Wednesday 27 July 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-27-07-2016-www.KICAonline.com-Marathi


जगभरात पोकेमॉन गोया गेमच्या नादात काहींनी आपला जीव गमावला तर अनेक जण हा गेम खेळण्यासाठी रात्री अपरात्री रस्त्यावर चालू लागलेत. जगभरातील तंत्रप्रेमींना अशी भुरळ घालणारा गेम ज्या ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीच्या भक्कम पायावर उभा आहे तो पाया रचणाऱ्यांत एका भारतीयाचे नाव अग्रेसर आहे. इतकेच नव्हे तर सहावी संवेदना (सिक्स्थ सेन्स), परिधेय उपकरणांसाठीचे आवश्यक तंत्रज्ञान असे एक ना
 

प्रणव मिस्त्री


जगभरात ‘पोकेमॉन गो’ या गेमच्या नादात काहींनी आपला जीव गमावला तर अनेक जण हा गेम खेळण्यासाठी रात्री अपरात्री रस्त्यावर चालू लागलेत. जगभरातील तंत्रप्रेमींना अशी भुरळ घालणारा गेम ज्या ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीच्या भक्कम पायावर उभा आहे तो पाया रचणाऱ्यांत एका भारतीयाचे नाव अग्रेसर आहे. इतकेच नव्हे तर सहावी संवेदना (सिक्स्थ सेन्स), परिधेय उपकरणांसाठीचे आवश्यक तंत्रज्ञान असे एक ना

अरुंधती घोष


जीनिव्हा येथे १९९६ साली झालेल्या ज्या ‘र्सवकष अण्वस्त्र चाचणीबंदी करार’ (सीटीबीटी- काम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट बॅन ट्रिटी) संबंधी जागतिक परिषदेत अरुंधती घोष यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. त्या कराराच्या नावातील ‘काम्प्रिहेन्सिव्ह’ शब्दाप्रमाणेच त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. १९६३ साली भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाल्यानंतर चार दशकांहून अधिक कार्यकाळात या क्षेत्रातील प्रत्येक घडामोडीवर त्यांची छाप होती. त्यांची

१० टक्के वृद्धिदराचा ‘नॅसकॉम’ला विश्वास

इन्फोसिस, विप्रोसारख्या आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांकडून तिमाहीत वित्तीय निष्कर्षांत निराशा नोंदवली गेली असली तरी चालू आर्थिक वर्षांसाठी भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यवसाय दुहेरी अंकातील व्यवसाय वाढ राखेलच, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘नॅसकॉम’ने २०१६-१७ करिता व्यवसाय वाढ १० ते १२ टक्के असेल, असे नमूद केले

‘फॉर्च्युन ५००’ यादीत भारतातून आयओसी अव्वल


जागतिक स्तरावर बडय़ा कंपन्या म्हणून गणले जाणाऱ्या फॉच्र्युन ५००च्या ताज्या यादीत सात भारतीय कंपन्यांनी स्थान मिळविले आहे. सार्वजनिक तेल व वायू विक्री व विपणन क्षेत्रातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने यामध्ये अव्वल स्थान मिळविले आहे. तर याच क्षेत्रातील ओएनजीसी यादीतून बाहेर पडली आहे. तिची जागा खासगी क्षेत्रातील रत्न व दागिने निर्मिती क्षेत्रातील राजेश एक्स्पोर्ट्सने घेतली आहे. महसुलाबाबत

वित्तीय समावेशकतेत भारताची कामगिरी अव्वल


बँक अथवा कोणत्याही वित्तीय सेवेशी कसलाही संबंध नसलेल्या तब्बल २० कोटी लोकांचे आर्थिक समावेशकतेची कामगिरी करून भारताने या आघाडीवर सर्वोत्तम परिणाम दाखवून दिले आहेत, असे मत ‘बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (बीसीजी)’ या जागतिक सल्लागार संस्थेच्या ताज्या अहवालाने व्यक्त केले आहे.देशाच्या आर्थिक प्रगतीत तळागाळातल्या नागरिकांच्या उत्कर्षांला तितकेच महत्त्व देणारी भारताने

स्टेट बँक विलीनीकरण कर्मचारी कपातीविना!


अर्थमंत्री जेटली यांची लोकसभेत ग्वाही. स्टेट बँकेतील प्रस्तावित विलीनीकरणानंतरही तिच्या पाच सहयोगी बँकांमधील कर्मचाऱ्यांमध्ये कपात केली जाणार नाही, असा निर्वाळा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी दिला. लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. स्टेट बँकेत पाच सहयोगी बँकांसह भारतीय महिला बँकेच्या विलीनीकरणाला गेल्या महिन्यात सरकारने मंजुरी दिली.  

‘ओपीडी’तील उपचार खर्चानाही आरोग्य विम्याचे कवच




‘तुमचा ग्राहक जाणून घ्या’ अंतर्गत कायदेशीर बाबींची पूर्तता न केले प्रकरणात रिझव्‍‌र्ह बँकेने देशातील आघाडीच्या एचडीएफसी बँकेला २ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर गेल्या वर्षांतील ६,१०० कोटी रुपयांच्या गैर व्यवहार प्रकरणात सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाला ५ कोटी रुपयांचा दंड जाहीर झाला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या ऑक्टोबर २०१५ च्या वृत्ताच्या अहवाल आधारावर

दूरसंचार क्षेत्राकडून अपेक्षित महसुलाचे लक्ष्य चुकणार!


चालू आर्थिक वर्षांसाठी दूरसंचार कंपन्यांकडून अंदाजण्यात आलेले ९८,९९५ कोटी रुपये महसुलाचे लक्ष्य साधणे सरकारला अवघड जाईल, असा आघाडीची पत मानांकन संस्था ‘इक्रा’ने मंगळवारी एका अहवालाद्वारे निष्कर्ष मांडला. तथापि आगामी १० वर्षांत मात्र या उद्योगक्षेत्राकडून पाच ते सहा लाख कोटी रुपयांच्या घरात महसुलाची अपेक्षा करता येईल. आर्थिक वर्ष २०१६-१७च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार,

बोल्टचे ‘सुसाट’ पुनरागमन!


२०० मीटर शर्यतीत विजय; केंड्राचा विश्वविक्रम. दुखापतीमुळे काही काळ मैदानापासून दूर गेलेल्या जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टने लंडन येथील मैदानी स्पध्रेत त्याच्या प्रतिमेप्रमाणे ‘सुसाट’ पुनरागमन केले. त्याने २०० मीटर शर्यतीत सहज विजय मिळवून उपस्थित ४० हजार प्रेक्षकांना सुखद धक्का दिला. मात्र, याचवेळी अमेरिकेच्या केंड्रा हॅरिसन हीने १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीतील २८ वर्षांचा विश्वविक्रम मोडला.

‘एमसीए’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार – शरद पवार


राजकारण आणि भारतीय क्रिकेट मंडळातील प्रभावी आणि गाजलेल्या काही नावांमध्ये अग्रस्थानी असलेल्या शरद पवार यांना मुंबई क्रिकेट मंडळाच्या (एमसीए) अध्यक्ष पदावरुन काढता पाय घ्यावा लागणार आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्या शरद पवार यांनी आपल्याला न्यायालयाचे निर्णय मान्य आहेत, असे सांगत अध्यक्षपद सोडण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत.

नीरजची विक्रमी भालाफेक


कनिष्ठ गटात जागतिक विक्रमासह सुवर्णपदकाची कमाई . युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स २० वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेत कनिष्ठ गटात नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली. ८६.४८ मीटर अंतरावर भाला फेकत नीरजने सुवर्णपदक पटकावले. प्राथमिक फेरीत नीरजने ७९.६६ मीटर अंतरावर भाला फेकला होता. मात्र दुसऱ्या फेरीत त्याने ८६.४८ अंतरावर भाला फेकला. २० वर्षांखालील गटात ८४.६९

ऑलिम्पिकमध्ये रशियावर सरसकट बंदी नाही


रशिया क्रीडापटूंचा सहभागाचा निर्णय क्रीडा संघटनांकडे सरकार पुरस्कृत उत्तेजक सेवनप्रकरणी रशियाच्या चमूवर रिओ ऑलिम्पिकमध्ये सरसकट बंदी न घालण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने घेतला. रिओ ऑलिम्पिकमध्ये रशियाच्या खेळाडूंना सहभागी होऊ देण्याचा निर्णय समितीने प्रत्येक खेळाच्या संघटनेवर सोपवला आहे. रिओमध्ये सहभागासाठी इच्छुक रशियाच्या क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक

द्रोणावली हरिकाची उत्तुंग झेप!


जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर भारताची ग्रँडमास्टर द्रोणावली हरिकाने जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी झेप घेतली. तिने पाच स्थानांच्या सुधारणेसह ही मजल मारली.
चेंगडू येथे नुकत्याच पार पडलेल्या फिडे महिला ग्रा. प्रि. स्पध्रेत हरिकाने जेतेपद पटकावले होते आणि सध्या ती चीन बुद्धिबळ लीगमध्ये खेळत आहे. मंगळवारी तिने सलग तिसऱ्या विजयाची नोंद करून शँडाँग संघाला

आयसीसी क्रमवारीत अश्विन अव्वल


गोलंदाजी व अष्टपैलू खेळाडूंमध्ये भारतीय फिरकीपटूचा दबदबा. भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने पहिली कसोटी एक डाव व ९२ धावांनी जिंकली.

Rio Olympics : नरसिंग यादवची रिओवारी हुकली; कुस्ती महासंघाकडून प्रवीण राणाची निवड


महाराष्ट्राचा कुस्तीपटू नरसिंग यादव याची रिओ ऑलिम्पिकची वारी हुकल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. भारतीय कुस्ती महासंघाकडून नरसिंगऐवजी प्रवीण राणा याची निवड करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीत नरसिंग यादव दोषी आढळला होता. मात्र, आपल्याविरुद्ध कटकारस्थान रचण्यात आल्याचा आरोप करत नरसिंगने याप्रकरणाच्या चौकशीची

रिओतील उत्तेजक प्रतिबंधक प्रयोगशाळेवरील बंदी अखेर उठवली


रिओ येथील उत्तेजक प्रतिबंधक प्रयोगशाळा लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीने (वाडा) त्यांच्यावरील बंदीचा निर्णय मागे घेतला. उत्तेजक प्रतिबंधक प्रयोगशाळांकरिता असलेल्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार ही प्रयोगशाळा नसल्यामुळे २२ जून रोजी ‘वाडा’ने त्यावर बंदी घातली होती. ही प्रयोगशाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची राहील, असे आश्वासन येथील क्रीडा मंत्रालय व ब्राझील उत्तेजक प्रतिबंधक

ऑलिम्पिक पदकावर ब्राझीलच्या युवतीची छबी


यंदाच्या ऑलिम्पिक पदकावर ग्रीक देवतेची छबी या वेळी पाहायला मिळणार नसून त्या ऐवजी येथील सौंदर्यवती युवतीची छबी पाहायला मिळणार आहे. ऑलिम्पिकसाठी पदके तयार करण्याची जबाबदारी शिल्पकार नेल्सन कार्नेरो यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांनी एकूण ५ हजार १३० कांस्य, रौप्य व सुवर्णपदके तयार केली आहेत. नेल्सन यांनी सांगितले, ‘ही पदके तयार करताना नाईके या ग्रीक देवतेच्या

‘आयएनएस विराट’ निघाली अखेरच्या प्रवासाला


जगातील सर्वाधिक कार्यरत राहिलेली युद्धनौका हा बहुमान लाभलेली ‘आयएनएस विराट’ ही भारतीय नौदलातील विमानवाहू युद्धनौका आज तिच्या शेवटच्या प्रवासाला मुंबईच्या नौदल तळावरुन कोच्चीकडे निघाली. कोच्ची येथे आयएनएस विराटची आवश्यक देखभाल दुरुस्ती केली जाईल. नौदलाच्या पश्चिम मुख्यालयात हेलिकॉप्टर आणि जलद गस्ती नौकांनी यावेळी विराटला सोबत केली. जवळपास ५७ वर्षे सेवा

मंगळ मोहिमेचा सागरातही सादृश्यीकरणाने सराव


नासाने मंगळ मोहिमेचा सराव करण्यासाठी खगोलवैज्ञानिकांचे एक पथक अटलांटिक महासागराच्या तळाशी पाठवले आहे. मंगळावरील मोहिमेत अंतराळात खोलवर जावे लागणार आहे त्यासाठी हा सराव घेण्यात येत आहे. या सागरात गेलेल्या अंतराळवीरांना अक्वॅ नॉट म्हणजे महासागरवीर असे म्हटले जात आहे.  गरातील मोहिमेत निळा सागर व लाल भूमी यातील काही गोष्टी मंगळावर व पृथ्वीवर समान आहेत असे मानले जाते.

नेपाळचे पंतप्रधान ओली यांचा राजीनामा


अविश्वास प्रस्तावापूर्वीच पायउतार; मधेशी अल्पसंख्यकांना यश. नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी अखेर राजीनामा दिला आहे. संसदेमध्ये अविश्वास प्रस्तावावर उत्तर देण्यापूर्वीच त्यांनी आपले पद सोडले आहे. ओली यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती बिंदिया देवी भंडारी यांच्याकडे सादर केला आहे. संसदेमध्ये मागील तीन दिवसांमध्ये अविश्वास प्रस्तावावर जोरदार चर्चा सुरू होती. आणि रविवारी ओली यांना त्यावर

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानची निर्दोष मुक्तता

राजस्थान उच्च न्यायालयाने सोमवारी १९९८ सालच्या काळवीट शिकार प्रकरणात बॉलीवूड अभिनेता सलमान खान याची निर्दोष मुक्तता केली. सलमान खान आणि अन्य सात जणांविरुद्ध काळवीट आणि चिंकाराची शिकार केल्याचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. १९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान कंकणीजवळ सलमान व त्याच्या सहकाऱ्यांनी चिंकारा काळविटाची शिकार

प्रसिद्ध सर्च इंजिन असलेल्या YAHOO ची होणार विक्री!


जगातील मोठ्या सर्च इंजिन्सपैकी एक असलेल्या ‘याहू’ ची विक्री होणार आहे. याहूचा व्यवसाय ३३ हजार ५०० कोटी रूपयांना व्हेरिझॉन कम्युनिकेशन्स विकत घेणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘याहू’ ला गुगल आणि फेसबुककडून कडवी झुंज मिळत आहे. या कंपन्यांमुळे ‘याहू’च्या नफ्यात देखील गेल्या अनेक वर्षांपासून घट होत आहे. ‘याहू’सोबत झालेल्य या करारामुळे व्हेरिझॉनच्या ‘एओएल इंटरनेट’ व्यवसायाला

सुप्रीम कोर्टाकडून अपवादात्मक परिस्थितीत गर्भपाताला मान्यता


सर्वोच्च न्यायालयाकडून सोमवारी अपवादात्मक परिस्थितीत गर्भपात करण्याला मान्यता देण्यात आली. तपासणीवेळी गर्भात दोष आढळल्यास किंवा मातेचा जीव धोक्यात असल्यास गर्भपात करता येईल, असे न्यायालयाने निकालात सांगितले. यापूर्वीच्या कायद्यानुसार २० आठवड्यांनंतर गर्भपात करता येत नव्हता. मात्र, न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याला परवानगी मिळाली आहे.

महासागरांच्या तळाशी हायड्रोजनचे मोठय़ा प्रमाणात साठे


महासागरांच्या तळाशी हायड्रोजन मोठय़ा प्रमाणावर असून तेथील प्रस्तरांखाली असलेल्या खडकांमध्ये तो दडलला आहे. आतापर्यंत हे कधीच लक्षात आले नसले तरी या हायड्रोजनमुळेच पृथ्वीवर जीवसृष्टीची निर्मिती होऊ शकली असे मानले जाते. जर खरोखर मोठय़ा प्रमाणात हायड्रोजनचे स्रोत सागराच्या तळाशी सापडले तर जीवाश्म इंधनांना पर्याय निर्माण होऊन प्रदूषण वाचणार आहे कारण हायड्रोजनच्या ज्वलनातून पाणी तयार

Missing Plane: बेपत्ता विमानातील कर्मचाऱ्यांच्या वाचण्याची आशा धूसर


बंगालच्या उपसागरात बेपत्ता झालेल्या भारतीय हवाईदलाच्या एएन-३२ विमानाची व्यापक शोधमोहीम चार दिवसांपासून सुरू असूनही, विमानाचे अवशेष किंवा प्रवासी यांचा अद्यापही थांगपत्ता न लागल्याने या विमानातील २९ लोक जिवंत सापडण्याची आशा मावळली आहे. या विमानातील ‘इमर्जन्सी लोकेटर ट्रान्समीटर’ (ईएलटी) काम करत नसणे, ही चिंतेची बाब असून त्यामुळे शोधमोहीम आणखी कठीण बनली

व्हेरिझॉनकडून ‘याहू’ची खरेदी!


