लंडन येथे झालेल्या चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत रौप्य पदक मिळवणाऱ्या भारताच्या पुरुष संघाने जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. 'एफआयएच'च्या ताज्या जागतिक रँकिंगमध्ये भारतीय संघ सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने क्रमवारीत बेल्जियम आणि अर्जेंटिना या संघांना मागे टाकून अव्वल पाच संघात स्थान
मिळवले. तर विश्व विजेता आणि चॅम्पियन्स स्पर्धेतील विजेत्या ऑस्टेलिया संघाने पहिले स्थान कायम राखले आहे. क्रमवारीत नेदरलँड, जर्मनी आणि इंग्लंड हे अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
महिलांच्या क्रमवारीत नेदरलँड पहिल्या स्थानावर आहे. तर चॅम्पियन्स चषक विजेता अर्जेंटिनाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या तर न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहेत. क्रमवारीत भारतीय महिला संघाच्या क्रमवारीत कोणताही बदल झाला नसून तो १३व्या स्थानावर आहे.
'एफआयएच'कडून पुढील क्रमवारी २०१६च्या ऑलिंपिक स्पर्धेनंतर जाहीर केली जाणार आहे.
No comments:
Post a Comment