रशियाच्या डेनिस निझेगोरोदोव्ह व स्वेतलाना व्हॅसिलिवा यांनी ऑलिम्पिक बंदीच्या निर्णयविरुद्ध क्रीडापटू अपील न्यायालयाकडे अर्ज दाखल केला आहे. या दोन्ही खेळाडूंवर उत्तेजक सेवनाबद्दल आगामी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याबाबत बंदीची कारवाई करण्यात आली आहे. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीच्या (वाडा) अहवालानुसार आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाने रशियाच्या काही खेळाडूंवर बंदी
घातली आहे. त्यामध्ये डेनिस व स्वेतलाना यांचा समावेश आहे. या बंदीविरुद्ध अपील करताना या खेळाडूंनी अर्जात म्हटले आहे की, केवळ एक दोन खेळाडू दोषी आढळल्यामुळे सर्वच खेळाडूंवर बंदी घालणे अयोग्य आहे. माजी ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या डेनिस याने सांगितले, ‘ऑलिम्पिकमध्ये भाग घेणे हे आमचे ध्येय आहे व आम्हास त्याचा अभिमान वाटतो. या स्पर्धेत भाग घेणे हा प्रत्येक आंतरराष्ट्रीय खेळाडूचा हक्क आहे. माझ्यावर बंदी घालून ते आमचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.’ याबाबत स्वेतलानाने सांगितले, ‘यापूर्वीच्या वाईट अनुभवापासून मी धडा घेतला आहे. यंदा सर्वोत्तम कामगिरी करण्याचा माझा निश्चय आहे. रशियाच्या ध्वजाखाली भाग न घेता ऑलिम्पिक महासंघाच्या ध्वजाखाली भाग घेणे आम्हास मान्य नाही. परदेशातील उत्तेजक प्रतिबंधक प्रयोगशाळेत आम्ही नियमित तपासणी करून घेत असतो. त्यामुळे आम्ही निदरेष आहोत याची आम्हाला खात्री आहे.’ रशियाचे धावपटू चालण्याच्या शर्यतीत अव्वल दर्जाचे खेळाडू मानले जातात. मात्र उत्तेजकाच्या भीतीमुळे रशियाने गत वर्षी जागतिक स्पर्धेत आपल्या खेळाडूंना उतरविले नव्हते. डेनिस ज्या अकादमीत सराव करतो, त्या अकादमीतील तीसहून अधिक खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळले आहेत. त्यामध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अनेक खेळाडूंचा समावेश आहे.Tuesday, 21 June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.
Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.
No comments:
Post a Comment