Tuesday 19 July 2016

यासीर शाह क्रमवारीत अव्वल


दुबई - इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीतील नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानचा लेगस्पिनर यासीर शाह याने गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. लॉर्डसवर त्याने १0 विकेट घेतल्या. त्याला ३२ गुणांची कमाई झाली. त्यामुळे त्याने चौथ्या क्रमांकावरून भरारी घेतली.यासीरने आर. अश्‍विन, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना मागे टाकले. यासीर अद्याप पात्रता कालावधीमध्ये आहे.
१०० विकेटचा टप्पा पार केल्यानंतर गोलंदाज पूर्ण क्रमवारीसाठी (फूल रॅंकिंग) पात्र ठरतो. यासीरने १३ कसोटींमध्ये ८६ विकेट घेतल्या आहेत. चार विकेट घेतलेल्या राहत अलीने कारकिर्दीतील सर्वोत्तम ३२वा क्रमांक मिळविला, तर महंमद आमीरने ९३व्या क्रमांकासह ‘टॉप हंड्रेड’मध्ये स्थान मिळविले.

No comments:

Post a Comment