गुरूच्या कक्षेत पोहचलेल्या जुनो यानाचे इंजिन गुरूच्या कक्षेजवळ गेल्यानंतर ३५ मिनिटांसाठी प्रज्वलित करण्यात आले आणि त्यानंतर ते अपेक्षित कक्षेमध्ये पोहोचले. या दरम्यान अंतराळयानाचा वेग ५४२ मीटर प्रति सेकंदावर आणून ते गुरूच्या कक्षेत स्थिर करण्यात आले. त्यांनतर जुनो सूर्यकिरणांच्या दिशेने वळवण्यात आले. त्यातून आता जुनोला सौरऊर्जा मिळू शकेल. पुढच्या काही महिन्यांत 'जुनो'मधील यंत्रणांची अंतिम चाचणी
करण्यात येईल.
जुनो आणि पुराणकथा...
जुनो हे नाव ग्रीक आणि रोमन पुराणकथांवरून देण्यात आले आहे. ज्युपिटर हा देव आपला खोडकरपणा लपवण्यासाठी स्वतःभोवती ढगांचा पडदा ओढून घेतो मात्र त्याची पत्नी जुनो ही ढगांचा पडदा भेदून त्याचे खरे रूप समोर आणते, अशी कथा आहे.
या मोहिमेतून गुरूच्या अंतर्भागाविषयी माहिती होईल, त्याशिवाय या ग्रहाची निर्मिती आणि संपूर्ण सूर्यमाला कशी विकसित होत गेली, या गोष्टीही जाणून घेता येतील.
No comments:
Post a Comment