४.८३ अब्ज डॉलर्स मोजणार; वर्षभरात व्यवहार.इंटरनेट विश्वातील महत्त्वाची कंपनी असलेली ‘याहू’च्या विक्रीचा व्यवहार दृष्टिपथात आला आहे. अमेरिकेचीच व्हेरिझॉन कम्युनिकेशन्स कंपनी ४.८३ अब्ज डॉलर्स मोजून ‘याहू’ खरेदी करणार आहे. त्याद्वारे डिजिटल जाहिरात आणि माध्यम व्यवसायात मोठी वाढ होण्याची आशा व्हेरिझॉन कम्युनिकेशन्सने व्यक्त केली आहे. व्हेरिझॉन कम्युनिकेशन्स कंपनीने गेल्या वर्षी

सरकारकडून सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची अधिसूचना जारी


केंद्र सरकारकडून मंगळवारी सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची अधिसूचना जारी करण्यात आली.  २५ जुलै २०१६ रोजी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या अधिसूचनेची अंमलबजावणी त्वरित झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ऑगस्ट महिन्याच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने जून महिन्यात सातव्या वेतन आयोगाच्या प्रस्तावाला

‘कारगिल विजय दिना’निमित्त मोदींनी वाहिली ट्विटरवरून श्रद्धांजली


आजच तो ऐतिहासिक क्षण होता जेव्हा भारतीय सैन्याने जीवाची बाजी लावून कारगिलचे युद्ध जिंकले. या विजयाचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने भरून येते. आज संपूर्ण देशभरात १७ वा ‘कारगिल विजय दिवस’ साजरा केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून या युद्धात प्राण गमावलेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहिली. ‘देशासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढलेल्या प्रत्येक

कामचुकार कर्मचाऱ्यांना चाप!


वार्षिक वेतनवाढ रोखणार; सातव्या वेतन आयोगासाठी अधिसूचना. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी केंद्र सरकारने अधिसूचना जारी करतानाच कामचुकार कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने मंगळवारी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची अधिसूचना जारी केली. सेवेच्या

पारंपरिक इंधनाचा थेंबही न वापरता सौर विमानाची जगप्रदक्षिणा पूर्ण


सोलर इम्पल्स २ या सौर विमानाने इंधनाचा थेंबही खर्च न करता जगप्रदक्षिणा पूर्ण केली असून त्यामुळे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. सौर विमानाचा हा प्रवास ऐतिहासिक मानला जात आहे. सोलर इम्पल्स हे विमान गेल्या वर्षी नऊ मार्चला जगप्रवासासाठी निघाले होते ते शेवटच्या टप्प्यात कैरोहून ४८ तासात अबुधाबीला पोहोचले. हे विमान येथे पोहोचल्यानंतर अल बटीन एक्झिक्युटिव्ह

जीएसटीवर सर्व राज्यांची सहमती


एक टक्का कर रद्द; सुधारित विधेयक लवकरच. सर्वाचे लक्ष लागलेल्या वस्तू आणि सेवा कर विधेयकातील (जीएसटी) एक टक्का अतिरिक्त शुल्क रद्द करण्याबरोबरच संभाव्य महसूल नुकसानीची भरपाई राज्यांना पुढील पाच वर्षांसाठी देण्याची एकमुखी शिफारस मंगळवारी केंद्र सरकारला करण्यात आली. सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या परिषदेमध्ये राज्यांनी जीएसटीवर पुन्हा एकदा सर्वसहमती व्यक्त केली असून, त्यांच्या तीन

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे हिलरी क्लिंटन यांना राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी


डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी हिलरी क्लिंटन यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेने राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी जिंकली आहे. फिलाडेल्फियामध्ये डेमोक्रेटिक पार्टीच्या राष्ट्रीय संमेलनात त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली. हिलरी यांचे डेमोक्रॅटिक पक्षातील कट्टर प्रतिस्पर्धी बर्नी सँडर्स यांनी त्यांच्या उमेदवारीला याआधी विरोध

‘कोहिनूर हिऱ्यावर भारताचा कायदेशीर हक्क नाही’

कोहिनूर हिऱ्यावर भारताचा कायदेशीर हक्क नसल्याचे इंग्लंडकडून स्पष्ट करण्यात आल्यामुळे हा हिरा भारतात परत आणण्याच्या आशा आणखी धुसर झाल्या आहेत. कोहिनूर हिरा भारताला परत करण्यासाठी इंग्लंड सरकार बांधिल नाही. कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास कोणताही कायदेशीर आधार नाही, असे ब्रिटनचे आशिया आणि पॅसिफिक मंत्री अलोक शर्मा यांनी सांगितले. जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा ईस्ट इंडिया

भारताच्या टी.एम.कृष्णा आणि बेझवाडा विल्सन यांना मॅगसेसे पुरस्कार


सुप्रसिद्ध कर्नाटकी संगीतकार टी.एम. कृष्णा आणि सामाजिक कार्यकर्ते बेझवाडा विल्सन या दोन भारतीयांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. इतर तिघांमध्ये फिलिपाईन्सचे कोंकिथा कारपिओ-मोरालेस, इंडोनेशियाचे डॉम्पेट दुआफा , जपान ओव्हरसीज कॉर्पोरेशन आणि लाओस येथील व्हिएतियन रेस्क्यू या संस्थांचा समावेश आहे. चेन्नईच्या ४० वर्षीय टी.एम. कृष्णा सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील

शतकोत्तरी ‘शकुंतला’च्या ब्रॉडगेजसाठी १५०० कोटी मंजूर


शंभरी पार केलेल्या आणि आजही ‘क्लिक निक्सन’ या  ब्रिटीश कंपनीच्या ताब्यात असलेल्या यवतमाळ-मूर्तीजापूर या ‘शकुंतला’ नावाने परिचित नॅरोगेज रेल्वेचे अखेर ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी केंद्र सरकारने १५०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती सेना नेत्या खासदार भावना गवळी यांनी दिली. उल्लेखनीय म्हणजे, संपूर्ण देशात यवतमाळ-मूर्तीजापूर-अचलपूर व पुलगाव-आर्वी या फक्त विदर्भातच

ताडोबातील व्याघ्रवैभव आता जगाच्या नकाशावर


जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघाचे छायाचित्र असलेल्या टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या डाक विभागाने घेतला असून हे व्याघ्रवैभव जगाच्या नकाशावर आणण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. येत्या २९ जुलैला जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून हे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात येणार आहे.

