इस्रोच्या शिरपेचात आणखीन एका मानाचा तुरा खोवला जाणार आहे. बुधवारी (दि.२२ जून) श्रीहरीकोटा येथून इस्रो २० उपग्रहांचे एकाच वेळी प्रक्षेपण करणार आहे. याला आता काही तासांचा अवधी शिल्लक आहे. या २० उपग्रहांमध्ये कोर्टोसॅट -२ या मालेतील उपग्रहाचा समवेश असून याचे प्रामुख्याने पृथ्वीसंबंधी माहिती जमा करणे हे काम असणार आहे. यापूर्वी २००८ मध्ये इस्रोने १० उपग्रह वेगवेगळ्या कक्षांमध्ये स्थापित केले होते.
यावेळी इस्रो २० उपग्रह एकाचवेळी प्रक्षेपित करणार आहे. यामध्ये अमेरिका, जर्मनी, कनॅडा आणि इंडोनेशिया यांच्या उपग्रहांचाही समवेश आहे. याचबरोबर भारतीय विद्यापिठासाठी दोन उपग्रहांचा समवेश आहे.
कोर्टोसॅट -२ आणि अन्य १९ उपग्रहांचे एकत्रित वजन १,२८८ किलो आहे. हे सर्व २० उपग्रह पीएसएलवी-सी ३४ द्वारे आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाशतळावरून २२ जून रोजी सकाळी नऊ वाजून २६ मिनिटांनी प्रक्षेपण केले जाणार आहेत.
७७५ कोटी कमावले
पीएसएलवी हे जगातील सर्वात स्वस्त लॉन्च व्हेइकल आहे. त्यामुळे इस्रोचे इतर देशांचे उपग्रह प्रक्षेपण करून मिळणारे उत्पन्न वाढत आहे. वर्ष २०१६-१७ मध्ये पीएसएलवीद्वारे २५ उपग्रह पाठवण्याचा इस्रोचा मानस आहे. इस्रोने इतर देशांचे अवकाशात उपग्रह पाठवून वर्ष २०१५-१६ मध्ये ७७५ कोटींची कमाई केली होती. हे उत्पन्न २०१४-१५ च्या मानाने १६ टक्के जास्त होते.
No comments:
Post a Comment