Monday 4 July 2016

३४ शेतकऱ्यांना कृषिनिष्ठ पुरस्कार

हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून आजोजित करण्यात आलेल्या कृषिदिनानिमित रायगड जिल्हा परिषदेने जिल्ह्य़ातील ३४ प्रगतशील शेतकऱ्यांना कृषिनिष्ठ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि शेतीची उत्पादकता वाढवावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी केले. पशाच्या
हव्यासासाठी शेती विकू नका असा सल्ला त्यांनी दिला. जिल्हा परिषदेच्या कै. ना. ना. पाटील सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, उपाध्यक्ष अरिवद म्हात्रे, अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, महिला व बालकल्याण सभापती प्रिया मुकादम, जिल्हा परिषद सदस्य विनोद म्हात्रे, अलिबाग पंचायत समितीच्या सभापती सुगंधा पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, कृषी विकास अधिकारी अशोक पवार, आत्माचे उपसंचालक मंगेश डावरे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील खोडके आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. ज्यांनी चांगली शेती केली, अशा प्रगतशील शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात आले आहेत. त्यांचा आदर्श ठेवून इतर शेतकऱ्यांनी शेतीत प्रगती करावी. आपल्या जिल्ह्य़ाचे कृषी उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादकता वाढवली, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे या वेळी म्हणाले. रायगड जिल्ह्य़ात जमिनीला सध्या चांगला भाव आला आहे. पण पशाच्या हव्यासासाठी शेती विकू नका असा सल्ला त्यांनी दिला. उपाध्यक्ष अरिवद म्हात्रे म्हणाले की, रायगड जिल्ह्य़ाचे क्षेत्रफळ सहा लाख हेक्टर एवढे आहे. त्यापकी केवळ दोन लाख ३४ हजार हेक्टरवर शेती केली जाते. सातत्याने होणाऱ्या औद्योगिकीकरणामुळे शेती क्षेत्र घटत चालले आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकावर भर द्यायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांनी नसíगक शेतीवर भर द्यावा. त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल असेही ते म्हणाले. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि नागरीकरणामुळे जिल्ह्य़ातील शेती क्षेत्रात घट होत आहे. ही एक चिंतेची बाब आहे. यामुळे शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांसमोर बेरोजगारीची समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीचे सुधारित तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे, असे मत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे यांनी व्यक्त केले. मात्र रायगड जिल्ह्य़ात समूह शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी १४०० शेतकऱ्यांच्या गटांची स्थापना करण्यात आली आहे. या गटांच्या माध्यमातून शेती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला चांगले यश येत आहे. शेतकरी गटांपाठोपाठ आता शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या स्थापण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. यातून प्रक्रिया उद्योग सुरू केले जाणार आहेत. जिल्ह्य़ातील माणगाव, पेण, खालापूर आणि अलिबाग तालुक्यात अशा कंपन्या स्थापन करण्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले आहेत. येणाऱ्या काळात प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांनी कंपनी तयार करण्याचा मानस असल्याचे ‘आत्मा’चे उपसंचालक मंगेश डावरे यांनी सांगितले. महिला व बालकल्याण सभापती प्रिया मुकादम, सदस्य विनोद म्हात्रे, कृषी विस्तार अधिकारी पवार यांनी मार्गदर्शन केले. अमरदीप ठोंबरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांना आंब्याच्या कलमाचे वितरण करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.