Friday 22 July 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-22-07-2016-www.KICAonline.com-Marathi


मायकल एलियट हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील अध्यापनाचे क्षेत्र सोडून तीन दशकांपूर्वी पत्रकारितेकडे वळले होते. असे व्यवसायान्तर काही जण करतात, पण ते यशस्वी होतातच असे नाही. एलियट मात्र पत्रकारितेत कमालीचे यशस्वी झाले. पत्रकारितेत आल्यानंतर बडय़ा व्यक्तींना भेटता येते, अनेक महत्त्वाच्या घटनांचे जवळून साक्षीदार बनता येते हे त्यांच्या बाबतीत खरे होते, कारण ते आंतरराष्ट्रीय

मायकल एलियट


मायकल एलियट हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील अध्यापनाचे क्षेत्र सोडून तीन दशकांपूर्वी पत्रकारितेकडे वळले होते. असे व्यवसायान्तर काही जण करतात, पण ते यशस्वी होतातच असे नाही. एलियट मात्र पत्रकारितेत कमालीचे यशस्वी झाले. पत्रकारितेत आल्यानंतर बडय़ा व्यक्तींना भेटता येते, अनेक महत्त्वाच्या घटनांचे जवळून साक्षीदार बनता येते हे त्यांच्या बाबतीत खरे होते, कारण ते आंतरराष्ट्रीय

मुबारक बेगम


ऐन उमेदीच्या काळात लोकप्रियतेच्या शिखरावर स्वार होऊन रसिकांच्या मनावर राज्य गाजवणाऱ्या अनेक कलावंतांवर त्यांच्या उत्तरायणात मात्र विस्मृतीच्या गर्तेत गटांगळ्या खात अखेरची घटका मोजण्याची वेळ येते. अशाच अवस्थेत जन्मलेल्या, ऐन उमेदीच्या काळात रसिकांच्या हृदयात स्थान मिळविलेल्या आणि विपन्नावस्थेतच अखेरच्या क्षणाला कवटाळलेल्या श्रेष्ठ गायिका, मुबारक बेगम! ..उण्यापुऱ्या ऐंशी वर्षांच्या

गॅरी मार्शल


बरेच हॉलीवूडपट दिग्दर्शकांच्याच नावाने लक्षात राहतात. हे दिग्दर्शक  आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवतीचे वलय इतके मोठे असते की, त्यांच्या चित्रपटात काम करणारे कलाकार कितीही थोर असले, तरी त्या अभिनेत्या-अभिनेत्रींचे सेलिब्रेटीपद त्यापुढे अंमळ कमी ठरते.  नुकतेच निधन झालेले लेखक, दिग्दर्शक, अभिनेते गॅरी मार्शल चित्रकर्त्यांच्या या पंथापासून फटकून राहिले असले, तरी त्यांनी १९९०च्या दशकातील

निर्यातप्रधान क्षेत्रात रोजगारात घट!


कष्टाचे काम असलेले विविध क्षेत्र तसेच निर्यातीशी निगडित उद्योग-व्यवसायातील रोजगारात गेल्या वर्षांत ६७.९३ टक्के घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उभय क्षेत्रासह एकूणच औद्योगिक वातावरण संथ राहिल्याचा हा परिणाम असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१५ दरम्यान एकूण रोजगारनिर्मितीदेखील कमी होत १.३५ लाखांवर येऊन ठेपली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय वाणिज्य व

भविष्यनिधी संघटनेचा ‘बँक’ स्थापनेचा प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडून नामंजूर


केंद्रीय अर्थमंत्रालयाने निवृत्तिवेतन निधीचा कारभार पाहणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ)च्या ‘कामगार बँक’ स्थापनेसाठी दाखल केलेला प्रस्ताव बुधवारी फेटाळून लावला. देशातील आपल्या पावणेचार कोटी पीएफधारक सदस्यांना सेवा देण्यासाठी हा प्रस्ताव ईपीएफओने सादर केला होता.
ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या १९ डिसेंबर २०१४ रोजी झालेल्या बैठकीत बँक स्थापनेचा प्रस्ताव

विप्रोला टोरंटो विमानतळाचे कंत्राट


देशातील तिसरी मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी विप्रोला कॅनडातील विमानतळासाठीचे कंत्राट प्राप्त झाले आहे. कंपनी ग्रेटर टोरंटो ट्रान्सपोर्ट ऑथोरिटीकरिता पुढील सात वर्षांकरिता माहिती तंत्रज्ञान व्यासपीठ उपलब्ध करून देईल. ग्रेटर टोरंटो कंपनीमार्फत टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे परिचलन होते. उत्तर अमेरिकेतील अधिक वर्दळीचे हे विमानतळ आहे. पहिल्या तिमाहीत ६ टक्के नफ्यातील घसरण नोंदविणाऱ्या

१० टक्के वृद्धिदराचा ‘नॅसकॉम’ला विश्वास

इन्फोसिस, विप्रोसारख्या आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांकडून तिमाहीत वित्तीय निष्कर्षांत निराशा नोंदवली गेली असली तरी चालू आर्थिक वर्षांसाठी भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यवसाय दुहेरी अंकातील व्यवसाय वाढ राखेलच, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘नॅसकॉम’ने २०१६-१७ करिता व्यवसाय वाढ १० ते १२ टक्के असेल, असे नमूद केले

खासगी बँकाही बुडीत कर्जाच्या समस्येने ग्रस्त


वाढत्या बुडीत कर्जाचा ससेमिरा खासगी क्षेत्रातील बँकांनाही चुकलेल्याचे गुरुवारच्या निवडक तिमाही वित्तीय निष्कर्षांवरून स्पष्ट झाले. या क्षेत्रात अव्वल असलेल्या एचडीएफसी बँकेने नफ्यातील तब्बल २० टक्के वाढ नोंदविली; मात्र बँकेच्या ढोबळ अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण १.०४ टक्क्य़ावर गेले आहे, तर याच क्षेत्रातील कोटक महिंद्र बँकेच्या बुडीत कर्ज प्रमाणात २.२० टक्क्य़ांपर्यंत वाढ झाली आहे. बँकेचा नफा मात्र चौपटीने

‘पॅन’विना झालेले मोठय़ा रकमेचे व्यवहार कर विभागाच्या रडारवर!


मोठय़ा रकमेचे व्यवहार करणाऱ्या आणि बँकेतील बचत खात्यात १० लाखांपेक्षा अधिक शिल्लक असणाऱ्या सात लाख करदात्यांना त्यांच्या ‘पॅन’ (कायम खाते क्रमांक) संबंधी खातरजमा करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने पत्र पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. करचोरीच्या प्रवृत्तीला पायबंद म्हणून हे पाऊल टाकले गेले आहे. प्राप्तिकर विभागाकडे विविध स्रोतांतून येणाऱ्या वार्षिक माहिती विवरणांत (एआयआर), वेगवेगळ्या

पद्मश्री विजेते हॉकीपटू मोहम्मद शाहीद यांचे निधन

भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार मोहम्मद शाहीद यांचे  निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून शाहीद मूत्रपिंड आणि यकृताच्या व्याधीने त्रस्त होते.  गुरगावमधील मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहम्मद शाहीद यांनी १९८०, १९८४ आणि १९८८ अशा सलग तीन वेळा भारतीय संघाचे ऑलिम्पिकमध्ये नेतृत्व केले. १९८० साली त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने

क्रीडा लवादाकडूनही रशियन खेळाडू हद्दपार


उत्तेजकाचा विळखा रशियन खेळाडूंची पाठ सोडत नाही असेच दिसून येत आहे. क्रीडा लवाद न्यायालयानेही रशियाने ऑलिम्पिकमधील बंदीबाबत केलेला अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे रशियाच्या मैदानी स्पर्धेतील खेळाडूंचा ऑलिम्पिक प्रवेश अंधातरी झाला आहे. रशियातील अनेक खेळाडू उत्तेजक प्रकरणात सापडले होते. त्यांच्या अहवालात फेरफार करीत त्यांना पाठीशी घालण्यात आले होते. रशियन अ‍ॅथलेटिक्स महासंघाने

ऑलिम्पिक पदकावर ब्राझीलच्या युवतीची छबी


यंदाच्या ऑलिम्पिक पदकावर ग्रीक देवतेची छबी या वेळी पाहायला मिळणार नसून त्या ऐवजी येथील सौंदर्यवती युवतीची छबी पाहायला मिळणार आहे. ऑलिम्पिकसाठी पदके तयार करण्याची जबाबदारी शिल्पकार नेल्सन कार्नेरो यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांनी एकूण ५ हजार १३० कांस्य, रौप्य व सुवर्णपदके तयार केली आहेत. नेल्सन यांनी सांगितले, ‘ही पदके तयार करताना नाईके या ग्रीक देवतेच्या

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दमदार शतकासह विराटच्या नावे आणखी नवे विक्रम!


भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने अँटिगा कसोटीत दमदार शतक ठोकून कर्णधारी खेळी साकारली. विराटने कसोटीच्या पहिल्या दिवशी मैदानात जम बसवून नाबाद १४३ धावांची खेळी साकारली. कोहलीच्या शतकी खेळीच्या बळावर पहिल्या दिवसाअखेर भारताला ४ बाद ३०२ धावा करता आल्या आहेत.
वाचा: विराटच्या १४७ धावांच्या जोरावर भारताचा दिवसअखेर खेळ ४ बाद ३०२ प्रचंड फॉर्मात असलेल्या विराट

केप्लर मोहिमेत १०४ नवीन ग्रहांचा शोध लावण्यात यश

नासाच्या केप्लर या दुर्बिणीच्या रूपातील अवकाशयानाने आणखी १०४ ग्रह नवीन ग्रह शोधून काढले आहेत. त्यातील काहींवर सजीवसृष्टीस अनुकूलता असू शकते. एकूण १९४ खगोलीय घटक हे ग्रह असल्याची शक्यता आधी वर्तवण्यात आली होती. त्यातील १०४ हे आपल्या सौरमालेबाहेरील ग्रह असल्याची खातरजमा आता झाली आहे. या १०४ ग्रहांपैकी किमान चार ग्रह तर जीवसृष्टीस अनुकूल असण्याची शक्यता असून ते खडकाळ

अरुणाचलमध्ये काँग्रेसच; विधानसभेत बहुमत सिद्ध


अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेत मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी बुधवारी बहुमत सिद्ध केले. विधानसभेत काँग्रेसला विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने ४६ आमदारांनी पाठिंबा दिला तर भाजपच्या ११ आमदारांनी विरोधात मतदान केले. अरुणाचल प्रदेशमध्ये राज्यपालांच्या माध्यमातून केंद्र सरकारने घेतलेले निर्णय रद्द ठरवीत सर्वोच्च न्यायालयाने राज्यात पुन्हा काँग्रेसच्या सत्तास्थापनेचे आदेश दिले. या पाश्र्वभूमीवर

गर्भपात नियमाविषयी सर्वोच्च न्यायालयाची राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस

गर्भपाताच्या नियमाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. राज्यात  गर्भलिंग तपासणीविरोधी कायदा म्हणजेच ‘पी.सी.पी.एन.डी.टी. कायदा’ आणि गर्भपाताला परवानगी देणारा ‘मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अ‍ॅक्ट १९७१’ हे दोन कायदे आपल्याकडे अस्तित्वात आहेत. ‘मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अ‍ॅक्ट १९७१’ कायद्यानुसार २० आठवड्याच्यानंतर गर्भपात करता येत नाही. या

जोश्नाला नमवत दीपिका पल्लीकल राष्ट्रीय विजेती

बक्षीस रकमा समान झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय स्पर्धा खेळणाऱ्या दीपिका पल्लीकलने जेतेपद पटकावत आपल्या नावाची मोहर उमटवली. मुंबईतील ऑटर्स क्लब येथे आयोजित ७३व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत, महिला गटाच्या अंतिम लढतीत दीपिकाने जोश्नावर ३-१ असा विजय मिळवला. अंतिम लढतीत दीपिकाने ४-११, ११-६, ११-२, ११-८ अशी बाजी मारली. पुरुष आणि महिला खेळाडूंना समान बक्षीस

लोढा समितीच्या शिफारशींना सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी


सुधारणेच्या निर्णयाने क्रिकेट प्रशासकांचे धाबे दणाणले. मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना मज्जाव. ७० वर्षांवरील व्यक्तींना प्रशासनात स्थान नाही. माहिती अधिकाराच्या कक्षेत येणे आणि सट्टेबाजी अधिकृत करण्यासंदर्भातील अधिकार संसदेकडे . खेळाडूंची संघटना कार्यरत होणार. महाराष्ट्र, गुजरात राज्यातील 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सदस्यत्व मंत्र्यांना, प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना

यंदाच्या वर्षांतील सहा महिने सर्वात उष्ण

यंदाच्या वर्षी पहिले सहा महिने हे उपग्रह नोंदणी सुरू झालेल्या १९७९ या वर्षांपासून सर्वात उष्ण होते व आक्र्टिकमधील बर्फही सर्वात कमी होते, असे नासाने म्हटले आहे. जागतिक पृष्ठीय तापमान व आक्र्टिकवरील बर्फाचे प्रमाण या दोन्ही घटकांचा विचार हवामान बदलांचे निदर्शक म्हणून केला जातो. या दोन्ही घटकांनी पहिल्या सहा महिन्यातच विक्रम मोडला असल्याचे नासाने उपग्रहाच्या माहितीचे विश्लेषण

आठवड्यात ‘आदर्श’ची इमारत ताब्यात घ्या, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश


गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त असलेली आदर्श सोसायटीची इमारत एक आठवड्याच्या आत ताब्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला दिले. सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने केंद्राला हे आदेश दिले. आदर्शमधील सदनिका धारकांनी आपली घरे तातडीने रिकामी करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने एप्रिल महिन्यात

भारतीय वायूदलाचे विमान बेपत्ता


चेन्नईकडून पोर्ट ब्लेअरकडे निघालेले भारतीय वायूदलाचे विमान शुक्रवारी सकाळी बेपत्ता झाले. या विमानामध्ये २९ प्रवासी असून, त्यामध्ये सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. भारतीय वायूदलाचे अधिकारी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत या विमानाच्या संपर्कात होते. पण हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ८.१२ पर्यंत या विमानाचा संपर्क होता. 

विधिमंडळात १३ हजार ३२ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर


१८ जुलै २०१६ रोजी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १३ हजार ३२ कोटी २१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या वित्त आयोगाने सादर केल्या. या पुरवणी मागण्यांवर दिनांक २५ व २६ जुलै २०१६ रोजी विधिमंडळात चर्चा होणार आहे. २०१६-१७ चा मूळ अर्थसंकल्प २ लाख ७० हजार ७६३ कोटी ९३ लाख रुपयांचा होता. त्यात पहिल्या तिमाहीतच ४.५९ टक्क्य़ांनी वाढ होऊन आता एकूण मागणी २ लाख ८३ हजार ७९६ कोटी १४ लाख

Tuesday 19 July 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-19-07-2016-www.KICAonline.com- Marathi


भारताची ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्लीने फिडे महिला ग्रां.प्रि. विजेतेपदाला गवसणी घातली. पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या हरिकाने अखेरच्या फेरीत रशियाच्या ओल्गा गिऱ्याशी बरोबरी साधली आणि कारकीर्दीतील पहिल्या वहिल्या ग्रॅण्ड प्रिक्स जेतेपदावर मोहर उमटवली. जगातील अव्वल १२ खेळाडूंचा सहभाग असलेल्या आणि राऊंड रॉबिन पद्धतीने झालेल्या या स्पध्रेत हरिकाने सर्वाधिक ७ गुण मिळवले.

हरिकाची जेतेपदाला गवसणी

भारताची ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्लीने फिडे महिला ग्रां.प्रि. विजेतेपदाला गवसणी घातली. पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या हरिकाने अखेरच्या फेरीत रशियाच्या ओल्गा गिऱ्याशी बरोबरी साधली आणि कारकीर्दीतील पहिल्या वहिल्या ग्रॅण्ड प्रिक्स जेतेपदावर मोहर उमटवली. जगातील अव्वल १२ खेळाडूंचा सहभाग असलेल्या आणि राऊंड रॉबिन पद्धतीने झालेल्या या स्पध्रेत हरिकाने सर्वाधिक ७ गुण मिळवले.

जोश्नाला नमवत दीपिका पल्लीकल राष्ट्रीय विजेती

बक्षीस रकमा समान झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय स्पर्धा खेळणाऱ्या दीपिका पल्लीकलने जेतेपद पटकावत आपल्या नावाची मोहर उमटवली. मुंबईतील ऑटर्स क्लब येथे आयोजित ७३व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत, महिला गटाच्या अंतिम लढतीत दीपिकाने जोश्नावर ३-१ असा विजय मिळवला. अंतिम लढतीत दीपिकाने ४-११, ११-६, ११-२, ११-८ अशी बाजी मारली. पुरुष आणि महिला खेळाडूंना समान बक्षीस

लोढा समितीच्या शिफारशींना सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी


सुधारणेच्या निर्णयाने क्रिकेट प्रशासकांचे धाबे दणाणले. मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना मज्जाव .७० वर्षांवरील व्यक्तींना प्रशासनात स्थान नाही. माहिती अधिकाराच्या कक्षेत येणे आणि सट्टेबाजी अधिकृत करण्यासंदर्भातील अधिकार संसदेकडे . खेळाडूंची संघटना कार्यरत होणार. महाराष्ट्र, गुजरात राज्यातील संघटनांना एकच मताधिकार. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सदस्यत्व मंत्र्यांना,

ऑलिम्पिकमध्ये रशियावर बंदी घालण्याची ‘वाडा’ची मागणी

सरकार पुरस्कृत उत्तेजक सेवन प्रकरणाचे बिंग उघडकीस सोची, रशिया येथे २०१४मध्ये झालेल्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत सरकार पुरस्कृत मोठय़ा प्रमाणावर झालेले उत्तेजक सेवन प्रकरण उघडकीस आल्याने जागतिक उत्तेजक विरोधी संघटनेने (वाडा) रिओ ऑलिम्पिक स्पर्धा तसेच अन्य आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये रशियाच्या खेळाडूंवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. कॅनडातील विधीतज्ज्ञ रिचर्ड मॅकलरेन

खांडू अरुणाचलचे नवे मुख्यमंत्री

पेमा खांडू यांनी अरुणाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. काँग्रेस पक्षाकडून नाटय़मय घडामोडीनंतर पेमा खांडू यांची नेतेपदी निवड करण्यात आली. ३७ वर्षीय खांडू हे देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले आहेत. तर चोवना मेन यांनी या वेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल तथागत रॉय यांनी शपथ दिली. काँग्रेसचे ४५ पक्षाचे आणि दोन अपक्षांचा सरकारला पाठिंबा असल्याचा दावा खंडू यांनी

पृथ्वीपासून २५० दशलक्ष प्रकाश वर्षे अंतरावरील फ्रँकेन्स्टीन दीर्घिकेचा शोध -

पृथ्वीपासून २५० दशलक्ष प्रकाश वर्षे अंतरावर इतर दीर्घिकांचे भाग गिळणारी (धारण करणारी) फ्रँकेन्स्टीन दीर्घिका सापडली आहे. नवीन संशोधनानुसार यूजीसी १३८२ ही दीर्घिका जुनी, लहान व नेहमीसारखी वाटत होती. नासाच्या दुर्बणींनी दिलेल्या माहितीच्या आधारे केलेल्या संशोधनानुसार ही दीर्घिका पूर्वी वाटत होती त्यापेक्षा १० पट मोठी आहे. इतर दीर्घिकांपेक्षा तिचा आतील भाग ताजा आहे व बाहेरचा भाग जुना वाटतो.

नालंदा महाविहार, सिक्कीम नॅशनल पार्कला युनेस्को जागतिक वारसा दर्जा

युनेस्कोने भारतातील तीन ठिकाणांना जागतिक वारसा दर्जा जाहीर केला असून त्यात चंडीगड व सिक्कीम नॅशनल पार्क, नालंदा विद्यापीठाचे अवशेष  यांचा समावेश आहे.  नालंदा महाविहार (नालंदा विद्यापीठ) या बिहारमधील ठिकाणाचा समावेश करण्यात आल्याने बौद्ध पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार आहे. इस्तंबूल येथे जागतिक वारसा समितीची बैठक नुकतीच झाली, त्यात भारतातील शिफारस केलेल्या काही ठिकाणांना

विनय सहस्रबुद्धे, संभाजीराजे, डॉ. विकास महात्मे यांना खासदारपदाची शपथ -

राज्यसभेवर प्रथमच निवडून गेलेल्या महाराष्ट्रातील तीन खासदारांनी सोमवारी शपथ घेतली. त्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे आणि डॉ. विकास महात्मे यांचा समावेश होता. छत्रपती संभाजीराजेंचा शपथविधी पाहण्यासाठी  कोल्हापूरचा शाही परिवार लोटला होता. सोमवारी एकूण ४३ खासदारांनी शपथ घेतली. त्यामध्ये राज्यातील सहा जणांचाही समावेश होता. अर्थात

दक्षिण चीन सागरात चीनच्या लष्करी कवायती

दक्षिण चीन सागरावर चीनला हक्क सांगता येणार नाही, असा निकाल आंतरराष्ट्रीय लवादाने दिला असला, तरी चीनने आता तेथे लष्करी कवायती करण्याची घोषणा केली आहे. हा सागरी प्रदेश आमचाच आहे, लष्करी कवायती करताना चीन हा भाग बंद करणार आहे, असे सांगण्यात आले. हैनान सागरी प्रशासनाने सांगितले, की आग्नेयेकडील बेटाचा भाग सोमवार ते गुरुवार असा बंद करण्यात येईल पण नेमक्या कशा प्रकारच्या

जुन्या पिढीतील तबलावादक तात्या देवळेकर यांचे निधन

जुन्या पिढीतील पट्टीचे तबलावादक पंडित रमाकांत शंकरराव तथा तात्या देवळेकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी सुधा, कमलेश व जगदीश ही दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जुन्या मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलेल्या देवळेकर यांनी ‘तबला विशारद’ ही पदवी घेतली होती. त्यांना त्र्यंबकराव उमराणी, बसवण्णी मेंडिगिरी, लालजी गोखले, गणपतराव कवठेकर, भानुदासबुवा गुरव व

दलितमित्र भीमराव जाधव गुरूजींचे निधन

भटक्या विमुक्त जाती-जमाती चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी महापौर, दलितमित्र भीमराव राजाराम जाधवगुरूजी (९६) यांचे रविवारी दुपारी एकच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन पुत्र, दोन कन्या, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सोलापूर शहर राष्ट्रवादी काँंग्रेसचे अध्यक्ष भारत जाधव यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिवावर उद्या सोमवारी दुपारी मोरे हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

‘नेट-सेट’धारकांसाठीच प्राध्यापकांचे सेवानिवृत्ती वय ६२ वरून ६० वर्षे

राज्यात नेट-सेट पात्रताधारक उपलब्ध असून ते बेरोजगार आहेत आणि त्यांना सेवेची संधी देणे आवश्यक असल्याने प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीचे वय ६२ वरून ६० वर्षे करण्यात आल्याचे स्पष्टीकरण शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अलीकडेच १२ जुलैला जारी केलेल्या शासन निर्णयात स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील नेट-सेट पात्रताधारक बेरोजगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, प्राध्यापकांच्या

सेवा क्षेत्रातील वाढ खुंटली

सलग तिसऱ्या महिन्यातील घसरणीने सात महिन्यांचा तळ देशातील सेवा क्षेत्राची वाढ जूनमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात घसरली. नव्या व्यवसाय मागणीला प्रतिसाद नसल्याने हे क्षेत्र जूनमध्ये ५०.३ अंशांवर म्हणजे सात महिन्यांच्या खोलात शिरले आहे. मार्च २०१६ मध्ये ५४.३ पर्यंत विस्तारल्यानंतर एप्रिल २०१६ पासून ते सातत्याने घसरले आहे. वर्षभरापूर्वी, जून २०१५ मध्येही ते ५०च्या खाली, ४७.७ पर्यंत होते. जुलै २०१५

स्टेट बँक विलीनीकरणाला गती

सहयोगी बँकांच्या मूल्यनिश्चितीकरिता प्रस्ताव विचारणा सहयोगी पाच बँका व भारतीय महिला बँकेच्या मुख्य स्टेट बँकेतील विलीनीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळत आहे. विलिनीकरणासाठीचे मूल्य निश्चित करण्यासाठी एसबीआय कॅपिटलने प्रस्ताव मागविले आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला लेखा परिक्षकांची परवानगी घेण्यात आल्याची माहिती स्टेट बँक समूहातील एसबीआय कॅपिटलने बुधवारी दिली. याबाबतच्या

‘कॅम्स’च्या मुख्य परिचालन अधिकारीपदी अनुज कुमार

देशातील मालमत्ता व्यवस्थापन उद्योगाची भागीदार असलेल्या कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सव्‍‌र्हिसेस प्रा. लि. (कॅम्स) ने आयबीएमचे माजी ज्येष्ठ अधिकारी अनुज कुमार नवीन मुख्य परिचालन अधिकारी या पदावर तात्काळ रुजू होत असल्याची गुरुवारी घोषणा केली. कॅम्सच्या डिजिटल क्षेत्रातील स्वारस्याला ते चालना देण्यासह आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर ते कॅम्सचे देशाबाहेरील बाजारपेठेत विस्तार साधण्याची

