Friday 1 July 2016

'तेजस' विमान हवाई दलात दाखल


स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान 'तेजस' आज भारतीय हवाई दलात दाखल झाले. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स कंपनीने तयार केलेली दोन 'तेजस' विमानं हवाई दलात दाखल झाली. हवाई दल हलक्या वजनाच्या लढाऊ विमानांची नवी स्क्वाड्रन तयार करत आहे. या स्क्वाड्रनमधील पहिली दोन 'तेजस' विमानं आजपासून कार्यरत झाली आहेत. 'तेजस'च्या पहिल्या स्क्वाड्रनचे नाव 'फ्लाइंग डॅगर्स' ४५ असे आहे. या
स्क्वाड्रनमध्ये २० विमानं असतील. यातील ४ विमानं कायम राखीव असतील आणि १६ विमानं कार्यरत असतील.

'तेजस' हे विमान 'मिग' विमानांची जागा घेणार आहे. आणखी सहा 'तेजस' विमानं २०१७ च्या अखेरपर्यंत हवाई दलात दाखल होणार आहेत. पाकिस्तानच्या जे एफ - १७ या मूळच्या चिनी बनावटीच्या विमानाला जोरदार टक्कर देण्याची क्षमता 'तेजस'मध्ये आहे.

बेंगळुरूच्या 'एअरक्राफ्ट सिस्टीम टेस्टिंग एस्टाब्लिशमेंट' या ठिकाणी आज (शुक्रवारी) 'तेजस' विमानं हवाई दलात दाखल करुन घेण्याचा कार्यक्रम झाला.

पहिली दोन वर्षे तेजस विमानांची स्क्वाड्रन बेंगळुरू येथे राहील. त्यानंतर तामिळनाडू येथे सुलूर येथे ती हलविण्यात येईल. हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी १७ मे रोजी या विमानांतून पहिल्यांदा उड्डाण केले होते. हे विमान हवाई दलामध्ये दाखल करून घेण्यास अतिशय चांगले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

'मिग'च्या जागी 'तेजस'

'मिग' ही मूळची रशियन विमाने आहेत. मात्र सोवियत रशियाच्या विघटनानंतर 'मिग' विमानांचे दर्जेदार सुटे भाग आणि तांत्रिक सहकार्य मिळवणे भारतासाठी कठीण झाले. जुन्या 'मिग' विमानांचे अपघात वाढले. अखेर सरकारने 'मिग' विमानांचा ताफा टप्प्याटप्प्याने हवाई दलातून निवृत्त करण्याचा निर्णय घेतला. आता 'मिग' विमानांची जागा 'तेजस' विमानं घेतील. मोदी सरकार फ्रान्सच्या 'राफेल' विमानाच्या खरेदी संदर्भात कंपनीशी चर्चा करत आहे. ही चर्चा यशस्वी झाली तर 'तेजस' आणि 'राफेल' विमानांचा ताफा 'मिग' विमानांची जबाबदारी पूर्णपणे स्वीकारणार आहे. 

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.