भारताच्या एनएसजी प्रवेशासाठी फ्रान्सने बुधवारी पाठिंबा दिला. भारताच्या सदस्यत्वामुळे आण्विक, रासायनिक, जैविक अथवा पारंपरिक संवेदनशील उत्पादनाच्या व तंत्रज्ञानाच्या निर्यातीवर नियंत्रण राहण्यास मदत होईल, असे फ्रान्सने एका निवेदनात म्हटले आहे. 'भारताचा चार बहुविध निर्यात गटातील (एनएसजी, एमटीसीआर, द ऑस्ट्रेलिया ग्रुप आणि द वॅसेनार अॅरेंजमेंट) प्रवेश अण्वस्रप्रसाराविरोधातील आंतरराष्ट्रीय
प्रयत्नांना मदत करील. भारताच्या एनएसजी प्रवेशाबाबत सोल येथे २३ जून रोजी होणाऱ्या बैठकीत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे फ्रान्स सर्व सदस्यांना आवाहन करीत आहे,' असे फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, एनएसजी प्रक्रिया ही नाजूक आणि गुंतागुंतीची असल्याचे सांगून भारताबाबतच्या कोणत्याही शक्यता सावधपणे व्यक्त करण्याचा सल्ला भारतातील वरिष्ठ अधिका ऱ्यांनी दिला आहे.
जयशंकर सोल दौऱ्यावर रवाना
नवी दिल्ली : अणुपुरवठादार देश अर्थात, 'एनएसजी' देशांच्या बैठकीला आजपासून दक्षिण कोरियामध्ये प्रारंभ होत असून, 'एनएसजी'चे सदस्यत्व मिळविण्यासाठी उत्सुक असलेल्या भारताची बाजू मांडण्यासाठी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर बुधवारी सोलच्या दिशेने रवाना झाले. चीन आणि काही देशांनी भारताच्या सदस्यत्वाला विरोध केला आहे.
No comments:
Post a Comment