Wednesday 13 July 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-13-07-2016-www.KICAonline.com-Marathi


अग्रिम कर भरणा टप्पा विस्तारल्याचा लाभ देशातील प्रत्यक्ष कर संकलनात वाढ होण्यासाठी झाला आहे. एप्रिल ते जून या २०१६-१७ आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत प्रत्यक्ष कर संकलन २४.७९ टक्क्य़ांनी वाढून १.२४ लाख कोटी रुपये झाले आहे. संपूर्ण आर्थिक वर्षांसाठी राखलेले अर्थसंकल्पीय उद्दिष्ट पहिल्या तीन महिन्यांत १४.६३ टक्क्य़ांनी पूर्ण झाले आहे. पहिल्या तिमाहीत वैयक्तिक प्राप्तिकर संकलन २९.८ टक्क्य़ांनी, तर कंपनी कर


जागतिक स्तरावर भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचा कारभार अधिक पारदर्शी असून, चिनी कंपन्यांचे स्थान या आघाडीवर सर्वात खालचे असल्याचे, बर्लिनस्थित जागतिक भ्रष्टाचारविरोधी मंच ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या ताजा अहवालात भारतीय कंपन्यांचा गुणांक हा ७५ टक्क्य़ांहून अधिक आहे. भारत, ब्राझील, मेक्सिको, रशिया, चीनसह १५ उभरत्या अर्थव्यवस्थांमधील १०० बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अभ्यासाअंती हा

भाज्या, डाळींसह अन्नधान्यांच्या किमती वाढल्याने जूनमधील किरकोळ किमतीवर आधारीत महागाई दर ५.७७ टक्क्यांवर गेला आहे. आधीच्या महिन्याच्या तुलनेत तो किरकोळ वाढला असला तरी जवळपास ६ टक्क्यांनजीकची महागाई आता गेल्या २२ महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचली आहे. मेमध्ये किरकोळ महागाई दर ५.७६ टक्के, तर वर्षभरापूर्वी जून २०१५ मध्ये दर ५.४० टक्के होता. ग्राहक किंमत निर्देशांकावर

सिनेमाचा विकास डी डब्लू ग्रिफिथ यांच्यापासून सुरू होतो आणि किरोस्तामी यांच्याभोवती येऊन थांबतोअसे जाँ लॉक गोदार्द यांनी म्हटले होते! यातले किरोस्तामी म्हणजे, सोमवारी पॅरिसमध्ये निधन झालेले इराणी चित्रपट-दिग्दर्शक अब्बास किरोस्तामी. दारियुश मेहरजुई यांच्या द काऊ’ (१९६९) पासून सुरू झालेल्या इराणियन न्यू वेव्हला महंमद मक्मलबाफ यांच्यासोबत किरोस्तामींनी जागतिक पटलावर नेऊन ठेवले.

सत्तरच्या दशकात गुगल नव्हते, माहितीचा विस्फोट झालेला नव्हता; कोलकात्यात बहुसांस्कृतिकतेचे वारे नुकतेचे कुठे सुरू झाले होते. त्या काळात सामान्यज्ञानावर आधारित प्रश्नमंजूषेचा कार्यक्रम लोकप्रिय करणे हे तसे कठीण काम. पण विविध विषयांवर बेतलेले प्रश्न रंजक पद्धतीने सादर करून उत्तरानंतर उत्कंठा ताणून धरण्याची लकब, अगदी बारीक उच्चाराची किंवा स्पेलिंगची चूक असेल तर, मी तुम्हाला याचे पूर्ण गुण देतो असे

वाचा नसलेली गीता ही भारतीय मुलगी पाकिस्तानी रेंजर्सना सीमेलगत सापडल्यानंतर त्या देशात जेथे १३ वर्षे वाढली, जेथे तिच्यासाठी तिच्या खोलीत खास देव्हारा बसविण्यात आला, ते अनाथालय अब्दुल सत्तार एढी आणि त्यांच्या पत्नी बिल्किस एढी यांच्या न्यासाचे (ट्रस्टचे) होते. अब्दुल सत्तार आणि बिल्किस या दाम्पत्याने गीताला स्वत:ची मुलगीच मानले होते. अशा अनेक पोरक्या मुला-मुलींसाठी एढी दाम्पत्य गेली ६० वर्षे काम

सागरात जिवाची बाजी कधी लागेल सांगता येत नाही. २०१५च्या जूनमध्ये घडलेली घटना अशीच होती. आंध्र प्रदेशातील दुर्गाम्मा बोटीवरचे सात मच्छीमार त्यांच्या बोटीचे इंजिन बिघडल्याने वाहून गेले. हवामानही खराब होते. त्यांच्या कुटुंबीयांनी ते कधीच परत येणार नाहीतअसे गृहीत धरून अन्त्यविधीसाठी मनाची तयारी केली होती, पण एक साहसी महिला कॅप्टन राधिका मेनन या केरळकन्येने बंगालच्या उपसागरात र्मचट नेव्हीमध्ये

