जम्मू काश्मीरमधील अनंतनाग विधानसभा पोटनिवडणुकीत काश्मीरच्या मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती विजयी झाल्या आहेत. काँग्रेसचे उमेदवार हिलाल शहा अहमद यांचा त्यांनी पराभव केला. मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूल लागली होती. मेहबुबा यांनी हिलाल यांचा 12805 मतांनी पराभव केला. पीडीपी आणि भाजप यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केल्याने मेहबुबा यांच्या विरोधात नाराजी
असल्याची चर्चा होती. त्या चर्चांना या निवडणुकीमुळे पूर्णविराम मिळाला आहे.
भाजपबरोबर सत्ता स्थापन केल्यानंतर मेहबुबांना आनंतनागची जनता निवडणून देणार का? यामुळे ही निवडणूक उत्सुकतेची बनली होती. शिवाय हिलाल शहा अहमद हे तुल्यबळ उमेदवार होते. मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या विरोधात त्यांचा अल्प मतांनी पराभव झाला होता. या परिस्थितीत मेहबुबा यांच्यासमोरी आव्हान सोपे नव्हते. पण मेहबुबा यांनी ही निवडणूक खेचून आणली.
वैशिष्ट्य म्हणजे नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार हुसेन मिसगर यांना ३ क्रमांकावर समाधान मानावे लागले.
No comments:
Post a Comment