ब्रिटनमधील नागरिकांनी ब्रेक्झिटच्या बाजूने कौल दिल्याचे स्पष्ट होऊ लागल्यावर त्याचा अपेक्षित परिणाम शुक्रवारी भारतीय रुपयावरही दिसला. सुरुवातीच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया तब्बल ८९ पैशांनी घसरला. या घसरणीनंतर रुपया ६८.१७ वर जाऊन पोहोचला. ब्रेक्झिटचे परिणाम शुक्रवारी भारतासह जगातील विविध देशांच्या शेअरबाजारावर दिसले. मुंबई शेअरबाजारामध्ये सुरुवातीच्या सत्रात घसरण पाहायला मिळाली.
त्यानंतर काही वेळ सेन्सेक्स स्थिरावला आणि परत त्यामध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.
देशातील आणि परदेशांतील शेअर बाजारांमध्ये काय घडामोडी घडताहेत, यावर रिझर्व्ह बॅंकेचे पूर्ण लक्ष असून, आवश्यक ते सर्व उपाय केले जातील, असे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून योग्यवेळी आवश्यक ती वित्तीय मदत उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment