Monday 4 July 2016

बुडीत कर्जाचे प्रमाण १० टक्क्य़ांसमीप!

वित्तीय स्थिरता अहवालातून रिझव्‍‌र्ह बँकेकडून धोक्याचा घंटानाद.. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील मार्च २०१६ अखेर ७.६ टक्के राहिलेले अनुत्पादित मालमत्तेचे (एनपीए) पोहोचलेले प्रमाण आर्थिक वर्ष २०१७ अखेर ९.३ टक्क्यांवर जाईल, असा भीतीदायक कयास रिझव्‍‌र्ह बँकेने मंगळवारी जाहीर झालेल्या वित्तीय स्थिरता अहवालातून व्यक्त केला आहे. खासगी आणि सार्वजनिक मिळून एकूण बँकिंग व्यवस्थेतील ढोबळ एनपीएचे
प्रमाण मार्च २०१६ अखेर ८.५ टक्क्य़ांवर जाण्याचा रिझव्‍‌र्ह बँकेचा कयास आहे. गेल्या एक तपातील ढोबळ एनपीएचा हा सर्वोच्च स्तर असेल. सरलेल्या २०१५-१६ सालातच त्यात ८० टक्क्य़ांनी भर पडल्याचे आढळून आले आहे. यापूर्वी मार्च २००४ अखेर बँकांच्या ढोबळ एनपीएचे प्रमाण ७.८ टक्क्य़ांवर गेले होते. २००२ मध्ये तर ते ११.१ टक्के असे सर्वोच्च पातळीवर होते. रिझव्‍‌र्ह बँकेने २०१५-१६ सालातील बँकांच्या पत गुणवत्ता आढावा लक्षात घेतला आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह एकूण ३६ बँकांची (एकूण कर्ज वितरणाच्या ८२ टक्के) कर्जविषयक आकडेवारी या अहवालासाठी गृहीत धरली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एनपीएचे प्रमाण सर्वोच्च राहण्याचे संकेतही या अहवालात देण्यात आले आहेत. अति गंभीर स्थितीत हे प्रमाण मार्च २०१७ पर्यंत १०.१ ते ११ टक्के राहू शकते, अशी शक्यताही आहे. मार्च २०१७ पर्यंत खासगी बँकांमधील ढोबळ एनपीएचे प्रमाण एकूण कर्ज वितरणाच्या तुलनेत ३.१ टक्के अंदाजण्यात आले आहे. मार्च २०१६ अखेर हे प्रमाण २.७ टक्के असे होते. सप्टेंबर २०१५ अखेर बँकांच्या एकूण वितरित कर्जाच्या तुलनेत ५.१ टक्के कर्जे बुडीत खाती होती. सहा महिन्यांत, मार्च २०१६ पर्यंत ही मात्रा ७.६ टक्क्यांवरी गेली आहे. तर निव्वळ एनपीएचे प्रमाण मार्च २०१६ अखेर ४.६ टक्के नोंदले गेले आहे. सप्टें २०१५ मार्च २०१६ मार्च २०१७ (अंदाजित) ढोबळ एनपीए ५.१% ७.६% ८.५% निव्वळ एनपीए २.८% ४.६% — कंपन्यांवरील कर्जताण हलका.. २०१५-१६ चा वित्तीय स्थिरता अहवाल जाहीर करताना गव्हर्नर राजन यांनी, एकूणच बँक क्षेत्राच्या स्थितीतून उद्योगांवरील कर्ज ताण प्रतिबिंबित होतो, असे नमूद करीत जागतिक अस्थिरता येथील व्यावसायिक भावनेवर विपरीत परिणाम करीत असल्याचे सांगितले. विशेषत: पोलाद, बांधकाम, ऊर्जा, दळणवळण तसेच वाहतूक उद्योगावर हा ताण राहिल्याचेही राजन यांनी अहवालात सांगितले. तुलनेत नागरी हवाई वाहतूक, वाहन निर्मिती, सेवा तसेच निर्मिती क्षेत्रातील कंपन्या, वस्त्रोद्योग या क्षेत्रातील कंपन्या नफ्याबाबत समाधानकारक कामगिरी करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. बांधकाम, स्थावर मालमत्ता, खनिकर्म क्षेत्रातील उद्योगांच्या नफ्याबाबत अद्यापही चिंता असल्याचे त्यांनी नमूद केले. २०१५-१६ च्या उत्तरार्धात सुधार दिसून आला असून या क्षेत्राची एकूणच जोखीमही तुलनेने कमी झाली आहे. डोईजड कर्जे असलेला उद्योगांचा एकूण कर्जातील हिस्साही ३३.८ टक्क्यांवरून यंदा २०.६ टक्क्यांपर्यंत घटल्याचे स्पष्ट करण्यात आले. कंपन्यांद्वारे कर्जाचे रूपांतर समभागांमध्ये करण्याचे प्रमाणही आधीच्या २३ वरून १९ टक्क्यांवर आले आहे. 

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.