मानवी उत्क्रांतीचे विविध टप्पे आहेत. माणसाने दगडांचा शस्त्रांसाठी उपयोग सुरू केला त्याला ‘स्टोन एज किंवा पाषण युग’ तर धातुचा उपयोग सुरू केला त्याला युगला धातू यूग म्हणतात. निसर्गात उत्क्रांतीचे हे टप्पे सुरूच आहेत. अशाच एका घटनेत शास्त्रज्ञांना थायलंड येथील एका बेटावर माकडांचा एक समूह मासेमारीसाठी आणि कठीण कवचाची फळे फोडण्यासाठी दगडांचा उपयोग शस्त्र म्हणून करत असल्याचे दिसून आले आहे.
माकडांतील या बदलाने शास्त्रज्ञांना अचंबित केले आहे.
या बेटावरील माकडे कधीपासून दगडांचा शस्त्र म्हणून वापर करत आहेत, याचा अजुनही उलगड झालेला नाही.
या बेटाचे नाव पिअँक नाम याई असून हे बेट समुद्राच्या पातळीत वाढ होवून थायलंडच्या मुख्यभूमिपासून बाजुला पडले आहे. बेट स्वतंत्र होण्याची घटनाच आईस एजमधील असल्याचे सांगितले जाते. सहाजिकच या माकडांचाही बेटापलिकडील जगाशी काही संबंध राहिलेला नाही. थायलंडच्या मूख्य भूमिवर फळांची आणि खाद्यांची मुबलक उपलब्धता असल्याने तेथे माकडे दगडांचा शस्त्र म्हणून उपयोग करत नाहीत. पण या बेटावर फळांची संख्या कमी आहे, मासे आणि शिंपले यावर गुजराण करावी लागते. या परिस्थितीमुळे माकड दगडांचा वापर शस्त्रासारखा उपयोग करत आहेत. या माकडांची ५० वर्षांपूर्वीची शस्त्रसामुग्री शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रायमेट आर्किऑलॉजी विभागाच्या प्रमुख मिशेल हसलाम यावर सध्या संशोधन करत आहेत. ‘ही माकडे बेटावरच अडकून पडली होती. ती दगडांचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे. किमान गेली एक हजार वर्षे ती दगडांचा वापर करत असावीत असा अंदाज आहे,’असे ते म्हणाले.
No comments:
Post a Comment