Wednesday, 27 July 2016

नीरजची विक्रमी भालाफेक


कनिष्ठ गटात जागतिक विक्रमासह सुवर्णपदकाची कमाई . युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स २० वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेत कनिष्ठ गटात नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली. ८६.४८ मीटर अंतरावर भाला फेकत नीरजने सुवर्णपदक पटकावले. प्राथमिक फेरीत नीरजने ७९.६६ मीटर अंतरावर भाला फेकला होता. मात्र दुसऱ्या फेरीत त्याने ८६.४८ अंतरावर भाला फेकला. २० वर्षांखालील गटात ८४.६९
मीटर अंतरावर भाला फेकण्याचा विक्रम लॅटव्हिआच्या झिगिसमुंड्स सिरमैसच्या नावावर होता. विक्रमापेक्षा जवळपास दोन मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकत नीरज विश्वविक्रमाचा मानकरी ठरला. ८०.४९ मीटर अंतरावर भाला फेकणारा दक्षिण आफ्रिकेच्या जोहान ग्रॉबलरने रौप्य तर ७९.६५ मीटर अंतरावर भाला फेकणाऱ्या ग्रॅनडाच्या अँडरसन पीटर्सला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
चंदिगडमधल्या डीएव्ही महाविद्यालयाचा विद्यार्थी असणारा नीरज वरिष्ठ तसेच कनिष्ठ प्रकारात जागतिक विक्रम नावावर करणारा पहिला भारतीय अ‍ॅथलेटिक्सपटू ठरला आहे. जागतिक विक्रम नोंदवतानाच नीरजने वरिष्ठ प्रकारात राजिंदर सिंग यांचा ८२.२३ मीटर अंतराचा राष्ट्रीय विक्रमही मोडला. कनिष्ठ गटाच्या जागतिक मैदानी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणारा नीरज पहिला भारतीय खेळाडू आहे. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सीमा पुनियाने २००० साली २० वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. मात्र उत्तेजक सेवनप्रकरणी दोषी आढळल्याने तिचे पदक काढून घेण्यात आले होते. २००२ मध्ये सीमाने २० वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. २००४ मध्ये नवजीत कौर ढिल्लाँने कांस्यपदक पटकावले होते. अव्वल अ‍ॅथलेटिक्सपटू अंजू बॉबी जॉर्जने २००३ मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकावर नाव कोरले होते.
रिओ ऑलिम्पिकसाठी नीरज पात्र ठरू शकला नाही, मात्र या कामगिरीमुळे यंदाच्या हंगामातील वरिष्ठ गटातील सर्वोत्तम आठ कामगिरींमध्ये नीरजच्या प्रदर्शनाचा समावेश झाला आहे. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी भालाफेकीत निर्धारित अंतर ८३ मीटर होते. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील दमदार प्रदर्शनासह नीरज ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकला असता. मात्र ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याची शेवटची तारीख ११ जुलै असल्याने नीरजची संधी हुकली.
गुवाहाटी येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजने राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी केली होती. मात्र त्यानंतर त्याला ८० मीटरचे अंतर पार करता आले नव्हते.
या ऐतिहासिक प्रदर्शनानंतर देशभरातून नीरजवर शुभेच्छांचा वर्षांव होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. केंद्र सरकारतर्फे नीरजला १० लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याची घोषणा केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी केली.
‘जास्तीत जास्त अंतरावर भाला फेकण्याचा माझा प्रयत्न होता. पण भाला ८६ मीटर अंतरापर्यंत जाईल आणि विश्वविक्रम होईल अशी अपेक्षा नव्हती. २० वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे उद्दिष्ट होते. कारण रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी प्रयत्न केले. मात्र ते अपुरे ठरले होते’, असे नीरजने सांगितले.

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.