Thursday 7 July 2016

ऑलिम्पिक महिन्याच्या अंतरावर, तरी अडचणी संपता संपेना..


जागतिक क्रीडा क्षेत्रातील सर्वाधिक नावलौकिक असलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेला आता केवळ एक महिन्याचीच प्रतीक्षा आहे. मात्र संयोजकांपुढील अडचणी संपता संपेना असेच चित्र पाहायला मिळत आहे.या स्पर्धेसाठी सर्व स्टेडियम्स तयार झाली असून केवळ अंतिम आढावा घेण्याचे काम सुरू आहे. ५ ते २१ ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा होणार असून या निमित्ताने पाच लाखांहून अधिक पर्यटक येथे येतील अशी अपेक्षा
आहे.महापौर एडवर्ड पेस यांनी व ब्राझील ऑलिम्पिक समितीचे मुख्य कालरेस न्यूझमन यांनी स्पर्धेसाठी सुरू केल्या जाणाऱ्या विशेष महामार्गाचे येथे उद्घाटन केले. ‘‘आमचे शहर ऑलिम्पिकच्या महासोहळ्यासाठी शंभर टक्के तयार असून आम्ही खेळाडू व अन्य लोकांचीच प्रतीक्षा करीत आहोत,’’ असे पेस यांनी सांगितले.

मायकेल फेल्प्स, उसेन बोल्ट आदी नामवंत खेळाडूंसह दहा हजारांहून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. परंतु ऑलिम्पिकविषयी उत्सुकता निर्माण होण्याऐवजी येथील अनेक समस्यांनी खेळाडूंबरोबरच संयोजकांनाही अडचणीत टाकले आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी, आर्थिक अडचणींनी संयोजकांपुढे केलेली समस्या, झिका रोगाचा वाढता प्रादुर्भाव, अनेक अव्वल दर्जाच्या खेळाडूंनी स्पर्धेतून घेतलेली माघार आदी समस्यांचा डोंगर वाढतच आहे. वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी ८५ हजार पोलिसांची नियुक्ती केली जाणार आहे. जागतिक स्तरावर दहशतवादाची वाढती समस्या, त्यातच अलीकडे इस्तंबूल व बगदाद या शहरांमध्ये झालेले बॉम्बहल्ले ही येथील स्पर्धा संयोजकांसाठी डोकेदुखी होत आहे.

खुनी हल्ल्यांचे वाढते प्रमाण, रस्त्यावरील गुन्हेगारी, परदेशी नागरिकांवरील हल्ले, अलीकडेच जर्मन दूरदर्शन वाहिन्यांची सामग्री असलेल्या ट्रकचे अपहरण आदी गुन्हेगारीमुळे रिओ शहर म्हणजे गंभीर िहसाचारांनी ग्रासलेले शहर अशीच प्रतिमा आहे.

रिओ येथील झोपडपट्टीमधील लोकांवर होणारे क्रूर हल्ले, महिलांवरील अत्याचार, लूटमारी आदी कारणास्तव मानवी हक्क समूहांनी सातत्याने येथील पोलिसांना टीकेचे लक्ष्य केले आहे. यंदा ५०हून अधिक पोलिसांना अतिरेक्यांनी कंठस्नान घातले आहे. खुद्द पोलिसांमध्येही त्याबाबत तीव्र नाराजी दिसून येथे आहे. ब्राझील हा देश आर्थिक मंदीने ग्रासला असून रिओ राज्य हे दिवाळखोरीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. अत्यावश्यक सेवा, रुग्णालये व अन्य महत्त्वाच्या सेवेत नोकरी करणाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही. समस्यांनी ग्रासलेल्या या शहरांची प्रतिमा खराब होऊ नये यासाठी संयोजक तसेच येथील महापौर कसोशीने प्रयत्न करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.