आयसीआयसीआय बँकेचे ‘स्वच्छ सोसायटी’ पुरस्कार

आयसीआयसीआय बँकेचे ‘स्वच्छ सोसायटी’ पुरस्कार मुंबई : आयसीआयसीआय बँकेने मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील (एमएमआर) स्वच्छ व हरित उपक्रमांची दखल घेण्यासाठी व त्यांचा गौरव करण्यासाठी निवासी हाऊसिंग सोसायटय़ांसाठी विशेष स्पर्धा घोषित केली आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट ‘स्वच्छ भारत अभियाना’ची प्रेरणा कायम राखणे हे असून ५० दिवसांच्या कालावधीमध्ये हा उपक्रम निवासी सोसायटींनी

महागाई दराचा २२ महिन्यांचा उच्चांक

भाज्या, डाळींसह अन्नधान्यांच्या किमती वाढल्याने जूनमधील किरकोळ किमतीवर आधारीत महागाई दर ५.७७ टक्क्यांवर गेला आहे. आधीच्या महिन्याच्या तुलनेत तो किरकोळ वाढला असला तरी जवळपास ६ टक्क्यांनजीकची महागाई आता गेल्या २२ महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचली आहे. मेमध्ये किरकोळ महागाई दर ५.७६ टक्के, तर वर्षभरापूर्वी जून २०१५ मध्ये दर ५.४० टक्के होता. ग्राहक किंमत निर्देशांकावर

‘यूएएन’शिवायही कर्मचाऱ्यांना ‘पीएफ’ची रक्कम मिळविणे शक्य

भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ)ने १ जानेवारी २०१४ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ खात्यांतील रक्कम काढून घेण्यासाठी सार्वत्रिक खाते क्रमांक (यूएएन) मिळविले असणे आवश्यक करणारे बंधन शिथिल केले असल्याचे गुरुवारी जाहीर केले. पीएफच्या रकमेवर दाव्यासाठी अर्ज दाखल करताना, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हा खाते क्रमांक नोंदविणे गतवर्षी डिसेंबरमध्ये

काळा पैसा ‘अभय’ योजनेला अखेर मुदतवाढ!

करबुडव्यांना सप्टेंबर २०१७ पर्यंत कर व दंडाची रक्कम भरण्याची मुभा उद्योग महासंघांकडून केल्या गेलेल्या मागणीप्रमाणे काळ्या पैशावर दंड आणि कराची रक्कम भरून अभय मिळविण्याच्या योजनेला अखेर मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने गुरुवारी जाहीर केला. आता काळे पैसेवाल्यांना त्यांच्या अघोषित संपत्तीवर ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत तीन हप्त्यांत कर व दंड भरण्याची मुभा दिली गेली आहे. यंदाच्या

सुवर्ण रोखे उपलब्धतेचा चौथा टप्पा सोमवारी

सार्वभौम सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणुकीचा पुढील टप्पा येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. भौतिक रूपातील सोन्याच्या ऐवजी सोन्यासारखाच मूल्यवृद्धीचा लाभ देणाऱ्या रोख्याशी निगडित व्यवहार १८ जुलैपासून मुंबई शेअर बाजारात सुरू होणार आहेत. २२ जुलैपर्यंत खुल्या राहणाऱ्या या रोखे विक्रीसाठी मुंबई शेअर बाजाराच्या ऑनलाइन मंचावरून नोंदणी करता येईल. ५, १०, ५० व १०० ग्रॅम वजनाच्या प्रमाणातील हे रोखे ५ ते ७

नवोद्योगांच्या प्रवर्तनात आता इन्फोसिसचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णनही

उद्योगजगतातील अनेक बडय़ा धुरिणांनी निवृत्तीपश्चात सुरू केलेल्या उपक्रमांची री ओढत, देशातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रणेती इन्फोसिसचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन यांनीही नवीन उद्यम कल्पना घेऊन पुढे येणाऱ्या नवोद्योगांच्या (स्टार्टअप्स) प्रवर्तन व घडणीस हातभार लावणाऱ्या उपक्रमात सहभाग घेतला आहे. नवोद्योगांना फळण्या-फुलण्यास उपयुक्त परिसंस्था प्रदान करणारे सिलिकॉन

राज्यसभा, भाजपचा सिद्धू यांचा राजीनामा


नवी दिल्ली - भाजपने राज्यसभेवर आणलेले नवज्योतसिंग सिद्धू यांनी जेमतेम महिनाभरातच खासदारकीवर पाणी सोडले आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जबरदस्त धक्का बसला आहे. सिद्धू आम आदमी पक्षात (आप) प्रवेश करतील व त्या पक्षातर्फे त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार केले जाईल, अशी दाट चिन्हे आहेत. सिद्धू यांनी भाजप सदस्यत्वही सोडले आहे.

राहुल गांधींनी संघाची माफी मागावी - न्यायालय


नवी दिल्ली - महात्मा गांधी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) हत्या केल्याच्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवार) काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना फटकारत त्यांनी संघाची माफी मागावी, अन्यथा सुनावणीला सामोरे जावे असे म्हटले आहे. महात्मा गांधी यांची हत्या संघाने केल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी भिवंडी येथे झालेल्या प्रचारसभेदरम्यान केले होते. या वक्तव्याविरोधात संघाचे

नमामि चंद्रभागा प्राधिकरणाची स्थापना करणार


मुंबई - विधिमंडळात 2016-17 चा अर्थसंकल्प सादर करताना चंद्रभागेच्या पावित्र्याचे व निर्मळतेचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन "नमामि चंद्रभागा‘ मोहीम राबवून 2022 पर्यंत चंद्रभागा नदी निर्मळ, पवित्र व प्रदूषणमुक्‍त करून तिचे संवर्धन करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला होता. यासाठी प्राधिकरण स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर

भाजीपाला, फळे विनियमन अध्यादेश विधिमंडळात


मुंबई - शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य मोबदला आणि ग्राहकांना रास्त भाव मिळावा, यासाठी पणन कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करणारा भाजीपाला, फळे विनियमन अध्यादेश राज्य सरकारने आज विधिमंडळात मांडला. विधान परिषद सभागृहात हा अध्यादेश ठेवण्यात आला.  महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मध्ये सुधारणा केल्यामुळे शेतकऱ्यांना फळे व भाजीपाला

उत्तर कोरियाकडून 3 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी


सेऊल - उत्तर कोरियाने आज (मंगळवार) सकाळी पुन्हा एकदा विरोध झुगारुन पूर्व किनाऱ्यावर  तीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला आहे. दक्षिण कोरियातील संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, उत्तर कोरियाने पूर्वेकडील किनाऱ्यावर आज सकाळी स्थानिक वेळेनुसार सकाळी सहा ते 6.40 मिनिटांदरम्यान या तीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. या

विजेंदर आशियाई विजेता


नवी दिल्ली - घरच्या प्रेक्षकांसमोर मोठ्या आत्मविश्‍वासाने उतरणाऱ्या भारताच्या विजेंदरसिंगने व्यावसायिक बॉक्‍सिंग लढतीत कारकिर्दीमधील सर्वोत्तम कामगिरी करताना सुपर मिडलवेट गटातील "आशियाई किताब‘ (बेल्ट) पटकावला. त्याने प्रतिस्पर्धी केरी होपच्या आशा संयमी खेळाने उद्‌ध्वस्त केल्या. विजेंदरच्या तुलनेत अनुभवी असणाऱ्या केरीने घरच्या मैदानावर विजेंदरला पराभूत करण्याचे वक्तव्य केले

यासीर शाह क्रमवारीत अव्वल


दुबई - इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीतील नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानचा लेगस्पिनर यासीर शाह याने गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. लॉर्डसवर त्याने १0 विकेट घेतल्या. त्याला ३२ गुणांची कमाई झाली. त्यामुळे त्याने चौथ्या क्रमांकावरून भरारी घेतली.यासीरने आर. अश्‍विन, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना मागे टाकले. यासीर अद्याप पात्रता कालावधीमध्ये आहे.

