पुण्यातील शासकीय इंजिनीअरिंग कॉलेजच्या (सीओईपी) विद्यार्थ्यांनी विकसित केलेला 'स्वयम्' हा उपग्रह आज सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी अवकाशात झेपावला. सीओईपीच्या विद्यार्थ्यांच्या या यशस्वी कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तसेच या कॉलेजने दुसरा उपग्रह विकसित करण्याचा प्रकल्पही हाती घेतला असून, त्याला भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) हिरवा
कंदील दिला आहे. सीओईपीच्या विद्यार्थ्यांच्या 'स्वयम्' या पहिल्या उपग्रहाचे श्रीहरीकोटा येथील इस्रोच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून 'पीएसएलव्ही सी- ३४' या ध्रुवीय प्रक्षेपकामार्फत सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी यशस्वी प्रक्षेपण झाले. याचे थेट प्रक्षेपण ऑडिटोरियमध्ये दाखवण्यात आले. यावेळी या उपग्रहावर काम करणारे विद्यार्थी तेथे उपस्थित होते. 'स्वयम्'च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे अत्यंत आनंद झाला असून नव्या प्रकल्पावर काम करण्यासाठी आणखी उत्साह मिळाल्याचे विद्यार्थी म्हणाले.
'स्वयम्'साठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत केलेल्या प्रयत्नांमुळे उपग्रहांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रणा कॉलेजकडे तयार झाली आहे. कॉलेजच्या पहिल्या उपग्रहासाठी जवळपास आठ वर्षांचा कालावधी गेला. मात्र, या पुढील टप्प्यात हा कालावधी तीन ते चार वर्षांपर्यंत कमी होणार आहे. त्यानुसार कॉलेजने आपल्या दुसऱ्या उपग्रहाचा प्रस्ताव 'इस्रो'कडे सादर केला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे,' अशी माहिती कॉलेजचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा यांनी यांनी गुरुवारी दिली होती.
No comments:
Post a Comment