चंडिगडः पीएसपीबीच्या मधुरिका पाटकर हिने राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस (उत्तर विभाग) स्पर्धेतील महिला गटाचे विजेतेपद पटकावले. महिला गटाच्या अंतिम लढतीत मधुरिकाने पीएसपीबीच्या पूजा सहस्रबुद्धे-कोपरकर हिच्यावर १२-१०, ११-५, ७-११, ११-१९, १३-१५, ११-८ अशी संघर्षपूर्ण मात केली आणि विजेतेपद पटकावले. त्पूर्वी, पूजाने अव्वल मानांकित मनिका बात्राला ११-९, ११-७, ११-८, ११-४ असा पराभवाचा धक्का दिला होता, तर
मधुरिकाने महाराष्ट्राच्या श्रुती अमृतेवर १४-१२, ११-८, ४-११, ११-४, ९-११, ११-५ अशी संघर्षपूर्ण मात केली होती.
पुरुष गटात पीएसपीबीच्या ए. अमलराजने विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत अमलराजने पीएसपीबीच्या सनील शेट्टीवर ५-११, ११-८, ११-८, १३-११, ११-२ अशी मात केली. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत अमलराजने जी. सतियनवर १२-१०, ९-११, ३-११, ९-११, ११-९, ११-९, ११-६ अशी, तर सनीलने पीएसपीबीच्याच हरमीत देसाईवर ११-६, १३-११, ५-११, १३-११, ५-११, १५-१३ अशी मात केली होती.
स्पर्धेतील २१ वर्षांखालील मुलांच्या गटात मानव ठक्करने विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत मानवने पश्चिम बंगालच्या अर्जुन घोषचा ११-९, ८-११, ११-९, ११-५, ११-७ असा पराभव केला. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत अर्जुनने रोनित भांजाला ८-११, ११-९, ११-६, ११-५, ११-८ असे, तर मानवने दिल्लीच्या उत्कर्ष गुप्ताला ११-८, ४-११, १०-१२, ११-४, ४-११, १३-११, ११-९ असे पराभूत केले होते.
स्पर्धेतील २१ वर्षांखालील मुलींत अर्चना कामतने विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत अर्चनाने श्रीजा अकुलाचा ११-८, ११-७, ११-४, ९-११, ११-१ असा पराभव केला. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत अर्चनाने अहिका मुखर्जीचा ११-५, ११-७, ८-११, ९-११, १३-११, ११-६ असा, तर तर श्रीजाने मनुश्री पाटीलचा ८-११, ११-७, ११-६, ११-७, ११-६ असा पराभव केला होता.
उपांत्यपूर्व फेरीचे निकालः महिलाः मधुरिका पाटकर वि.वि. सुतिर्था मुखर्जी १४-१२, ११-८, ४-११, ११-४, ९-११, ११-५; पूजा सहस्रबुद्धे-कोपरकर वि.वि. के. शामिनी ११-८, ८-११, ४-११, ८-११, १५-१३, ११-८, ११-६; श्रुती अमृते वि.वि. रिथ रिशया ११-३, ११-७, ११-९, ९-११, ११-२; मनिका बात्रा वि.वि. फ्रेंझ वि.वि. चिपिया ११-५, ११-८, ११-७, ११-४.
No comments:
Post a Comment