टाटा समूहाचा अपारंपरिक ऊर्जा कंपनी समभाग खरेदी करार टाटा पॉवर कंपनी लिमिटेड (‘टाटा पॉवर’) या भारताच्या सर्वात मोठय़ा एकात्मिक वीज कंपनीची १००% मालकी असणाऱ्या टाटा पॉवर रिन्युवेबल एनर्जी लिमिटेड या उपकंपनीने वेलस्पन रिन्युवेबल्स एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड (‘डब्ल्युआरईपीएल’) चा ताबा घेण्यासाठी मातृकंपनी वेलस्पन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड (‘डब्ल्युपीएल’) सोबत सहभाग खरेदी करार
(एसपीए) सोमवारी केला. भारतातील अपारंपारिक उर्जा क्षेत्रातील हा एक सर्वात मोठा खरेदी व्यवहार आहे. ‘डब्ल्युआरईपीएल’ ही सर्वाधिक सौर उर्जानिर्मिती करणारी भारतातील एक कंपनी असून तिचा विस्तार १० राज्यांमध्ये आहे. या कंपनीने एकूण १,१४० मेगावॅट क्षमतेचे अपारंपारिक उर्जा प्रकल्प असून त्यामध्ये ९९० मेगावॅट सौर उर्जा तर १५० मेगावॅट पवन उर्जा प्रकल्पांचा समावेश आहे. १,१४० मेगावॅटपकी सुमारे १,००० मेगावॅट क्षमता कार्यरत असून उर्वरित क्षमता ही उभारली जात आहे. टीपीआरईएल कंपनीची स्वतची अपारंपारिक उर्जा निर्मिती २९४ मेगावॅट असून टाटा पॉवर व्यतिरिक्त आणखी ५०० मेगावॅटची अपारंपारिक उर्जा निर्मिती क्षमता कोर्ट प्रक्रियेच्या माध्यमातून टीपीआरईएल ताब्यात घेत आहे. याशिवाय आणखी ४०० मेगावॅट क्षमतेचे सौर उर्जा व पवन उर्जा प्रकल्प उभारले जात आहेत. त्यामुळे ही सर्व मालमत्ता मिळून टीपीआरईएलची एकूण अपारंपारिक उर्जा निर्मिती क्षमता सुमारे २,३०० मेगावॅट होत असल्याने ही कंपनी भारतातील सर्वात मोठी अपारंपारिक उर्जा निर्मिती कंपनी ठरली आहे. टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक अनिल सरादना यांनी सांगितले की, विविध जैविक आणि अजैविक विकास संधीच्या माध्यमातून आपल्या समभागधारकांकरिता मुल्य निर्मिती करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात कंपनी विस्ताराला प्रोत्साहन देत आहे. कंपनीच्या बहुतांशी मालमत्ता या महसुल वाढविणाऱ्या आणि कार्यरत असणार्या मालमत्ता असल्याने या नव्या खरेदीव्यवहारामुळे सर्व समभागधारकांसाठी फायदेशीर मुल्य वितरित होण्यास मदत होईल. कंपनीच्या परिचलन अनुभव व वित्तीय अनुकुलनामुळे टाटा पॉवर या मालमत्तांचे मुल्य आणखी सुधारेल. बलाबल.. ६ भारताची सर्वात मोठी एकात्मिक वीज निर्मिती कंपनी म्हणून टाटा पॉवरचे भक्कम स्थान ६ टाटा पॉवरच्या अपारंपरिक उर्जा निर्मिती स्थापित क्षमतेत २,३०० मेगावॅटने वाढ
Subscribe to:
Post Comments (Atom)
Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.
Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.
No comments:
Post a Comment