Wednesday, 27 July 2016

आयसीसी क्रमवारीत अश्विन अव्वल


गोलंदाजी व अष्टपैलू खेळाडूंमध्ये भारतीय फिरकीपटूचा दबदबा. भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने पहिली कसोटी एक डाव व ९२ धावांनी जिंकली.

या वर्षांच्या सुरुवातीला अश्विनला अव्वल स्थान गमवावे लागले होते, परंतु विंडीजविरुद्ध ८३ धावांत सात गडी बाद करून त्याने ते पुन्हा मिळवले. याचबरोबर त्याने फलंदाजांच्या यादीतही तीन स्थानांची सुधारणा करून ४५वे स्थान पटकावले. अश्विनने (७/८३ व ११३ धावा) अष्टपैलू खेळ  करून अष्टपैलू खेळाडूंमध्ये असलेल्या अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत केली. अश्विनने पाकिस्तानचा फिरकीपटू यासिर शाहला मागे टाकून गोलंदाजांच्या क्रमवारीत भरारी घेतली. यासीरने गेल्या आठवडय़ात इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत दहा गडी बाद केले होते. मात्र, दुसऱ्या कसोटीत त्याला केवळ एका बळीवर समाधान मानावे लागले आणि त्यामुळे त्याची पाचव्या स्थानी घसरण झाली. इंग्लंडचे जेम्स अ‍ॅण्डरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या, तर दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन चौथ्या स्थानावर आहे. विंडीजविरुच्या कसोटीनंतर अश्विनने पाच गुणांची कमाई करून ८७६ गुणांसह अव्वल स्थान काबीज केले. मात्र, अवघ्या एका गुणाच्या फरकाने अ‍ॅण्डरसन (८७५) दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने (७/१०८) दुसऱ्या कसोटीतील दमदार कामगिरीच्या जोरावर २३वरून दहाव्या स्थानावर झेप घेतली. भारताचा उमेश यादव आणि मोहम्मद शमी अनुक्रमे २४ व २८व्या स्थानावरर आहेत.
फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथने (९२५) अव्वल स्थान कायम राखले आहे. इंग्लंडच्या जो रूट आणि अ‍ॅलिस्टर कुक यांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. पाकिस्तानविरुद्ध २५४ व नाबाद ७१ धावांची खेळी करणाऱ्या रूटने दुसऱ्या स्थानी, तर १०५ व नाबाद ७६ धावांची खेळी करणाऱ्या कुकने चार स्थानांची सुधारणा करत नवव्या स्थानी झेप घेतली.  कर्णधार विराट कोहलीने दोन स्थान आगेकूच करत १२वा क्रमांक पटकावला.

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.