Friday 22 July 2016

यंदाच्या वर्षांतील सहा महिने सर्वात उष्ण

यंदाच्या वर्षी पहिले सहा महिने हे उपग्रह नोंदणी सुरू झालेल्या १९७९ या वर्षांपासून सर्वात उष्ण होते व आक्र्टिकमधील बर्फही सर्वात कमी होते, असे नासाने म्हटले आहे. जागतिक पृष्ठीय तापमान व आक्र्टिकवरील बर्फाचे प्रमाण या दोन्ही घटकांचा विचार हवामान बदलांचे निदर्शक म्हणून केला जातो. या दोन्ही घटकांनी पहिल्या सहा महिन्यातच विक्रम मोडला असल्याचे नासाने उपग्रहाच्या माहितीचे विश्लेषण
केल्यानंतर म्हटले होते.  २०१६ या वर्षांतील पहिले सहा महिने जागतिक पातळीवर जास्त तापमानाचे होते. तापमानाची नोंद १८८० पासून सुरू आहे, ती बघता हा आधुनिक काळातील तापमानाचा विक्रम आहे, असे नासाच्या ‘गोडार्ड इन्स्टिटयूट ऑफ स्पेस स्टडीज’च्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. जानेवारी ते जून हे सर्वात उष्ण अर्धवर्ष मानले जात असून त्यात १९ व्या शतकाच्या तुलनेत तापमानामध्ये सरासरी १.३ अंश वाढ झाली आहे. पहिले पाच महिने आक्र्टिक भागातील बर्फाचे प्रमाण नीचांकी होते. १९७९ पासून बर्फाची नोंद उपग्रहांच्या माध्यमातून घेतली जात असून त्यात इतके कमी बर्फ कधीच नव्हते, असे वैज्ञानिकांचे मत आहे. मार्चमध्ये बर्फाचे प्रमाण कमी असण्याचा क्रम सहा महिन्यातील दुसरा होता. कार्बन डायॉक्साईड व हरितगृहवायू वातावरणात अडकून पडल्याने हा परिणाम झाला आहे. आक्र्टिक सागरातील बर्फ १९७० च्या उन्हाळ्यात व १९८० च्या सुरूवातीला होते त्यापेक्षा ४० टक्के कमी भागात दिसून आले. आक्र्टिक सागरात सप्टेंबरमध्ये वार्षिक चक्रात बर्फाचे प्रमाण दशकामागे १३.४ टक्के कमी झाले आहे. एल निनो या कटीबंधीय पॅसिफिक परिणामामुळे ऑक्टोबरनंतर तापमान वाढत गेले होते, असे जीआयएसएसचे संचालक गव्हीन श्मिडट यांनी सांगितले. गेल्या एल निनोच्या वेळी तापमान जास्त होते, तो काळ १९९८ मधील होता.यावर्षी एल निनोचा प्रभाव कमी होत असला तरी जागतिक तापमान गेल्या १८ वर्षांपेक्षा जास्त झाले आहे कारण एकूणच उष्णतामानात वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर तापमान वाढीचा कल कायम असून आक्र्टिकमध्येही ते जास्त आहे, असे नासाच्या गोडार्ड केंद्राचे सागरी बर्फ तज्ज्ञ वॉल्ट मियर यांनी सांगितले. हवामानाचे वेगळे अनुभव या सहा महिन्यात आले असून कमी बर्फ व जास्त तापमान त्यात नोंदले गेले आहे.

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.