उत्तेजक सेवनाबद्दल घातलेल्या बंदीविरुद्धच्या याचिकेच्या सुनावणीला आणखी दोन महिने लागणार असल्यामुळे रशियाची अव्वल दर्जाची टेनिसपटू मारिया शारापोव्हा ही आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेपासून वंचितच राहणार आहे. बंदीच्या निर्णयाविरुद्ध शारापोव्हाने क्रीडा लवादापुढे अर्ज दाखल केला आहे. त्याची सुनावणी सप्टेंबरमध्ये घेतली जाणार आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या वेळी घेण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीच्या वेळी

    एडरच्या निर्णायक गोलने फ्रान्सचा पराभव .बदली खेळाडू एडरने अतिरिक्त वेळेत केलेल्या गोलच्या जोरावर पोर्तुगाल संघाने युरो चषक फुटबॉल स्पध्रेच्या अंतिम सामन्यात यजमान फ्रान्सवर १-० असा विजय साजरा केला. एडरच्या या गोलने पोर्तुगाल आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिले जेतेपद पटकावण्याची स्वप्नपूर्ती केली. २००४च्या युरो स्पध्रेत अंतिम लढतीत ग्रीसकडून पराभव पत्करल्यानंतर

अँडी मरेने दुसऱ्यांदा विम्बल्डन स्पर्धा जिंकली. अंतिम सामना खूप गुणवत्तेचा होता असे म्हणता येणार नाही. राओनिचने फेडरर विरुद्ध दाखवलेला खेळ बघून तो बिग लीगमध्ये आला असे वाटले होते.पण आजचा खेळ बघून तो परत मागे गेला असे वाटले. बॉयचा मॅन झालेला परत बॉय झाला. मात्र त्याच्या सभ्य आणि स्थित:प्रज्ञ वर्तनाने तो टेनिस मधला गुड बॉय आहे हे दिसले. जोकोविच, मरे, फेडरर, नडाल ही टेनिस मधिल बिग लीग.

नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा सीपीएन-माओवादीने काढून घेतल्याने सरकार अडचणीत सापडले आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या करारांची अंमलबजावणी करण्यास सरकार असमर्थ ठरल्याचा आरोप सीपीएन-माओवादीने केला आहे. सीपीएन माओवादीचे अध्यक्ष प्रचंड यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याची घोषणा केली. यापूर्वी करण्यात आलेल्या करारांची अंमलबजावणी करण्यास ओली यांचे

जिवाणूंच्या नैसर्गिक हालचाली हा कमी प्रमाणात ऊर्जा निर्माण करण्याचा एक स्रोत असू शकतो. अगदी सूक्ष्म यंत्रे स्मार्टफोनचे काही भाग या कमी ऊर्जेवर चालू शकतात. या सूक्ष्म ऊर्जाकारक जिवाणूंचा मोठा फायदा ऊर्जानिर्मितीसाठी होऊ शकतो.ऑक्सफर्ड विद्यापीठातील वैज्ञानिकांनी त्यासाठी सादृश्यीकरण तंत्राचा वापर केला असून, यात जिवाणू हे दंडाकार रोटर्सच्या सान्निध्यात एकत्र आणले जातात व त्यात त्यांच्या हालचाली

भारतात रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी अमेरिका आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मदत करील तसेच वाहतूक व्यवस्थापनासाठी सॉफ्टवेअरही देईल असे रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे सांगितले. रस्ते सुरक्षा हा भारतातील एक प्रमुख प्रश्न असल्याचे मान्य करताना त्यांनी सांगितले की, पाच लाख अपघातात दरवर्षी दीड लाख लोक मरतात अशी वस्तुस्थिती आहे. रस्ते सुरक्षेच्या समस्येत आम्ही अमेरिकी सरकारची

गुंजन म्हापणकर या मुंबईकर तरुणीनं सातासमुद्रापार जाऊन समाजसेवेचा वसा घेतला. तिच्या या प्रयत्नांची दखल थेट इंग्लंडच्या राणीनं घेतलीय. 'द क्वीन्स यंग लीडर अॅवॉर्ड' हा मानाचा पुरस्कार देऊन तिला नुकतंच गौरवण्यात आलं...उच्च शिक्षणासाठी गुंजन म्हापणकर या मराठी तरुणीनं परदेश गाठला. पण तिथे शिक्षण घेत असताना त्याबरोबरच काही गोष्टींनी तिला अस्वस्थ केलं. त्यानंतर तिनं स्वतः पुढाकार घेत हिरिरीनं समाजसेवा

विम्बल्डनच्या हिरवळीवरून' या केदार कृष्णाजी लेले यांनी लिहिलेल्या पुस्तकाची लिम्का बूक ऑफ नॅशनल रेकॉर्ड २०१६मध्ये नोंद करण्यात आली आहे. १२८ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या विम्बल्डनच्या संग्रहालयाने मराठी भाषेतील या पुस्तकाला मान्यता दिली आहे. यामुळे हे पुस्तक बिम्बलडनच्या संग्रहालयात आंतरराष्ट्रीय लेखकांच्या पंक्तीत विराजमान झाले आहे. विम्बलडनच्या संग्रहालयामध्ये स्थान मिळवणारे

