Tuesday 28 June 2016

मेस्सी निवृत्त


बार्सिलोना क्लबसाठी खेळताना अद्भुत प्रदर्शन नावावर असणाऱ्या लिओनेल मेस्सीला ही जादू अर्जेटिनासाठी खेळताना कधीही दाखवता आली नाही. अर्जेटिनाचे प्रतिनिधित्व करताना मेस्सीच्या मानगुटीवर बसलेले अपयश चिलीविरुद्धच्या अंतिम लढतीनंतरही बदलले नाही. देशाला जेतेपद मिळवून देण्यात यशस्वी होऊ शकत नाही हे जाणलेल्या मेस्सीने यापुढे अर्जेटिनासाठी न खेळण्याचा निर्णय घेतला.२०१४ नंतर सलग तिसऱ्या महत्त्वाच्या
स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेटिनाला पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे हताश झालेल्या मेस्सीने हा निर्णय घेतला. ‘‘हा माझ्यासाठी आणि संघासाठी कठीण प्रसंग आहे. अर्जेटिनाकडून यापुढे खेळणार नाही, हे सांगताना दु:ख होत आहे. मला जे शक्य होते ते मी केले. चार वेळा अंतिम सामन्यात मी खेळलो आणि जेतेपद न मिळाल्याच्या वेदना अधिक तीव्र आहेत,’’ असे मेस्सी म्हणाला.

मेस्सीच्या या निर्णयाची पुसटशीही कल्पना नसल्याने अर्जेटिनाचे प्रशिक्षक गेराडरे मार्टिनो यांनी स्पष्ट केले, तसेच त्यांनी मेस्सीचे सांत्वन केले. ‘‘अंतिम फेरीत पोहचून पराभव पत्करावा लागल्यानंतर इतर फुटबॉलपटूंना झालेल्या दु:खासारखेच मेस्सीलाही झाले आहे. पुन्हा पराभव पत्करणे हे वेदनादायी आहे. शेवटी अंतिम निकाल ग्रा धरला जातो आणि चिलीचा विजय हा निकाल आहे. आम्ही सामना हरलो आणि रिकाम्या हाती परतलो,’’ अशी प्रतिक्रिया मार्टिनो यांनी दिली.

    १७ ऑगस्ट २००५ मध्ये हंगेरीविरुद्धच्या मैत्रीपूर्ण लढतीत १८ वर्षीय मेस्सीने अर्जेटिनाकडून पदार्पण केले. ६३व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या मेस्सीला हंगेरीच्या बचावपटूला कोपरा मारल्यामुळे मिनिटाच्या आतच पुन्हा बोलावण्यात आले.
    १ मार्च २००६ मध्ये मेस्सीने क्रोएशियाविरुद्ध पहिल्या आंतरराष्ट्रीय गोलची नोंद केली.
    २००८च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये मेस्सीच्या कामगिरीच्या जोरावर अर्जेटिनाने सुवर्णपदक पटकावले.
    २०१०च्या फिफा विश्वचषक स्पध्रेत दिएगो मॅरेडोना यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना अर्जेटिनाला उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीने ४-० असे नमवले. मेस्सीला मात्र स्पध्रेत गोल करण्यात अपयश आले.
    २०१३ मध्ये मेस्सीने स्वित्र्झलडविरुच्या (१-३) मैत्रीपूर्ण लढतीत अर्जेटिनासाठी पहिल्या हॅट्ट्रिकची नोंद केली आणि त्यानंतर जूनमध्ये ब्राझीलविरुद्धही हॅट्ट्रिक नोंदवून संघाला ४-३ असा विजय मिळवून दिला. ग्वाटेमालाविरुद्धही तीन गोल करून मेस्सीने मॅरेडोना यांच्या आंतरराष्ट्रीय गोल विक्रमाला मागे टाकले.
    २०१६च्या कोपा अमेरिका स्पध्रेत पनामाविरुद्ध मेस्सीने १९ मिनिटांत हॅट्ट्रिक नोंदवली.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

    पदार्पण : विरुद्ध हंगेरी २००५
    सामने : ११३
    गोल : ५५
    अंतिम फेरी : कोपा अमेरिका २००७, २०१५ व २०१६; विश्वचषक २०१४.

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.