बेंगळूरमधील पहिली महिला कॅब चालक भारती विराथ (३९) हिनं स्वत:च्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. ती 'उबर' कंपनीसाठी कॅबचालक म्हणून काम करत होती.भारती ही उत्तर बेंगळुरूतील बल्लारी रोडवरील एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहत होती. काल (रविवार) संध्याकाळपासून ती कुठंही न दिसल्यानं चौकशीसाठी तिचे शेजारी आज घरी गेले. तेव्हा ती पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून
आली. पोलिसांना तिच्या मृतदेहाशेजारी किंवा घरात कसल्याही प्रकारची 'सुसाइड नोट' आढळली नाही. त्यामुळं आत्महत्येचं कारण कळू शकलेलं नाही. या प्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून अधिक चौकशी सुरू केली आहे.
मूळची तेलंगणच्या वारंगल जिल्ह्यातील असलेली भारती बेंगळुरूतील पहिली कॅबचालक होती. पुरुषांच्या समजल्या जाणाऱ्या या व्यवसायात उतरण्याच्या तिच्या धाडसाबद्दल तिचे कौतुकही झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून ती 'उबर'साठी काम करत होती. काही दिवसांपासून भारती तिच्या मूळ गावी परतण्याच्या विचारात होती. गॅस कनेक्शन ट्रान्सफर करण्यासाठी तिनं अर्जही केला होता. तसंच, तिनं कंपनीतही नोकरी सोडण्याची सूचना दिली होती. मात्र, गावाला परतण्याआधीच तिनं मृत्यूला कवटाळलं.
No comments:
Post a Comment