Wednesday, 13 July 2016

अँडी मरेने दुसऱ्यांदा विम्बल्डन स्पर्धा जिंकली


अँडी मरेने दुसऱ्यांदा विम्बल्डन स्पर्धा जिंकली. अंतिम सामना खूप गुणवत्तेचा होता असे म्हणता येणार नाही. राओनिचने फेडरर विरुद्ध दाखवलेला खेळ बघून तो बिग लीगमध्ये आला असे वाटले होते.पण आजचा खेळ बघून तो परत मागे गेला असे वाटले. बॉयचा मॅन झालेला परत बॉय झाला. मात्र त्याच्या सभ्य आणि स्थित:प्रज्ञ वर्तनाने तो टेनिस मधला गुड बॉय आहे हे दिसले. जोकोविच, मरे, फेडरर, नडाल ही टेनिस मधिल बिग लीग.
बिग लीग मधले खेळाडू का श्रेष्ठ असतात हे आजच्या मरेच्या खेळावरून लगेच लक्षात येते. त्यांचा खेळ सर्वंकश असतो.(ऑल राउंड गेम). एक वेळेस त्यांचे आक्रमण कमी असेल पण त्यांचा बचाव लाजवाब असतो. त्या करता त्यांचे सर्विस रिटर्न्स जास्तीतजास्त कोर्ट मध्ये पडतात.(प्रतिस्पर्ध्याची सर्विस कितीही तिखट असली तरी). त्यांचे पासिंग शॉटस कमालीचे बिनचुक असतात. बेसलाइन वरून ते एकामागोमाग शॉट्स मारत रहातात. प्रचंड फिटनेस असल्याने बेसलाइन ते नेट पर्यंत सतत धावत असतात. थोडक्यात काय तर काहिही करून रॅली चालू ठेवतात. त्यामुळे प्रतिस्पर्ध्याला रॅली जिंकण्याकरता अजून काय करू असे वाटू लागते. मरेचा आजचा खेळ पाहून अगासी, कॉनर्स वगैरे मंडळी खुश झाली असतील कारण त्यांचा खेळ असा होता. मरेच्या खेळातील आक्रमणसुद्धा धारदार आहे.त्यामुळे उत्तम बचाव आणि योग्य वेळेस आक्रमण यांचा मस्तं मिलाफ करून त्याने सामना जिंकला.
कोणत्याही खेळात सुरु केलेला विषय संपवता येणे ही खूप महत्वाची गोष्टं असते . राओनिचने अनेक पॉइंट्सची सुरुवात चांगली केली. पण त्या पॉइंटला खिशात घालण्याकरता लागणारे कौशल्य कमी पडले. अनेक पासिंग शॉट्स बाहेर गेले, अनेक वॉलिज् नेट मध्ये गेल्या,अनेक smashes खूप कमकुवत होते(जे मरे ने परत केले), अनेक क्रॉस कोर्ट फटके परिणामकारक नव्हते. या सर्वांमुळे तो पॉइंट जिंकण्याकरता निर्णायक घाव घालू शकला नाही.क्रिकेटमध्ये जसे भारतीय गोलंदाज प्रतिस्पर्ध्याचे शेवटचे फलंदाज लवकर बाद करून विषय संपवू शकत नाहीत किंवा हॉकीचे खेळाडू उत्तम ड्रिबल करून गोलापर्यंत चेंडू आणतात पण गोलात मारू शकत नाहीत त्यातलाच हां प्रकार. म्हणजे ही गोष्टं खेळाडू अजून अजिंक्य पदाच्या इयत्तेला पोहचलेला नाही हे दर्शवते. विम्बल्डन जिंकण्याकरता तुम्ही सर्वस्वी सर्विसवर अवलंबून राहु शकत नाही. राहणार असाल तर तुमची सर्विस इवानईसविच किंवा श्तीश, क्रैचेक यांच्या सारखी अभेद्य लागते. या तिघांनी सर्विसच्या जोरावर विम्बल्डन एकदा का होईना जिंकले. राओनिचची सर्विस चांगलीच आहे पण अभेद्य नाही. थोडक्यात सांगायचे तर राओनिच अजून पुढच्या इयत्तेत जायचा आहे. फेडरर विरुद्ध केलेला खेळ राओनिचने मरे विरुद्ध केला असता तर सामना तीन सेट मध्ये संपला नसता.

मरेचा कोच इवान लेंडल आहे. त्याचा ग्रास कोर्ट वरचा राग अजून गेलेला दिसत नाही.(अख्ख्या सामन्यात तो एकदाही हसला नाही, अगदी मरे जिंकल्यावर सुद्धा).प्रेक्षकात बॉर्ग,एडबर्ग,बेकर तसेच समालोचन करताना मैकेंरोला बघून जूने दिवस आठवले.
मरेची पत्नी आणि आई एकत्र बसल्या नसल्याने सासवा सुनांचे पटत नसणार अशा झी टी.वि.प्रेरित कॉमेंट्स महिला मंडाळाकडून मॅच बघताना ऐकायला मिळाल्या. मरेचे जोरजोरात ओरडणे पाहून ‘त्याच्या आईला चार चौघात किती लाजल्या सारखे होत असेल’ हे ही ऐकायला मिळाले. रॉयल बॉक्स मध्ये राजपुत्र विलियम आणि त्याची पत्नी मरेला प्रोत्साहन द्यायला आवर्जून उपस्थित होते. राजकन्या केटचा नडाल आवडता खेळाडू आहे. पंतप्रधान कॅमेरून राजकीय पराजय विसरून टेनिस मधला विजय साजरा करायला आले होते.
मरेच्या भावनेच्या उत्कट अभिव्यक्तिमुळे क्रीडांगणावारील मानवतेचा उत्सव साजरा झाला. त्याचे दर्शन खेळाइतकेच महत्वाचे.

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.