बक्षीस रकमा समान झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय स्पर्धा खेळणाऱ्या दीपिका पल्लीकलने जेतेपद पटकावत आपल्या नावाची मोहर उमटवली. मुंबईतील ऑटर्स क्लब येथे आयोजित ७३व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत, महिला गटाच्या अंतिम लढतीत दीपिकाने जोश्नावर ३-१ असा विजय मिळवला. अंतिम लढतीत दीपिकाने ४-११, ११-६, ११-२, ११-८ अशी बाजी मारली. पुरुष आणि महिला खेळाडूंना समान बक्षीस
रक्कम नसल्याने दीपिकाने २०११ नंतर राष्ट्रीय स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. बक्षीस रकमा समान झाल्याने खेळणाऱ्या दीपिकाने तब्बल १२ राष्ट्रीय जेतेपदे नावावर असणाऱ्या जोश्नाला नमवत दीपिकाने वर्चस्व सिद्ध केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.
Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.
No comments:
Post a Comment