विम्बल्डनच्या हिरवळीवरून' या केदार कृष्णाजी लेले यांनी लिहिलेल्या पुस्तकाची लिम्का बूक ऑफ नॅशनल रेकॉर्ड २०१६मध्ये नोंद करण्यात आली आहे. १२८ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या विम्बल्डनच्या संग्रहालयाने मराठी भाषेतील या पुस्तकाला मान्यता दिली आहे. यामुळे हे पुस्तक बिम्बलडनच्या संग्रहालयात आंतरराष्ट्रीय लेखकांच्या पंक्तीत विराजमान झाले आहे. विम्बलडनच्या संग्रहालयामध्ये स्थान मिळवणारे
'विम्बलडनच्या हिरवळीवरून' हे पुस्तक आणि लेखक लेले हे पहिले, तसेच एकमेव भारतीय आणि मराठी लेखक ठरले आहेत हे विशेष.
लेले यांचे 'विम्बलडनच्या हिरवळीवरून' हे पुस्तक म्हणजे विम्बलडन स्पर्धेचा इतिहास आहे. या पुस्तकात महत्त्वाचे खेळाडू, स्पर्धेतील महत्त्वाच्या लढती, त्याच प्रमाणे गाजलेल्या खेळांडूंबाबत विशेष माहितीसह अनेक गोष्टी रंजकपणे कथन करण्यात आल्या आहेत. लेलेंची संवादी शैली, सखोल माहिती देण्याची पद्धत, माहितीला पूरक अशी चित्रांची वेधक मांडणी यामुळे हे पुस्तक वाचनीय आणि संग्रही ठेवावे असे झाले आहे.
No comments:
Post a Comment