Monday 4 July 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-04-07-2016-www.KICAonline.com-Marathi


भारतीयांकडून स्विस बँकांतील ओघाला आहोटी लागली असून २०१५ अखेर ती १.२ अब्ज फ्रँक अशा विक्रमी तळात पोहोचली आहे. याबाबत पाकिस्तानने भारताला मागे टाकले असून विदेशातील त्यांचा पैसा १.५ अब्ज फ्रँकपर्यंत पोहोचला आहे. स्वित्र्झलँडची मध्यवर्ती बँक असलेल्या स्विस नॅशनल बँकने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, स्विस बँकेतील भारतीयांची रक्कम ५९.६४ कोटी फ्रँकने कमी होत ती १.२ अब्ज फँ्रकपर्यंत



वित्तीय स्थिरता अहवालातून रिझव्‍‌र्ह बँकेकडून धोक्याचा घंटानाद.. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील मार्च २०१६ अखेर ७.६ टक्के राहिलेले अनुत्पादित मालमत्तेचे (एनपीए) पोहोचलेले प्रमाण आर्थिक वर्ष २०१७ अखेर ९.३ टक्क्यांवर जाईल, असा भीतीदायक कयास रिझव्‍‌र्ह बँकेने मंगळवारी जाहीर झालेल्या वित्तीय स्थिरता अहवालातून व्यक्त केला आहे. खासगी आणि सार्वजनिक मिळून एकूण बँकिंग व्यवस्थेतील ढोबळ एनपीएचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सौर ऊर्जा क्षेत्रात भारताचे उल्लेखनीय कार्य सुरू असल्याचे कौतुकोद्गार काढतानाच या क्षेत्राकरिता १ अब्ज डॉलरचे अर्थसाहाय्य जागतिक बँकेच्या अध्यक्षांनी गुरुवारी जाहीर केले. गेल्या दोन दिवसांपासून भारत दौऱ्यावर असलेले जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम यांग किम यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली, ऊर्जामंत्री पियूष गोयल, वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांची

आयएमएफकडून धोक्याचा इशारा ब्रिटनचा युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घातक असून त्यामुळे ब्रिटन व युरोपीय महासंघच नव्हे, तर सगळ्या जगाच्या अर्थव्यवस्थेत अनिश्चितता येईल, असा धोक्याचा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला आहे. दरम्यान मध्यवर्ती बँकेने दिलासा दिल्यामुळे आशियात तेलाचे भाव पुन्हा वाढले आहेत. नाणेनिधीचे प्रवक्ते गेरी राइस यांनी सांगितले, की ब्रेग्झिटमुळे जगाच्याच आर्थिक वाढीला

कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा हशिम अमला आणि वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो यांनी विश्वविक्रमी भागीदारी रचत त्रिन्बागो नाइट रायडर्स संघाला विजय मिळवून दिला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १५० धावांची भागादारी रचल्यामुळे त्रिन्बागो संघाला १७० धावांचा पाठलाग करता आला. त्रिन्बागोच्या आव्हानाचा पाठलाग करताना बार्बाडोस ट्रायडेन्ट संघाला १५९ धावा करता आल्या आणि त्रिन्बागो

पंच पुनर्आढावा प्रक्रियेबाबत (डीआरएस) पंचांनी चिंता प्रकट केल्यामुळे पायचीत निर्णयाच्या बदलाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मान्यता दिली आहे. हा निर्णय गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी कसोटी क्रिकेटमध्ये दोन विभाग करणे आणि नवी एकदिवसीय लीग आयोजित करणे अशा काही योजनांचे प्रस्ताव या वेळी चर्चेला आले. शनिवारी रात्री आयसीसीचे कार्याध्यक्ष शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली ही वार्षिक बैठक पार पडली. या बैठकीत आयसीसी, आयडीआय व

जगातील सर्वोत्तम महिला टेनिसपटूंपैकी एक आणि अनेक विक्रम नावावर असणाऱ्या सेरेना विल्यम्सने रविवारी विम्बल्डन टेनिस स्पध्रेत आणखी एक मैलाचा दगड गाठला. गतविजेत्या सेरेनाने तिसऱ्या फेरीत जर्मनीच्या अ‍ॅनिका बेकचा ६-३, ६-० असा सहज पराभव करून तीनशेव्या ग्रँडस्लॅम विजयाची नोंद केली. दिग्गज टेनिसपटू मार्टिना नवरातिलोव्हा (३०६) हिच्यानंतर हा पल्ला सर करणारी सेरेना पहिली खेळाडू आहे. विम्बल्डन स्पध्रेत

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पाऊल देशात समान नागरी कायदा लागू करणे शक्य आहे काय, याची चाचपणी करण्याचे आदेश केंद्र सरकारने शुक्रवारी विधि आयोगाला दिले. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मोदी सरकारने हे पाऊल उचलल्याचा राजकीय निरीक्षकांचा तर्क आहे. समान नागरी कायद्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्वीपासूनच आग्रही आहे. तोंडी तलाकला

