उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी बसपच्या नेत्या उमेदवारीचा लिलाव करीत असल्याचा आरोप करून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मायावती यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी आर.के.चौधरी यांनी गुरूवारी पक्षाला रामराम केला. त्यामुळे गेल्या काही आठवडय़ात मायावती यांना दुसरा जबर धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी स्वामीप्रसाद मौर्य यांनी मायावती यांच्यावर उमेदवारीचा लिलाव केल्याचा आरोप करून
पक्षाला रामराम केला होता. चौधरी यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला धक्का बसला असला तरी चौधरी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचा विशेष परिणाम होणार नाही, असा दावा पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.
निवडणुकीच्या वेळी जो उमेदवार जास्त रक्कम देईल त्याला उमेदवारी देण्यात आली, असा आरोप चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला आणि पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले.
No comments:
Post a Comment