नवी दिल्ली - व्हॉट्सऍपवरील एंड-टू-एंड इन्क्रिप्शनमुळे (सांकेतिक लिपीबद्ध करून मजकूर सुरक्षित ठेवण्याची प्रक्रिया) दहशतवाद्यांना संवाद साधणे अधिक सोपे झाले आहे. यामुळे व्हॉट्सऍपवर बंदी आणावी, अशी मागणी हरियानातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर यादव यांनी याचिकेद्वारे केली आहे. यावर येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे. व्हॉट्सऍपने एप्रिल महिन्यापासून सुरू केलेल्या या सुविधेमुळे प्रत्येक मेसेज 256-बिट
एन्क्रिप्शनमधून जात असल्याने तो फोडून वाचणे अवघड झाले आहे. असा मेसेज फक्त सेंडरच (मेसेज प्राप्त व्यक्ती) वाचू शकत असल्याने याचा वापर करून दहशतवादी संवाद साधू शकतील व अनेक कारवाया करू शकतील, असे याचिकेत म्हटले आहे. विशेष म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा एखादा संदेश सरकारला हवा असल्यास व्हॉट्सऍप स्वत:ही तो प्राप्त करू शकत नसल्याने हे फारच धोकादायक असल्याचेही यादव यांनी याचिकेत नमूद केले आहे.
यामुळे दहशतवादी किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे चांगलेच फावले असून, भारताचे मात्र नुकसान होत आहे. अशा मेसेजवर भारताच्या गुप्तचर खात्यालाही लक्ष ठेवणे अशक्य असल्याने व्हॉट्सऍपवर बंदी घालावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. हे कोडेड मेसेज ब्रेक करणे "सुपर कॉम्प्युटर‘लाही अशक्य आहे, तसेच 256-बिट एन्क्रिप्टेड असलेला एक संदेश तोडून समजून घेण्यास अनेक वर्षं लागत असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. यादव यांनी याबाबत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) आणि दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयालाही पत्राद्वारे कळविले असून अद्याप त्यांना याबाबत कोणतेही उत्तर मिळालेले नाही.
यांच्यावरही घाला बंदी
व्हॉट्सऍपबरोबरच "हाइक‘, "सेक्युर चॅट‘, "व्हायबर‘ आणि असे अन्य काही मेसेजिंग ऍपही हीच प्रणाली वापरत असल्याने या ऍपचा गैरवापर होण्याच्या शक्यता असल्याने त्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोचवू शकतात, त्यामुळे यांच्यावरही बंदी घालावी, अशी मागणी याचिकेत आहे.
No comments:
Post a Comment