फ्लोरिडा :
येथील ओरलँडो परिसरात गायिका क्रिस्टिना ग्रिमी (२२) हिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. अमेरिकेतील टीव्ही कार्यक्रम ‘द व्हाईस‘मध्ये ग्रिमी सहभागी झाली होती. या कार्यक्रमातील सहभागामुळे ग्रिमी प्रसिद्धीच्या झोतात आली
होती. ओरलँडो येथे काल तिच्या एका गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमानंतर ती चाहत्यांना सह्या देत होती, त्यावेळी या व्यक्तीने तिच्यावर गोळ्या झाडल्या.
गोळीबाराच्या घटनेनंतर ग्रिमीच्या भावाने या गोळीबार करणाऱ्याला पकडले. या गोंधळात या व्यक्तीने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
ग्रिमीला तातडीने एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तिथे तिचे निधन झाले.
‘द व्हाईस’ या स्पर्धेत तिचा ३ क्रमांक आला होता. अमेरिकीतल एक उगवती गायिका म्हणून तिचे नाव घेतले जात होते. ग्रिमीचे आतापर्यंत ‘फाईंड मी’ आणि ’साईड ए’ हे दोन अल्बल प्रसिद्ध झालेले आहेत. युट्यूबवर ग्रिमीचे मोठ्या लाखोच्या घरात चाहते आहेत.
No comments:
Post a Comment