Saturday, 25 June 2016

विश्‍वास नांगरे-पाटील नूतन विशेष पोलिस महानिरीक्षक


कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून विश्‍वास नांगरे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. राज्य शासनाने शुक्रवारी दहा वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. भारतीय पोलिस सेवेतील आठ, तर राज्य पोलिस सेवेतील दोन अधिकार्‍यांचा यामध्ये समावेश आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजयकुमार वर्मा यांची मुंबईला पदोन्नतीने बदली झाली होती. यानंतर या पदाचा अतिरिक्त
कार्यभार राज्य राखीव दलाचे पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्नाळ यांच्याकडे देण्यात आला होता. या पदावर शुक्रवारी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथील उपमहानिरीक्षक अजित पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  महिन्याभरापूर्वी नियुक्ती झालेल्या सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक सुनील फुलारी यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अमोघ गांवकर यांची सिंधुदुर्गचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.

विश्‍वास नांगरे-पाटील हे मूळचे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कोकरूड गावचे. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरातील न्यू कॉलेज व राजाराम महाविद्यालयामध्ये झाले. राजाराम महाविद्यालयातील प्री-आय. ए. एस. ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांनी लोकसेवा परीक्षेचा काही काळ अभ्यास केला. कोल्हापूर परिक्षेत्रात यापूर्वी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. मुंबई येथे झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात मुंबई दक्षिणचे एसीपी म्हणून कार्यरत असणार्‍या नांगरे-पाटील यांनी हॉटेल ताजमध्ये घुसून दहशतवाद्यांशी सामना केला होता.

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.