Saturday, 25 June 2016

‘ब्रेग्झिट’च्या धडकीने १.८० लाख कोटींचा चुराडा

सप्ताहअखेरचे व्यवहार सुरू होण्यापूर्वीच आलेल्या ऐतिहासिक ‘ब्रेग्झिट’ कौलाचे अपेक्षित भीतीदायक पडसाद भांडवली बाजाराने अनुभवले. तब्बल १,१०० अंश गटांगळी खाल्लेला सेन्सेक्स मात्र काहीसा सावरून ६०४.५१ अंशाची आपटी नोंदवीत दिवसअखेर २६,३९७.७१ वर विसावला. तर १८१.८५ अंश घसरणीसह निफ्टीलाही आठवडाअखेर आठ हजारानजीकचा, ८,०८८.६०चा तळ अनुभवावा लागला. तब्बल १,१०० अंशांच्या घसरणीने
व्यवहार सुरू करणाऱ्या मुंबईच्या शेअर बाजारात दिवसअखेरही गुंतवणूकदारांची मालमत्ता १.८० लाख कोटी रुपयांनी रोडावली. गुरुवारच्या तुलनेतील सत्रातील १,१०० अंशांच्या घसरणीने सेन्सेक्स दिवसअखेर काहीसा सावरला असला तरी दिवसअखेरची त्याची ६०० अंशांची सत्रआपटी ही गेल्या चार महिन्यांतील सुमार ठरली. ब्रिटन तसेच युरोपात व्यवसाय असलेल्या कंपन्यांच्या समभागांवर बाजारातील शुक्रवारच्या व्यवहारादरम्यान विपरीत परिणाम झाला. यामध्ये टाटा समूहातील प्रमुख तीन कंपन्यांसह माहिती तंत्रज्ञान, पोलाद, औषधनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश राहिला. सेन्सेक्समध्ये घसरलेल्या २३ समभागांमध्ये टाटा समूहातीलच टाटा मोटर्स, टाटा स्टील यांसह लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, आयसीआयसीआय बँक यांच्यामध्ये ८ टक्क्यांपर्यंतची घसरण नोंदली गेली. तर स्थावर मालमत्ता, पोलाद, भांडवली वस्तू, बँक, वाहन, माहिती तंत्रज्ञान निर्देशांक घसरते राहिले. सेन्सेक्समध्ये एक हजारांहून अधिक अंश आपटी नोंदली जात असताना तर प्रमुख तीसही समभाग हे घसरणीच्या यादीत होते. सत्रअखेर त्यातील ७ समभाग मूल्यवाढ नोंदवू शकले. २६,३६७.४८ने सुरुवात करणाऱ्या सेन्सेक्सचा सत्राचा तळ २६ हजारांच्याही खाली जात २५,९११.३३ पर्यंत गेला होता. शुक्रवारच्या पडझडीमुळे मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे समभागमूल्य १०० लाख कोटी रुपयांच्याही खाली येत ९९,६०,५१३ लाख कोटी रुपयांवर आले. सत्रात सेन्सेक्स १,१०० अंशांनी कोसळला असताना हेच मूल्य तब्बल ४ लाख कोटी रुपयांनी कमी झाले होते. दिवसअखेर ते निम्म्यावर आले. सेन्सेक्सही अखेर त्याच्या ११ फेब्रुवारीनंतरच्या किमान स्तरावर राहिला. जागतिक बाजारात भूकंप ‘ब्रेग्झिट’ निकाल स्पष्ट होताच जागतिक स्तरावर सर्वप्रथम सुरू होणाऱ्या आशिया बाजारात पडझड नोंदली गेली. निक्केई २२५, हेंग सेंग हे तसेच युरोपातील एफटीएसई १००, डॅक्स, कॅक ४० हे ८ टक्क्यांपर्यंत घसरले.   ‘ब्रेग्झिट’ने भारतासाठी संधीची रुपेरी रेषा निर्माण केली आहे. खनिज तेलाचे घसरते दर तसेच अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हकडून लांबणीवर टाकली जाणारी व्याज दरवाढ हे भारताच्या पथ्यावर पडणाऱ्या बाबी आहेत. चलनातील अस्थिरतेबाबत सरकार सावध असून त्याचा सामना केला जाईल. * अरविंद सुब्रमण्यन, मुख्य आर्थिक सल्लागार. भारतीय अर्थव्यवस्थेतील मूलभूत घटक भक्कम आहेत. ‘ब्रेग्झिट’सारख्या अल्पकालीन घटनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन विपरीत परिणाम होणार नाहीत. विदेशी राखीव गंगाजळी, कमी महागाई तसेच आर्थिक सुधारणा याबाबत भारत सध्या प्रगतिपथावर आहे. *  शक्तिकांता दास, अर्थ व्यवहार सचिव.   पूर्ण सज्जतेची अर्थमंत्र्यांची ग्वाही ‘ब्रेग्झिट’च्या लघू व मध्यम मुदतीच्या परिणामांना तोंड देण्यास भारतीय अर्थव्यवस्था सज्ज आहे, अशी ग्वाही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. सरकार, रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया व नियामक संस्था समन्वयाने अर्थव्यवस्थेला धक्का बसू नये यासाठी काम करीत आहेत. देशाचे स्थूल अर्थकारणातील घटक मजबूत असून आर्थिक शिस्त व चलनवाढ कमी करणे या दोन बाबींसाठी आम्ही वचनबद्ध आहोत. देशातील राखीव परकीय चलनसाठाही मोठय़ा प्रमाणात आहे. अस्थिरता कमी करून अर्थव्यवस्थेला बसणारे धक्के कमी करणे हा आमचा उद्देश आहे. जागतिकीकरणाच्या काळात तरलता व अस्थिरता हे दोन घटक महत्त्वाचे आहेत. याचे आर्थिक परिणाम नेमके काय होतील याबाबत अजून अनिश्चितता आहे.   रुपया चार महिन्यांच्या तळात भांडवली बाजारात पडझड सुरू असताना विदेशी चलन विनियम मंचावरही शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाची ६८ नजीक घसरणीने घबराटीची स्थिती दिसून आली. सप्ताहअखेरच्या एकाच व्यवहारात रुपया तब्बल ७१ पैशांनी रोडावत थेट ६७.९६ पर्यंत येऊन ठेपला. स्थानिक चलनाचा हा गेल्या चार महिन्यांतील तळ होता. ‘ब्रेग्झिट’ निकालापूर्वीच ६७.९१ अशी खराब सुरुवात करणाऱ्या रुपया पुढे ६८ खाली, ६८.२२ पर्यंत घसरला. दिवसअखेर ते ६८ च्या वर राहण्यात यशस्वी झाले. पडझड रोखण्यात रिझव्‍‌र्ह बँकेने हस्तक्षेप केल्यानंतरही रुपयाला त्याची सत्रातील २४ ऑगस्ट २०१५ नंतरची सर्वात मोठी आपटी रोखता आली नाही. चलनाने यापूर्वी २९ फेब्रुवारी २०१६ रोजी ६८.४२ तळ दाखविला आहे.   तात्पुरती अस्थिरता निर्माण झाली असली तरी भारताकरिता युरोपीय संघ तसेच ब्रिटन येथे अधिक संधी उपलब्ध झाली आहे. स्वतंत्र झालेल्या दोन्ही भागात भारताला मोठा वाव आहे. – अरुंधती भट्टाचार्य, अध्यक्षा, स्टेट बँक. फार नकारात्मकता घडणार नाही. उलट या घटनेमुळे जगभरातील कंपन्यांना जोखीम व्यवस्थापनाला अधिक महत्त्व द्यावे लागेल. ब्रिटनने ही संधीच देऊ केली आहे.

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.