Tuesday 19 July 2016

पृथ्वीपासून २५० दशलक्ष प्रकाश वर्षे अंतरावरील फ्रँकेन्स्टीन दीर्घिकेचा शोध -

पृथ्वीपासून २५० दशलक्ष प्रकाश वर्षे अंतरावर इतर दीर्घिकांचे भाग गिळणारी (धारण करणारी) फ्रँकेन्स्टीन दीर्घिका सापडली आहे. नवीन संशोधनानुसार यूजीसी १३८२ ही दीर्घिका जुनी, लहान व नेहमीसारखी वाटत होती. नासाच्या दुर्बणींनी दिलेल्या माहितीच्या आधारे केलेल्या संशोधनानुसार ही दीर्घिका पूर्वी वाटत होती त्यापेक्षा १० पट मोठी आहे. इतर दीर्घिकांपेक्षा तिचा आतील भाग ताजा आहे व बाहेरचा भाग जुना वाटतो.
काही सुटय़ा भागांनी ती तयार झाली असावी असे भासते. फ्रँकस्टेन दीर्घिका दुर्मीळ असून ती टिकून राहिली याचे कारण ती विश्वाच्या दीर्घिकांच्या गर्दी असलेल्या भागात नाही, असे कार्नेगी इन्स्टिटय़ूशन फॉर सायन्स या संस्थेचे मार्क सिबर्ट यांनी सांगितले. ती अतिशय गुंतागुंतीची असून शेजारच्या दीर्घिकांचा थोडा धक्का बसला तरी या दीर्घिकेत उलथापालथ होते. सीबर्ट व ली हागेन या पेनसिल्वानिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, अंडाकार दीर्घिकात तयार झालेल्या ताऱ्यांचा आम्ही शोध घेत आहोत. या दीर्घिका फुटबॉल मैदानाच्या आकाराच्या आहेत. खगोलशास्त्रज्ञांच्या मते यूजीसी १३८२ त्यातील एक आहे. अतिनील किरणात या दीर्घिकांच्या प्रतिमा बघितल्या व नासाच्या गॅलेक्सी इव्होल्यूशन एक्सप्लोरर यंत्राने माहितीचा अभ्यास केला तर त्यातून काही सर्पिलाकार बाहू दीर्घिकेच्या बाहेरच्या भागात दिसतात जे कधी दिसले नव्हते. अंडाकार दीर्घिकात असे बाहू सहसा नसतात असे त्यांचे म्हणणे आहे. इतर दुर्बिणींच्या मदतीने अवरक्त किरणांच्या मदतीने अभ्यास केला असता या गूढ दीर्घिकेचे नवे प्रारूप सामोरे येते. यूजीसी १३८२ ही दीर्घिका ७१८००० प्रकाश वर्षे रूंद आहे व आपल्या आकाशगंगेच्या सात पट मोठी आहे. पण या दीर्घिकेच्या सुटय़ा भागांचे वय वेगळे आहे. अनेक दीर्घिकांत आतील भाग आधी तयार होतो व त्यात जुने तारे असतात. दीर्घिका वेगाने वाढतात व बाहेरच्या बाजूला नवे तारे तयार होतात पण या दीर्घिकेच्या बाबतीत तसे नाही. तिच्या आत तरूण तारे आहेत. भोवतालच्या सर्पिलाकार दीर्घिकेपेक्षा ती बाजूच्या भागात जुनी व आत तरूण वाटते. एकतर यात आधी लहान दीर्घिकांचा संच असावा व नंतर त्यात वायू व कृष्णद्रव्य असावे, ते दिसत नाही ते विश्वातील ऊर्जा व द्रव्याच्या २७ टक्के असावे. नंतर या दीर्घिकेच्या शेजारी सर्पिलाकार बाहू नसलेली लेंटीक्युलर दीर्घिका बनली असावी. तीन अब्ज वर्षांपूर्वी लहान दीर्घिका लेंटिक्युलर दीर्घिकांच्या कक्षेत ओढल्या गेल्या असाव्यात व त्यातून चकतीसारख्या दीर्घिका बनल्या असाव्यात, असे अ‍ॅस्ट्रॉफिजिकल जर्नलमध्ये म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.