बेळगाव, कारवारसह सीमाभाग महाराष्ट्रात विलीन व्हावा यासाठी राजकीय लढाई लढणाऱ्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष, माजी आमदार वसंतराव पाटील यांचे सोमवारी पहाटे साडेपाच वाजता हृदयविकाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. गेल्या आठ दिवसापासून आजारी असल्यामुळे उपचारासाठी बेळगावमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वसंतराव पाटील हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून
आले होते. याशिवाय तालुका बोर्डाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवले होते. शालेय जीवनातच त्यांनी सीमालढ्यात उडी घेतली होती. गेल्या २२ वर्षांपासून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे ते अध्यक्ष होते. सीमप्रश्नासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते.
खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी येथे सायंकाळी पाच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलगे, तीन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment