Exam-Oriented-Current-Affairs-Dated-30-05-2016-www.KICAonline.com-Marathi
जेद्दाहच्या इस्लामिक डेव्हलपमेंट बँक (आयडीबी) भारतातील गुजरातममध्ये पहिली शाखा सुरू करत आहेत. ही देशातील पहिली इस्लामिक बँक असणार आहे. या बँकेचे ५६ इस्लामिक देश सदस्य आहे. गुजरातच्या सोशल सेक्टरमध्ये काम करताना ३० मेडिकल वॅन देणार आहे. 'द टाइम्स ऑफ इंडिया' च्या वृत्तानुसार बँक शरिया कायद्यानुसार काम करत आहे. बँकेचा उद्देश सदस्य देशांच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि सामाजिक विकासासाठी काम करणे हा आहे.
गेल्या एप्रिलमध्ये यूएई दौऱ्यात एक्सिम बँक आणि आयडीबी बँकेच्या करारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली.
या मॅचमध्ये हैदराबादचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नरनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. हैदराबादनं आपल्या 20 ओव्हरमध्ये तब्बल 208 रनचा डोंगर उभा केला. हैदराबादकडून वॉर्नरनं 38 बॉलमध्ये 69 रन केल्या. वॉर्नरच्या या इनिंगमध्ये 8 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. तर युवराज सिंगनं 23 बॉलमध्ये 38 रन केल्या.
गानवर्धन संस्थेतर्फे प्रसिद्ध संवादिनीवादक सीमा शिरोडकर यांना ज्येष्ठ संवादिनीवादक पं. अप्पासाहेब जळगावकर स्मृती स्वर-लय-रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मनोहर मंगल कार्यालय येथे शनिवारी (४ जून) सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका पद्मा तळवलकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरणानंतर सीमा शिरोडकर यांचे स्वतंत्र संवादिनीवादन होणार
डॉ. प्रभा अत्रे यांची भावना सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेतही किराणा घराणे अग्रेसर आहे. सामान्य माणसालाही संगीत निर्मिती प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याची ताकद किराणा घराण्यामध्ये आहे हे सिद्ध झाले आहे. किराणा घराण्यालाच भारतरत्न या सर्वोच्च किताबाचा बहुमान लाभला, अशी भावना ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी रविवारी व्यक्त केली. पुणे महापालिकेतर्फे महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते डॉ. प्रभा अत्रे यांना स्वरभास्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पेनल्टीमध्ये रोनाल्डोचा निर्णायक गोल ’ अंतिम फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये रिअल माद्रिदचा अॅटलेटिको माद्रिदवर ५-३ असा विजय ’ चॅम्पियन्स लीगच्या अकराव्या जेतेपदावर शिक्कामोर्तब अतिमहत्त्वाच्या क्षणी जो कसलेही दडपण न घेता सर्वोत्तम खेळ करतो, तोच सर्वोत्तम खेळाडू ठरतो. ख्रिस्तियानो रोनाल्डो हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण. याचा प्रत्यय आला तो कट्टर प्रतिस्पर्धी अॅटलेटिको माद्रिदविरुद्धच्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत. निर्धारित वेळेत दोन्ही संघांची १-१ अशी बरोबरी झाली होती. त्यानंतर अतिरिक्त वेळेतही गोल न झाल्याने सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत लांबला. पेनेल्टी
महिलांच्या डब्यात नवीन सुविधा; बटण दाबल्यानंतर डब्याबाहेरील सिग्नलद्वारे सूचना उपनगरीय रेल्वे प्रवासादरम्यान महिलांवर होणारे हल्ले आणि विनयभंगाच्या घटना रोखण्यासाठी आता मध्य रेल्वेने महिलांसाठी पॅनिक बटणाची सोय केली आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा कार्यशाळेतील दोन अधिकाऱ्यांनी तयार केलेले हे बटण एका गाडीतील सर्व महिला डब्यांमध्ये बसवण्यात आले आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत हे बटण दाबल्यानंतर डब्यावर बाहेरील बाजूने बसवलेला दिवा चालू होतो. त्याचप्रमाणे धोक्याचा संकेत देणारी घंटाही वाजू लागते. तसेच हे बटण दाबल्यानंतर गार्ड आणि मोटरमनच्या डब्यातही
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडिया हे केवळ साधन नव्हे तर, एक मोठी ताकद बनले आहे. देशभरातले असंख्य युवक हे फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सएप आणि तत्सम सोशल मीडियात कार्यरत असतात. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी निवड होण्याआधीच व राष्ट्रीय पातळीवर येण्याआधीच गुजरातचे विकास पुरूष म्हणुन सोशल मिडियात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांनी सोशल मिडियाची ताकद , व्याप्ती व त्याचे भविष्य ओळखत भारतातील बहुतेक
पैशाचा वापर केल्याने कारवाई मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशांचा वापर करण्यात आल्याचे पुरावे हाती आल्याने तामिळनाडू विधानसभेच्या दोन जागांसाठीची निवडणूक रद्द करावी, अशी शिफारस निवडणूक आयोगाने शनिवारी केली. या घडीला तेथे लोकशाही मार्गाने निवडणूक घेण्याइतके पोषक वातावरण नाही, असेही आयोगाने म्हटले आहे. सदर दोन मतदारसंघांतून आठ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे २५ हजार लिटरहून अधिक मद्य, चांदी, धोतर, साडय़ा अशा स्वरूपाच्या भेटवस्तू मोठय़ा प्रमाणावर जप्त करण्यात आल्याचेही आयोगाने म्हटले आहे. निवडणुकीत
आंतरराष्ट्रीय योगदिन पुढील महिन्यात २१ जूनला साजरा होत असून संयुक्त राष्ट्रातील कार्यक्रमात इशा फाउंडेशनचे संस्थापक व आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव नेतृत्व करणार आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्यावर्षी शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी योग दिन सुरू करण्यात आला होता, त्याचा प्रस्ताव भारताने मांडला व तो संयुक्त राष्ट्रांनी मंजूर
सिने आणि टीव्ही अभिनेते सुरेश चटवाल यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. एफआयआर या मालिकेत काम करणा-या सुरेश यांचे शनिवारी मुंबईत निधन झाले. सुरेश यांचे चिरंजीव यमन चटवाल यांनी याबाबत माहिती दिली. एफआयआर मालिकेतील सुरेश यांची सहकलाकार कविता कौशिक हिनेदेखील याबाबत ट्विटरद्वारे दुःख व्यक्त केले. कविताने म्हटले की,
थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित सत्यशोधक या मराठी चित्रपटाचा मुहूर्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. यावेळी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, आमदार नीलम गोऱ्हे, विधानपरिषद सचिव युके चव्हाण, प्रधान सचिव अनंत कळसे या मान्यवरांसह अभिनेता संदीप कुलकर्णी, दिग्दर्शक निलेश
No comments:
Post a Comment