Exam-Oriented-Current-Affairs-Dated-23-05-2016-www.KICAonline.com-Marathi
इराणशी असणाऱ्या व्यापारी संबंधात वृध्दी करणारा तसेच अफगाणिस्तान आणि मध्य अशियायी व्यापारावर प्रभाव टाकणारा मध्यवपूर्ण करार आज भारत आणि इराण दरम्यान झाला. इराणमधील छाबहार मुक्त व्यापार बंधरामध्ये अब्जावधी डॉलरची गुंतवणूक भारताकडून केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि नौका वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
मापनशास्त्रात झपाट्याने होणारे बदल टिपण्यासाठी यंदा ‘आधुनिक काळातील परिमाणे’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. २० मे १८७५ रोजी सुमारे १७ देशांनी मीटर कन्वेन्शनला मान्यता दिली, आणि आता ८० देश या मोहिमेत सहभागी झाले आहेत. यामुळे जगभरात सर्व परिमाणांमध्ये एकसंधता आली. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी २० मे हा दिवस जागतिक परिमाण (वजन-माप) दिन म्हणून साजरा केला जातो.
२० जणांचा बळी ढाका, दि २१ (वृत्तसंस्था) – बांगलादेशच्या पश्चिम सागरी किनारपट्टीला रोनू चक्रीवादळाने जबरदस्त तडाखा देऊन आतापर्यंत २० जणांचा बळी घेतला आहे तर १०० हून अधिक रहिवासी जखमी झाले आहेत. वादळी वार्याबरोबरच संततधार वृष्टी होऊन अनेक ठिकाणी वसाहतीजवळच्या भागात दरडी कोसळल्या, रस्त्यावर झाडे कोसळली. यामुळे बळींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. बांगलादेशच्या नैऋत्येस असलेल्या भोला आणि चित्तगाव किनारपट्टीस
पुरोगामी विचारांचा वारसा जपणार्या कोल्हापूर शहरात आजपासून मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झालीय.कोल्हापूरमधल्या केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटनझालंय. पुढचे 2 दिवस आता करवीरवासियांना मुस्लीम बांधवांचं मराठी साहित्य अनुभवण्याची संधी मिळालीय.
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. 41 वर्षांचे भाजप खासदार अनुराग ठाकुरबीसीसीआयचे सर्वात तरुण अध्य़क्ष बनले आहेत.
ठाकूर यांनी बीसीसीआयच्या सचिवपदाचा राजीनामा देऊन अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी भारताचा माजीकर्णधार आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचा अध्यक्ष सौरव गांगुलीही तिथं हजर
माजी आयपीएस अधिकारी आणि भाजप नेत्या किरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी (लेफ्टिनेंट गव्हर्नर) नियुक्तीकरण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी किरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी रविवारी नियुक्त करण्यात आल्याचीघोषणा केली.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था, अर्थात इस्रोनं आज आणखी एक महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. पूर्णपणे भारतीयबनावटीचं आणि पुनर्वापरायोग्य असलेलं पहिलं अंतराळयान (स्पेस शटल) आरएलव्ही-टीडी (रियूजेबल लाँच व्हेइकल-टेक्नॉलॉजीडेमॉन्स्ट्रेटर) आज सकाळी श्रीहरीकोटा येथील तळावरून यशस्वीपणे अवकाशात झेपावलं आणि इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलागेला.
No comments:
Post a Comment