Tuesday 19 July 2016

उत्तर कोरियाकडून 3 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी


सेऊल - उत्तर कोरियाने आज (मंगळवार) सकाळी पुन्हा एकदा विरोध झुगारुन पूर्व किनाऱ्यावर  तीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला आहे. दक्षिण कोरियातील संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, उत्तर कोरियाने पूर्वेकडील किनाऱ्यावर आज सकाळी स्थानिक वेळेनुसार सकाळी सहा ते 6.40 मिनिटांदरम्यान या तीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. या
क्षेपणास्त्रांची मारक क्षमता 500 ते 600 किलोमीटरपर्यंत आहे.

उत्तर कोरियाने नुकतेच पाणबुडीवरून क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे शेजारील राष्ट्रांना धोका निर्माण झाला आहे. उत्तर कोरियापासून संरक्षण करण्यासाठी आम्ही अमेरिकेच्या साथीने थाड हे क्षेपणास्त्राविरोधी तंत्रज्ञान विकसित करणार असल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले होते. उत्तर कोरिया अण्वस्त्रे बनविण्याच्या तयारीत आहेत. संयुक्त राष्ट्र संघाकडून यावर बंदी घालण्यात आली आहे. उत्तर कोरिया कोणत्याही प्रकारच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान बनवू शकत नाही, असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघाने ठेवला आहे.

No comments:

Post a Comment