Thursday, 7 July 2016

एलएचसी प्रयोगातील माहितीच्या आधारे तीन नवीन कणांचा शोध


लार्ज हैड्रोन कोलायडर यंत्रातील प्रयोगातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी तीन नवीन असाधारण कणांचे निरीक्षण केले असून एक्स ४१४० या पूर्वी सैद्धांतिक पातळीवर शोधलेल्या चौथ्या कणाचे अस्तित्व निश्चित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. एलएचसी म्हणजे लार्ज हैड्रोन कोलायजर हा जगातील सर्वात मोठा कण आघातक (पार्टिकल कोलायडर) असून त्यात हिग्ज बोसॉन या कणाचा शोध लावण्यात
आल्याचा दावा करण्यात आला होता. आता शोधण्यात आलेले नवे कण हे चार क्वार्कचे बनलेले असून क्वार्कस हे कुठल्याही द्रव्यातील अणूंच्या आतील भागातले मूलभूत घटक असतात. त्यात दोन क्वार्क व दोन अँटीक्वार्क यांचा समावेश असतो. अप्रमाणित स्वरूपाच्या क्वार्कमुळे नवीन कण हे  विचित्र किंवा असाधारण कण या नव्या वर्गवारीत समाविष्ट करण्यात आले असून त्यांचा अर्थ लावण्याचे काम चालू आहे. १९६४ मध्ये क्वार्कचे प्रारूप मरे गेल मॅन व जॉर्ज वेग यांनी मांडले होते त्यात हॅड्रॉन्स म्हणजे सर्व संयुक्त कणांचे वर्गीकरण वैध पद्धतीने करण्यात आले होते. कणभौतिकीतील प्रमाणित प्रारूपाचे ते घटक आहेत. या प्रारूपानुसार हॅड्रॉन हे त्यांच्या क्वार्क प्रमाणावरून वर्गीकृत केले जातात व आतापर्यंतच्या हॅड्रॉनमध्ये क्वार्क व अँटीक्वार्क यांच्या जोडय़ा म्हणजे मेसॉन  किंवा तीन क्वार्क बॅरीयॉन्स असायचे. गेल्या दशकात अनेक अभ्यासात असे दिसून आले की कुठल्याही कणात तीनपेक्षा अधिक क्वार्क असतात. २००९ मध्ये संशोधकांनी एक्स ४१४० कणाचा शोध लावला होता त्याचे गुणधर्म वेगळे होते व त्याबाबत संदिग्धता असल्याने सैद्धांतिक स्पष्टीकरण देता आले नव्हते. लार्ज हॅड्रॉन कोलायडरमधील एका प्रकल्पात द्रव्य व प्रतिद्रव्य यांच्यातील फरक शोधण्याचे काम चालू असून त्यात ब्युटी क्वार्क म्हणजे बी क्वार्क च्या मदतीने एक्स ४१४० ची क्वांटम संख्या अचूक काढता येईल असे सांगितले जाते. आताच्या सैद्धांतिक स्पष्टीकरणावर या संशोधनाचा मोठा परिणाम होणार असून एक्स ४१४० चे निरीक्षण यापूर्वी झाले असून आता तीन नवीन वैचित्र्यपूर्ण कण सापडले आहेत त्यांची नावे एक्स ४२७४, एक्स ४५००, एक्स ४७०० अशी आहेत. चार कणांमध्ये क्वार्कची रचना सारखीच असली तरी क्वार्कची अंतर्गत रचना वेगळी आहे, त्यांचे वस्तुमान व क्वांटम क्रमांक वेगळे आहेत. एलएचसी भौतिकशास्त्रज्ञांनी यात २०१० ते २०१२ दरम्यान मिळवलेली माहिती वापरली आहे. एलएचसीबी (लार्ज हॅड्रॉन कोलायडर ब्युटी कोलॅबोरेशन) या प्रयोगात पूर्वी दोन पेंटाक्वार्क शोधून काढण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.