डोनाल्डचे वेगवान द्विशतक; शास्त्रीच्या विक्रमाशी बरोबरी


कॉलविन बे (लंडन) - ग्लॅमर्गनचा युवा क्रिकेटपटू ॲनेउरिन डोनाल्ड याने रविवारी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये वेगवान द्विशतक झळकाविण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. डोनाल्डाने १२३ चेंडूंत २०० धावा करताना भारताच्या रवी शास्त्रीच्या १९८५ च्या  देशांतर्गत क्रिकेटमधील विक्रमाशी बरोबरी केली. डोनाल्डने १५ षटकार ठोकले. काउंटी सामन्यात १९ वर्षीय डोनाल्ड खेळपट्टीवर उतरला तेव्हा त्याच्या संघाची स्थिती ३ बाद ९६ अशी

Wednesday 13 July 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-13-07-2016-www.KICAonline.com-Marathi


अग्रिम कर भरणा टप्पा विस्तारल्याचा लाभ देशातील प्रत्यक्ष कर संकलनात वाढ होण्यासाठी झाला आहे. एप्रिल ते जून या २०१६-१७ आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत प्रत्यक्ष कर संकलन २४.७९ टक्क्य़ांनी वाढून १.२४ लाख कोटी रुपये झाले आहे. संपूर्ण आर्थिक वर्षांसाठी राखलेले अर्थसंकल्पीय उद्दिष्ट पहिल्या तीन महिन्यांत १४.६३ टक्क्य़ांनी पूर्ण झाले आहे. पहिल्या तिमाहीत वैयक्तिक प्राप्तिकर संकलन २९.८ टक्क्य़ांनी, तर कंपनी कर

प्रत्यक्ष कर संकलनात २५ टक्के वाढ



अग्रिम कर भरणा टप्पा विस्तारल्याचा लाभ देशातील प्रत्यक्ष कर संकलनात वाढ होण्यासाठी झाला आहे. एप्रिल ते जून या २०१६-१७ आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत प्रत्यक्ष कर संकलन २४.७९ टक्क्य़ांनी वाढून १.२४ लाख कोटी रुपये झाले आहे. संपूर्ण आर्थिक वर्षांसाठी राखलेले अर्थसंकल्पीय उद्दिष्ट पहिल्या तीन महिन्यांत १४.६३ टक्क्य़ांनी पूर्ण झाले आहे. पहिल्या तिमाहीत वैयक्तिक प्राप्तिकर संकलन २९.८ टक्क्य़ांनी, तर कंपनी कर

भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या अधिक पारदर्शी


जागतिक स्तरावर भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचा कारभार अधिक पारदर्शी असून, चिनी कंपन्यांचे स्थान या आघाडीवर सर्वात खालचे असल्याचे, बर्लिनस्थित जागतिक भ्रष्टाचारविरोधी मंच ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’च्या ताजा अहवालात भारतीय कंपन्यांचा गुणांक हा ७५ टक्क्य़ांहून अधिक आहे. भारत, ब्राझील, मेक्सिको, रशिया, चीनसह १५ उभरत्या अर्थव्यवस्थांमधील १०० बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अभ्यासाअंती हा

मुखपृष्ठ » अर्थसत्ता » प्रतिक्रिया महागाई दराचा २२ महिन्यांचा उच्चांक


भाज्या, डाळींसह अन्नधान्यांच्या किमती वाढल्याने जूनमधील किरकोळ किमतीवर आधारीत महागाई दर ५.७७ टक्क्यांवर गेला आहे. आधीच्या महिन्याच्या तुलनेत तो किरकोळ वाढला असला तरी जवळपास ६ टक्क्यांनजीकची महागाई आता गेल्या २२ महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचली आहे. मेमध्ये किरकोळ महागाई दर ५.७६ टक्के, तर वर्षभरापूर्वी जून २०१५ मध्ये दर ५.४० टक्के होता. ग्राहक किंमत निर्देशांकावर

अब्बास किरोस्तामी


सिनेमाचा विकास डी डब्लू ग्रिफिथ यांच्यापासून सुरू होतो आणि किरोस्तामी यांच्याभोवती येऊन थांबतो’ असे जाँ लॉक गोदार्द यांनी म्हटले होते! यातले किरोस्तामी म्हणजे, सोमवारी पॅरिसमध्ये निधन झालेले इराणी चित्रपट-दिग्दर्शक अब्बास किरोस्तामी. दारियुश मेहरजुई यांच्या ‘द काऊ’ (१९६९) पासून सुरू झालेल्या इराणियन न्यू वेव्हला महंमद मक्मलबाफ यांच्यासोबत किरोस्तामींनी जागतिक पटलावर नेऊन ठेवले.

नील ओ’ब्रायन


सत्तरच्या दशकात गुगल नव्हते, माहितीचा विस्फोट झालेला नव्हता; कोलकात्यात बहुसांस्कृतिकतेचे वारे नुकतेचे कुठे सुरू झाले होते. त्या काळात सामान्यज्ञानावर आधारित प्रश्नमंजूषेचा कार्यक्रम लोकप्रिय करणे हे तसे कठीण काम. पण विविध विषयांवर बेतलेले प्रश्न रंजक पद्धतीने सादर करून उत्तरानंतर उत्कंठा ताणून धरण्याची लकब, अगदी बारीक उच्चाराची किंवा स्पेलिंगची चूक असेल तर, मी तुम्हाला याचे पूर्ण गुण देतो असे

अब्दुल सत्तार एढी


वाचा नसलेली गीता ही भारतीय मुलगी पाकिस्तानी रेंजर्सना सीमेलगत सापडल्यानंतर त्या देशात जेथे १३ वर्षे वाढली, जेथे तिच्यासाठी तिच्या खोलीत खास देव्हारा बसविण्यात आला, ते अनाथालय अब्दुल सत्तार एढी आणि त्यांच्या पत्नी बिल्किस एढी यांच्या न्यासाचे (ट्रस्टचे) होते. अब्दुल सत्तार आणि बिल्किस या दाम्पत्याने गीताला स्वत:ची मुलगीच मानले होते. अशा अनेक पोरक्या मुला-मुलींसाठी एढी दाम्पत्य गेली ६० वर्षे काम

कॅप्टन राधिका मेनन


सागरात जिवाची बाजी कधी लागेल सांगता येत नाही. २०१५च्या जूनमध्ये घडलेली घटना अशीच होती. आंध्र प्रदेशातील दुर्गाम्मा बोटीवरचे सात मच्छीमार त्यांच्या बोटीचे इंजिन बिघडल्याने वाहून गेले. हवामानही खराब होते. त्यांच्या कुटुंबीयांनी ‘ते कधीच परत येणार नाहीत’ असे गृहीत धरून अन्त्यविधीसाठी मनाची तयारी केली होती, पण एक साहसी महिला कॅप्टन राधिका मेनन या केरळकन्येने बंगालच्या उपसागरात र्मचट नेव्हीमध्ये

मारिया शारापोव्हा ऑलिम्पिकपासून वंचित


उत्तेजक सेवनाबद्दल घातलेल्या बंदीविरुद्धच्या याचिकेच्या सुनावणीला आणखी दोन महिने लागणार असल्यामुळे रशियाची अव्वल दर्जाची टेनिसपटू मारिया शारापोव्हा ही आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेपासून वंचितच राहणार आहे. बंदीच्या निर्णयाविरुद्ध शारापोव्हाने क्रीडा लवादापुढे अर्ज दाखल केला आहे. त्याची सुनावणी सप्टेंबरमध्ये घेतली जाणार आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या वेळी घेण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीच्या वेळी

पोर्तुगाल, रोनाल्डोचे पहिले आंतरराष्ट्रीय जेतेपद


    एडरच्या निर्णायक गोलने फ्रान्सचा पराभव .बदली खेळाडू एडरने अतिरिक्त वेळेत केलेल्या गोलच्या जोरावर पोर्तुगाल संघाने युरो चषक फुटबॉल स्पध्रेच्या अंतिम सामन्यात यजमान फ्रान्सवर १-० असा विजय साजरा केला. एडरच्या या गोलने पोर्तुगाल आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिले जेतेपद पटकावण्याची स्वप्नपूर्ती केली. २००४च्या युरो स्पध्रेत अंतिम लढतीत ग्रीसकडून पराभव पत्करल्यानंतर

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.