Wednesday, 13 July 2016

चीनच्या ‘विस्तारवादा’ला दणका


दक्षिण चीनच्या समुद्रावर हक्क सांगण्यासाठी चीनकडे ठोस असे कोणतेही पुरावे नाहीत, असे मत नोंदवून आंतरराष्ट्रीय लवादाने चीनला झटका दिला आहे. चीन आणि फिलिपिन्समध्ये बऱ्याच काळापासून दक्षिण चीन समुद्राच्या मालकीचा वाद सुरू होता. त्यात चीनने हा समुद्र आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे आणि देशासाठी त्याचे ऐतिहासिक महत्त्वही मोठे आहे, असा दावा नेहमीच केला होता. त्यामुळेच फिलिपिन्सने २०१३
मध्ये द हेग येथील आंतरराष्ट्रीय लवादाचे दार ठोठावले होते. मात्र चीनने या खटल्यात सहभागी होण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रथमच लवादाने चीनचे दावे फेटाळून लावून फिलिपिन्सच्या बाजूने निकाल दिला आहे. दक्षिण चीन समुद्राचे महत्त्व आणि त्याचा चीन तसेच फिलिपिन्सला होणारा फायदा यांचा आढावा.
दक्षिण चीन समुद्रातील गुंता
दक्षिण चीन समुद्रामध्ये आभासी अशा 'नाइन डॅश लाइन'वर चीनने दावा सांगितला आहे. हा मान्य केला, तर जवळपास पूर्ण दक्षिण चीन समुद्रावर चीनचे स्वामित्व प्रस्थापित होईल. दक्षिण चीन समुद्रामध्ये विविध देशांच्या सागरी सीमा परस्परांना छेदतात. येथील सागरी सीमा निश्चित नसून विविध देशांनी आपला हक्क या भागामध्ये सांगितला आहे.



निकालाची पार्श्वभूमी

चीनबरोबर १७ वर्षे वाटाघाटी केल्यानंतरही हाती काहीच लागण्याची शक्यता नसल्याने फिलिपिन्सने आंतरराष्ट्रीय लवादाकडे चीनच्या विरोधात २०१३मध्ये तक्रार दाखल केली. चीनने सुरुवातीपासूनच सुनावणीला विरोध केला. या खटल्यामध्ये सहभागी होण्यासही नकार दिला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सागरी कायद्याच्या कराराचा भंग चीनने केल्याचे फिलिपिन्सने सांगितले आहे. या करारावर चीन आणि फिलिपिन्स दोन्ही देशांनी सह्या केल्या आहेत.

नाइन डॅश लाइन

चीनच्या दक्षिणेपासून सुरुवात होऊन जवळपास पूर्ण दक्षिण चीन समुद्र ही लाइन व्यापते. १९४०मध्ये पहिल्यांदा चीनने नकाशावर ही लाइन आखली. शतकानुशतके चीनचे मच्छिमार या समुद्राचा वापर करीत आल्याचा दावा चीनने केला आहे.



चीनला फायदा काय?

दक्षिण चीन समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधनसंपत्ती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीनने या भागावर दावा करून आक्रमक नीती अवलंबली आहे. या प्रदेशावरील छोट्या देशांच्या दाव्याला चीनने केराची टोपली दाखवली आहे.



कृत्रिम बेटांची निर्मिती

आपला दावा अधिक प्रबळ करण्यासाठी चीनने दक्षिण चीन समुद्रात कृत्रिम बेटेही तयार केली आहेत. त्या ठिकाणी लष्करी बळ तयार केले आहे. गेल्या काही दिवसांत चीनने पॅरासल आणि हैनान प्रांताच्या दक्षिणेकडील बेटांदरम्यान नौदलाच्या कवायती घेतल्या.

चीनचा आक्रमकपणा

कृत्रिम बेटांच्या निर्मितीबरोबरच चीनने पूर्व चीन समुद्रावर हवाई सुरक्षा क्षेत्र प्रस्थापित केले आहे. या ठिकाणांहून जाणाऱ्या विमानांना चीनला आपली ओळख सांगावी लागते. अशाच पद्धतीचे क्षेत्र दक्षिण चीन समुद्रातही चीन लागू करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

अमेरिकेची कूटनीती

चीनच्या आक्रमक विस्तारवादी धोरणांमुळे अमेरिकेचे या क्षेत्रातील हितसंबंध धोक्यात आले आहेत. त्यामुळे भारतासह पॅसिफिक क्षेत्रातील देशांशी अधिक जवळचे संबंध तयार करण्याकडे भर देण्यात येत आहे. भारत-अमेरिका यांच्यातील गेल्या काही वर्षांतील वाढलेल्या संबंधांना हीदेखील पार्श्वभूमी आहे. 

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.