात घेतला. यानंतर तिचे रूपांतर मोबाइलवर आधारित सेवा कंपनीत करण्यात आले. या क्षेत्रातील जपानमधील तिसरी मोठी कंपनी सॉफ्टबँक बनली.

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.