नासाच्या सांघिक भावना स्पर्धेत भारतीय चमूला पुरस्कार मिळाला असून त्यात १३ भारतीय अभियंत्यांचा समावेश आहे. त्यात चार मुली आहेत. दूरनियंत्रक उपकरण तयार करण्याच्या उपक्रमात हा पुरस्कार जाहीर केला आहे. मुंबईच्या मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीच्या स्क्रूड्रायव्हर्स चमूला अलोहा सांघिक भावना पुरस्कार नासाच्या जॉनसन स्पेस सेंटर न्यूट्रल बॉयन्सी लॅब येथील मेट इंटरनॅशनल (मरिन अ‍ॅडव्हान्सड

नासाचे गुरूच्या दिशेने निघालेले ज्युनो यान अखेर त्याच्या चुंबकावरणाच्या कक्षेत पोहोचले असून, त्या भागातील अवकाशीय कणांचे नियंत्रण गुरूच्या आंतरक्रियांवर अवलंबून असते. सॅन अँटानियो येथील साऊथवेस्ट रीसर्च इन्स्टिटय़ूटचे ज्युनो मोहिमेतील मुख्य संशोधक स्कॉट बोल्टन यांनी सांगितले, की गुरूची सीमा ओलांडली आहे. वेगाने यान गुरूच्या दिशेने जात असून महत्त्वाची माहिती हाती येत आहे. ज्युनो यान ४ जुलैला

चीनमध्ये जगातील सर्वात मोठी दुर्बीण उभारण्यात आली असून, त्याचा परावर्तक ३० फुटबॉल मैदानाइतका मोठा असून, त्याचे ४४५० पॅनेल्स बसवण्यात आले आहेत. आता त्याच्या चाचणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शेवटच्या चाळीस मिनिटांत त्रिकोणी आकाराची पॅनेल्स डिशवर बसवण्यात आले. काही चाचण्या पूर्ण केल्यानंतर सप्टेंबरमध्ये या दुर्बिणीचे काम सुरू होईल असे शिनहुआ न्यूज एजन्सीने म्हटले आहे. बिल्डर्स,

हिटलरने ज्यूंच्या केलेल्या संहारात वाचलेले प्रसिद्ध लेखक व शांततेचे नोबेल विजेते एली विसेल यांचे निधन झाले. दुसऱ्या जागतिक महायुद्धात मारल्या गेलेल्या ज्यू लोकांच्या स्मृतीचे ते प्रतीक होते. ते ८७ वर्षांचे होते व अमेरिकेत वास्तव्यास होते. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी सांगितले, की ते आमच्यासाठी प्रकाशस्तंभ होते. माणसाच्या चांगुलपणावर विश्वास असलेल्या मानवतेचे ते प्रतीक होते. त्यांच्या निधनाने ज्यू

भारताच्या देशी बनावटीच्या तेजस या विमानाच्या रचनेत बेहरामपूर शहरातील असलेल्या कोटा हरिनारायण यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी या हलक्या लढाऊ विमानाची संरचना नेमकी कशी असावी यात मोठी भूमिका पार पाडली. तेजस विमाने नुकतीच भारतीय हवाई दलात सामील करण्यात आली आहेत. बंगळुरू येथे काम करीत असलेल्या हरिनारायण यांनी दूरध्वनीवर सांगितले, की आम्ही वीस वर्षे तेजस विमानाच्या रचनेवर काम केले

सत्यता पडताळून न पाहता प्रसिध्द केलेला मजकूर, खास करून सोशल मीडियावरील अशा प्रकारचा मजकूर ऑनलाइन मीडियावर प्रकाशित करण्यावर चीन सरकारकडून प्रतिबंध लावण्यात आला आहे. निराधार वृत्त प्रकाशित केल्याबद्दल यावर्षी चीनमधील इंटरनेट नियमन मंडळाद्वारे देशातील अनेक संकेतस्थळांना दंड ठोठावण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या आधारे ऑनलाइन

लोकदैवते, विविध भक्तीपंथ, धर्मस्थळे, संतसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककला अशा विविध विषयांचा साक्षेपी धांडोळा लेखणीद्वारे घेत मराठी वाङ्मयाचे दालन समृद्ध करणारे ज्येष्ठ संशोधक डॉ. रामचंद्र चिंतामण ऊर्फ रा. चिं. ढेरे यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी पहाटे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे. प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे, लेखिका वर्षां गजेंद्रगडकर आणि प्रसिद्ध

हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून आजोजित करण्यात आलेल्या कृषिदिनानिमित रायगड जिल्हा परिषदेने जिल्ह्य़ातील ३४ प्रगतशील शेतकऱ्यांना कृषिनिष्ठ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि शेतीची उत्पादकता वाढवावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी केले. पशाच्या

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापाठोपाठ राज्यातही मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, यामध्ये भाजपसह मित्रपक्षांच्या सदस्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असल्याचे समजते. मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचे, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी नवी दिल्लीमध्ये पोहोचले असून, ते भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा करून नावे निश्चित

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.