गुंजन म्हापणकर या मुंबईकर तरुणीनं सातासमुद्रापार जाऊन समाजसेवेचा वसा घेतला. तिच्या या प्रयत्नांची दखल थेट इंग्लंडच्या राणीनं घेतलीय. 'द क्वीन्स यंग लीडर अॅवॉर्ड' हा मानाचा पुरस्कार देऊन तिला नुकतंच गौरवण्यात आलं...उच्च शिक्षणासाठी गुंजन म्हापणकर या मराठी तरुणीनं परदेश गाठला. पण तिथे शिक्षण घेत असताना त्याबरोबरच काही गोष्टींनी तिला अस्वस्थ केलं. त्यानंतर तिनं स्वतः पुढाकार घेत हिरिरीनं समाजसेवा
सुरू केली. पुढे तिच्या या कामाची दखल इंग्लंडच्या राणीनंही घेतली. बंकिंगहॅम पॅलेसमध्ये नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये, समाजसेवेमध्ये देदिप्यमान कामगिरी करणाऱ्या जगभरातल्या धडाडीच्या तरुण कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यात तीही होती. 'द क्वीन्स यंग लीडर अॅवॉर्ड' या अत्यंत मानाच्या सन्मानानं तिला नुकतंच गौरवण्यात आलं. या पुरस्कारांचं हे दुसरं वर्ष आहे. कॅनडामधून हा सन्मान मिळवणारी गुंजन ही पहिली भारतीय वंशाची तरुणी ठरली आहे. १८ ते २९ या वयोगटातल्या तरुण कार्यकर्त्यांचा या सोहळ्यामध्ये सन्मान केला जातो. मायक्रोबायोलॉजी अॅण्ड इम्युनोलॉजीमध्ये पदवीधर झालेली गुंजन ही मूळची मुंबईची. वयाच्या पंधराव्या वर्षी ती वॅनकोवर (vancouver) येथे शिक्षणासाठी म्हणून गेली. मात्र तिथली सामाजिक दुरावस्था आणि स्थलांतरीतांवर होणारा अन्याय पाहून ती अस्वस्थ झाली. 'बीसी२११' या एनजीओच्या हेल्पलाइन प्रोजेक्टमध्ये तिनं सहभाग घेतला. पुढे जाऊन देश-विदेशातल्या तब्बल २० समाजसेवी संस्थांमार्फत बालमजुरीपासून ते व्यसनमुक्तीपर्यंत अनेक कार्यक्रमांमध्ये तिने सक्रिय सहभाग घेतला. 'बीसी२११'ने या मानाच्या पुरस्कारासाठी तिचं नामांकन केलं आणि निवडप्रक्रियेतून पार पडल्यानंतर तिची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या पुरस्काराबरोबरच तिला १० दिवसांचं विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. एक वर्षाचा ऑनलाइन लीडरशीप ट्रेनिंग प्रोग्रामही तिला करता येणार आहे.
व्हिडिओला चांगला प्रतिसाद गरजू लोकांना विविध सामाजिक संस्थांची माहिती मिळावी या उद्देशातून तिनं 'कम्युनिटी सर्व्हिस व्हिडिओ' नावाचा एक व्हिडिओ बनवला. यामध्ये तिनं विविध एनजीओजच्या सदस्यांच्या मुलाखती घेतल्या. तिच्या या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
भविष्यात भारतात इतक्या मानाच्या पुरस्काराची मानकरी ठरले याचा निश्चितच आनंद आहे. ही तर माझ्यासाठी सुरूवात आहे. या पुरस्कारामुळे मिळणाऱ्या प्रशिक्षणाचा समाज परिवर्तनासाठी जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल यासाठी मी प्रयत्न करेन. भविष्यात भारतात येऊन मी काम करणार आहे. गुंजन म्हापणकर
No comments:
Post a Comment