कॅमेर्यांचा इतिहास सांगणारे आणि सर्वांना भूरळ घालेल, असे जगातील सर्वात मोठे कॅमेर्यांचे संग्रहालय गुरगावमध्ये साकारत आहे. ऑगस्टमध्ये हे संग्रहालय खुले करण्यात येणार आहे. या संग्रहालयामुळे फोटोग्राफर्सना आणि तरुण पिढीला कॅमेर्यांचे विविध प्रकार, बदलत जाणारे तंत्रज्ञान, त्याचा इतिहास कळायला मदत होणार आहे. 'द म्युझिओ कॅमेरा-सेंटर ऑफ फोटोग्राफी' हे संग्रहालय आदित्य आर्या आणि
गुरगाव महानगरपालिका यांच्या सहकार्याने उभारणार आहे.
आर्या यांच्याकडे कॅमेर्यांचा सहाशे ते सातशे विविध मॉडेल्स संग्रही आहेत. त्यांच्याकडील कॅमेर्यांचा वाढता संग्रह पाहता संग्रहालयासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यानुसार, १९ ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनाच्या औचित्याने हे संग्रहालय नव्याने खुले होणार आहे. या योजनेचे समर्थक विवेक कालिया म्हणाले, 'खूप कमी वेळेत संग्रहालयाची रचना करणे आव्हानात्मक काम आहे.'
No comments:
Post a Comment