जैसलमेर येथील लाठीमध्ये 15 कोटी वर्षापूर्वीचे डायनासोरच्या पायांचे ठसे सापडले आहेत. जयनारायण व्यास विश्वविद्यालयाच्या भूगर्भ विभागाच्या वैज्ञानिकांनी 15 वर्षाच्या प्रयत्नानंतर याचा शोध लावण्यात यश मिळविले आहे. हे ठसे 'इ्युब्रोनेट्स ग्नेनेरोसेंसिस थेरेपॉड' या डायनासोरचे असल्याचे समोर आले आहे. या पायांच्या ठशावरून डायनासोरचे भव्य शरीर लक्षात येते. या डायनासोरच्या पायाला तीन बोटे असून ती खूप
मोठी आहेत. या ठशाचा अभ्यास करता अशा प्रकारच्या डायनासोरचे अवशेष आतापर्यंत फ्रांन्स, पोलंड, इटली, स्पेन, स्वीडन, अमेरिका या देशात सापडले होते.
या पायांच्या ठशावरून सदर डायनासोरचे पायाचे पंजे 3 सेंटीमीटर होते. अशी माहिती मिळाली आहे. या डायनासोरची उंची तीन मीटर व लांबी पाच ते सात मीटर होती. आता राजस्थानात पायांचे ठसे सापडल्याने त्यांचे अवशेषही सापडतील अशी चर्चा सुरू झाली आहे.
No comments:
Post a Comment