शनीचा सर्वांत मोठा उपग्रह टायटनवर पाणीविरहित जीवसृष्टी असावी, अशी शक्यता कॉर्नेल विद्यापीठातील संशोधकांनी वर्तवली आहे. त्यामुळे द्रवरूप पाणीच जीवसृष्टीसाठी आवश्यक असते, या समजालाही धक्का लागण्याची शक्यता आहे. टायटनच्या वातावरणात हायड्रोजन सायनाइड नावाचे संयुग अस्तित्वात आहे. हे रसायनच जीवसृष्टीसाठी कारक ठरू शकते, असा संशोधकांचा अंदाज असल्याचे वृत्त झिन्हुआ या चिनी

चीन आणि फिलिपाइन्समध्ये चाललेला दक्षिण चीनच्या समुद्रावरील हक्काचा लढा अखेर फिलिपाइन्सने जिंकला आहे. या समुद्रावर हक्क सांगण्यासाठी चीनकडे ठोस असे कोणतेही पुरावे नाहीत, असे मत नोंदवत आंतरराष्ट्रीय लवादाने चीनला झटका दिला. दरम्यान, या निकालानंतर फिलिपाइन्समध्ये विजयोत्सव साजरा केला जात असून राजधानी मनीलातून भव्य मिरवणूकही काढण्यात आली. चीन आणि फिलिपाइन्समध्ये बऱ्याच

उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी काँग्रेसने राज बब्बर यांच्यावर सोपवली आहे. बब्बर यांची काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेल्या इम्रान मसूद यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे महासचिव आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी गुलाम नबी आझाद यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

दक्षिण चीनच्या समुद्रावर हक्क सांगण्यासाठी चीनकडे ठोस असे कोणतेही पुरावे नाहीत, असे मत नोंदवून आंतरराष्ट्रीय लवादाने चीनला झटका दिला आहे. चीन आणि फिलिपिन्समध्ये बऱ्याच काळापासून दक्षिण चीन समुद्राच्या मालकीचा वाद सुरू होता. त्यात चीनने हा समुद्र आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे आणि देशासाठी त्याचे ऐतिहासिक महत्त्वही मोठे आहे, असा दावा नेहमीच केला होता. त्यामुळेच फिलिपिन्सने २०१३

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला आणि अवजड उद्योग राज्यमंत्री जी. एम. सिद्धेश्वर यांनी मंगळवारी पदांचा राजीनामा दिला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दोघांचाही राजीनामा स्वीकारला आहे. अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडे आता या खात्याचा स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला आहे. दरम्यान, मोदींच्या मंत्रिमंडळाची संख्या आता ७७ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवडाभरापूर्वी

उत्तराखंडमध्ये सरकारस्थापनेचं स्वप्न धुळीस मिळाल्यानंतर, आता अरुणाचल प्रदेशमध्येही केंद्रातील मोदी सरकारला जोरदार झटका बसला आहे. भाजपच्या पाठिंब्याने काँग्रेस बंडखोरांनी स्थापन केलेलं अरुणाचलमधील सरकार बेकायदशीर ठरवून राज्याची सत्ता काँग्रेसकडे सोपवण्याचे आदेश आज सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. १५ डिसेंबर २०१५ रोजीची स्थिती राज्यात पूर्ववत करा, असे सुप्रीम कोर्टाने आज निक्षून सांगितले.

'ठुल्ला' शब्दाचा अर्थ काय, असा सवाल दिल्ली हायकोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विचारला आहे. केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांना 'ठुल्ला' म्हटले होते, असा केजरीवालांवर आरोप आहे. येत्या २१ ऑगस्टला या प्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे. फेरीवाल्यांकडून पैसे उकळणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ठुल्ला म्हटले होते. या प्रकरणी गोविंदपुरीच्या एका हवालदाराने केजरीवाल यांच्याविरूद्ध कोर्टात

बेळगाव, कारवारसह सीमाभाग महाराष्ट्रात विलीन व्हावा यासाठी राजकीय लढाई लढणाऱ्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष, माजी आमदार वसंतराव पाटील यांचे सोमवारी पहाटे साडेपाच वाजता हृदयविकाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. गेल्या आठ दिवसापासून आजारी असल्यामुळे उपचारासाठी बेळगावमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वसंतराव पाटील हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून

उत्तराखंड सरकारनं राज्य पोलिसांच्या 'शक्तिमान' या घोड्याचा पुतळा विधानसभा मार्गावरून हटवला आहे. हा घोडा अशुभ असून पुढील विधानसभा निवडणुकीत अपशकून करू शकतो, असा सल्ला ज्योतिषानं दिल्यानं मुख्यमंत्री हरीश रावत यांनी तो हटवल्याची चर्चा आहे. भाजपच्या एका आंदोलनादरम्यान आमदार गणेश जोशी यांनी 'शक्तिमान' घोड्याला बेदम मारहाण केली होती. मारहाणीत जायबंदी झालेल्या या घोड्याचा पाय कापावा

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.