Tuesday, 21 June 2016

तापी ‘मेगा रिचार्ज’ प्रकल्पाला मेळघाटातून विरोध

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील सुमारे साडेचार लाख हेक्टर शेतीसाठी वरदान ठरू शकणाऱ्या तापी महाकाय पुनर्भरण (मेगा रिचार्ज) प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाची (डीपीआर) जोरदार तयारी सुरू असताना या प्रकल्पाला मेळघाटातूनच विरोध सुरू झाला आहे. या प्रकल्पामुळे मेळघाटातील अनेक गावे विस्थापित होणार असूनही या भागातील लोकांना विश्वासात न घेता या प्रकल्पाच्या उभारणीसाठी हालचाली सुरू करण्यात
आल्या आहेत, असे सांगत मेळघाटचे माजी आमदार केवलराम काळे, राजकुमार पटेल यांच्यासह अनेकांनी या प्रकल्पाला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकल्पासाठी सर्व हालचाली मध्यप्रदेशातून सुरू आहेत, उंटावरून शेळ्या हाकण्याचा हा प्रयत्न असल्याचे केवलराम काळे यांचे म्हणणे आहे. गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आंतरराज्यीय प्रकल्पाच्या अभ्यासासाठी केंद्र सरकारने ‘टास्क फोर्स’ नेमला होता. या महत्वाकांक्षी प्रकल्पाची नुकतीच केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांनी हवाई पाहणी केली. पावसाळ्यात तापी नदीच्या पुराचे पाणी मध्यप्रदेशातील नेपानगर, बऱ्हाणपूर आणि महाराष्ट्रातील रावेर, यावल आणि चोपडा या तालुक्यात, तसेच डाव्या कालव्याद्वारे धारणी व बऱ्हाणपूर, खकनार या तालुक्यात ठिकठिकाणच्या नदीनाल्यांमध्ये सोडून भूमिगत बंधारे, गॅब्रियन बंधारे, पुनर्भरण विहिरी, इंजेक्शन वेल्स आणि साठवण बंधारे बांधणे आणि त्याद्वारे पुनर्भरण करून पाण्याची पातळी वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. याशिवाय, निर्माण होणाऱ्या पाणीसाठय़ाद्वारे प्रत्यक्ष सिंचनही केले जाणार आहे. देशातील सर्वात मोठा पुनर्भरण प्रकल्प ठरू शकणाऱ्या या प्रकल्पासाठी ९ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील अनेक तालुक्यांमधील खालवत चाललेल्या पाण्याच्या पातळीचे संकट दूर होऊ शकेल. शिवाय, सिंचनासाठी पाणीही उपलब्ध होऊ शकेल. अनेक भागात उपलब्ध पाणी व जमिनीत झिरपणारे पाणी यातील तफावतीमुळे दिवसेंदिवस भूजल पातळी १ मीटर प्रतिवर्ष या वेगाने खालावत आहे. केंद्रीय भूजल मंडळाने सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी तापीच्या पावसाळ्यातील पाण्याद्वारे महाकाय पुनर्भरण प्रकल्प राबवण्यात यावा, अशी सूचना केली होती. तापी पाटबंधारे विकास महामंडळाने या प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या, पण धारणी तालुक्यातून या प्रकल्पाला विरोध झाल्यामुळे सर्वेक्षणाचे काम थांबवण्यात आले होते. आता पुन्हा या प्रकल्पाच्या उभारणीसाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पामुळे एकूण ४ लाख ५१ हजार हेक्टर लाभक्षेत्रापैकी एक लाख दोन हजार हेक्टर क्षेत्रास प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार असून ३ लाख ४९ हजार हेक्टरमध्ये पुनर्भरणानंतर सिंचन करता येऊ शकेल. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील ८० ते ९० नदी-नाल्यांमध्ये जलपुनर्भरण होऊ शकेल. तापी नदीच्या वाहून जाणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण करणे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. १९९९ पासून तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या उभारणीची चर्चा सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात ही प्रक्रिया थांबली होती. २००४ पासून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. आता विस्तृत प्रकल्प अहवाल सादर झाल्यानंतर प्रकल्पाचे काम मार्गी लागण्याची शक्यता असताना मेळघाटच्या दोन माजी आमदारांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.