नवी दिल्ली - दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने (आप) नियमांचे उल्लंघन केल्याने अलका लांबा यांना प्रवक्ते पदावरून दोन वर्षांसाठी निलंबित केले आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे परिवहन मंत्री गोपाल राय यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर अलका लांबा यांनी वक्तव्य केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सत्येंद्र जैन यांच्याकडे देण्यात यावी. यामुळे झालेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होईल. या वक्तव्यावरून त्यांच्या पक्षाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत प्रवक्ते पदावरून निलंबित करण्यात आले आहे.
पक्षाकडून करण्यात आलेल्या या कारवाईवर आपले म्हणणे स्पष्ट करताना लांबा यांनी ट्विट केले आहे, की मी पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ती आहे. पक्षाच्या प्रत्येक निर्णयाचा सन्मान करते. अनावधनाने माझ्याकडून चूक झाली असेल तर मी नक्कीच प्रायश्चित करेल. माझ्यामुळे पक्षाच्या भ्रष्टाचारविरोधी लढाईला धक्का बसेल अशा माझा उद्देश नाही.

No comments:
Post a Comment