Tuesday 19 July 2016

विजेंदर आशियाई विजेता


नवी दिल्ली - घरच्या प्रेक्षकांसमोर मोठ्या आत्मविश्‍वासाने उतरणाऱ्या भारताच्या विजेंदरसिंगने व्यावसायिक बॉक्‍सिंग लढतीत कारकिर्दीमधील सर्वोत्तम कामगिरी करताना सुपर मिडलवेट गटातील "आशियाई किताब‘ (बेल्ट) पटकावला. त्याने प्रतिस्पर्धी केरी होपच्या आशा संयमी खेळाने उद्‌ध्वस्त केल्या. विजेंदरच्या तुलनेत अनुभवी असणाऱ्या केरीने घरच्या मैदानावर विजेंदरला पराभूत करण्याचे वक्तव्य केले
होते. प्रत्यक्षात आज विजेंदरने आपल्या संयमी खेळाला अचूकतेची जोड देत केरीचेच "होप‘ धुळीला मिळविले. दहा फेऱ्यांच्या लढतीत विजेंदरने तीनही जज्जेसकडून 98-92, 98-92, 100-90 असा विजयी कौल मिळविला.

विजेंदरने पदलालित्य सुरेख राखत होपला चेहऱ्यावर समोरून दिलेले पंचेस त्याची अचूकता दाखवणारे होते. त्याचबरोबर बॉडी शॉटवर अधिक भर देणाऱ्या होपला विजेंदरने अनेकदा कोंडीत पकडत मारलेले अप्पर कट्‌स आणि हूकचे ठोसेही त्याला गुण मिळवून देत होते. सावध पवित्रा धरून खेळणाऱ्या विजेंदरने संपूर्ण लढतीत होपला क्वचितच वर्चस्व राखण्याची संधी दिली. मात्र, लगेच सावध होत त्याचे ठोशांना कौशल्याने हुलकावणी दिली. 

व्यावसायिक लढतीत सलग सातवा विजय मिळवितना विजेंदरने घरच्या मैदानावरील पहिली लढत जिंकली. विजयानंतर त्याने मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देणाऱ्या भारतीय चाहत्यांचे आभार मानत त्यांना "बेल्ट‘ स्वीकारल्यावर रिंगणातूनच वाकून नमस्कार केला. विजेंदर म्हणाला,""केरी चांगला खेळला. अनुभवी होता; पण तुमच्या प्रोत्साहनाच्या जोरावर मी त्याला मात देऊ शकलो. धन्यवाद !‘‘

No comments:

Post a Comment